Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anagha Atul : स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये नव्या वळणाची चाहूल; अभिनेत्री अनघा अतुलची एण्ट्री

स्टार प्रवाहच्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत जीवा आणि नंदिनी यांच्या मातृत्वाच्या प्रवासाला भावनिक वळण मिळाले आहे. वारंवार आलेल्या अडचणींनंतर दोघांनी सरोगसीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 09, 2026 | 04:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘Lagnanantar Hoilach Prem’ सध्या अत्यंत भावनिक वळणावर पोहोचली आहे. जीवा आणि नंदिनी यांच्या आयुष्यातील संघर्ष, मातृत्वाची ओढ आणि त्यासाठी सुरू असलेली धडपड प्रेक्षकांना भावूक करत आहे. एकीकडे काव्या आणि पार्थ यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली आहे, तर दुसरीकडे नंदिनीला आई होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याने ती मानसिक संघर्षातून जात आहे. मातृत्वाच्या प्रवासात वारंवार आलेल्या अडचणींमुळे जीवा आणि नंदिनी यांनी अखेर सरोगसीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या निर्णयानंतर मालिकेच्या कथानकात एका नव्या व्यक्तिरेखेची एण्ट्री होणार असून त्यामुळे कथेला नवे वळण मिळणार आहे.

Slumdog Teaser: विजय सेतुपतीचा रहस्यमय आणि धडकी भरवणारा अंदाज, तब्बूची पोलिस भूमिका ठरतेय आकर्षण

लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुल आता या मालिकेत डॉ. आर्या या भूमिकेत दिसणार आहे. संवेदनशील, समजूतदार आणि सकारात्मक विचारांची ही व्यक्तिरेखा जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांच्यासोबत उभी राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या मातृत्वाच्या प्रवासात कोणते बदल घडतील, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अनघा जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा स्टार प्रवाहवर परतत आहे. या नव्या भूमिकेबद्दल बोलताना तिने स्टार प्रवाहसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. खलनायिकेच्या भूमिकेनंतर सकारात्मक व्यक्तिरेखा करण्याची इच्छा होती आणि डॉ. आर्याच्या रूपाने ती पूर्ण झाल्याचे तिने सांगितले.

अनघाने मालिकेच्या लोकप्रियतेचेही कौतुक केले. प्रवासादरम्यान अनेक महिला मोबाईलवर ही मालिका पाहताना दिसतात, असे सांगत ती स्वतःही मालिकेची नियमित प्रेक्षक असल्याचे म्हणाली. त्यामुळे आपल्या आवडत्या मालिकेत काम करण्याची संधी मिळणे तिच्यासाठी विशेष असल्याचे तिने नमूद केले.

‘सरकटे Weds चव्हाण’ अनुष्का आणि निखिलच्या लग्नाची पत्रिका आली समोर! ‘या’ शुभमुहूर्तवार योजिले लग्न

आता डॉ. आर्याच्या आगमनामुळे जीवा-नंदिनीच्या आयुष्यात नेमके काय बदल घडणार, त्यांचे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण होणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका दररोज सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.

Web Title: Actress anagha atul in marathi serial lagnanantar hoilach prem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update

संबंधित बातम्या

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार
1

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या
2

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य
3

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Tarini Upcoming Twist: तारिणी बनली दहशतवादी? “कितनी जाने लेनी है?” म्हणत दिला धक्कादायक इशारा; मालिकेत नवा ट्विस्ट
4

Tarini Upcoming Twist: तारिणी बनली दहशतवादी? “कितनी जाने लेनी है?” म्हणत दिला धक्कादायक इशारा; मालिकेत नवा ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.