Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aishwarya Narkar: भूमिका पडली महाग! “ही बाई मरत का नाही” म्हणत ऐश्वर्या नारकर यांना पडल्या शिव्या

Aishwarya Narkar: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारल्या आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 01, 2026 | 02:27 PM
Aishwarya Narkar: भूमिका पडली महाग! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Aishwarya Narkar: भूमिका पडली महाग! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऐश्वर्या नारकर यांनी सकारात्मक भूमिकांसह नकारात्मक पात्रांनाही प्रभावीपणे साकारले
  • एका नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांकडून अनपेक्षित प्रतिक्रिया आणि टीकेचा सामना 
  • नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्या अनुभवाबद्दल स्पष्टपणे भाष्य करत आपल्या भावना व्यक्त 
Marathi Actress Aishwarya Narkar: मराठी मनोरंजन विश्वात ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा दाखवणाऱ्या ऐश्वर्या यांनी सकारात्मक भूमिकांसोबतच नकारात्मक पात्रांनाही तितक्याच ताकदीने साकारलं आहे. अशाच एका भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांकडून अनपेक्षित प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्टपणे भाष्य केलं.

मालिकेच्या पात्रावरुन सोशलमीडियावर चर्चा

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्यांनी साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं. मालिकेत त्या विरोधी भूमिकेत होत्या आणि त्यांच्या अभिनयामुळे अनेकांना त्या खऱ्या आयुष्यातही तशाच आहेत, असं वाटू लागलं. याच कारणामुळे सोशल मीडियावर त्यांना अनेक प्रतिक्रिया देऊ लागल्या होत्या. एका मुलाखतीमध्ये त्यांनी या सर्व टीकांचा खुलासा केला.

सांगितला ‘त्या’ कमेंट्स

यावेळी त्या म्हणाल्या की, मालिका सुरू असताना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक विचित्र कमेंट्स येत होते. काहीजण त्यांच्या पात्रावर इतके नाराज होते की त्यांनी अतिशय कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिल्या. की ही बाई मरत का नाही… हीचा अपघात का होत नाही.. अश्या सर्व कमेंट्स येऊ लागला होत्या. सुरुवातीला हे वाचताना धक्का बसला, मात्र नंतर त्यामागचा अर्थ त्यांना समजला. लोक त्या पात्राचा इतका तिरस्कार करत होते, म्हणजेच त्यांनी साकारलेली भूमिका प्रभावी ठरली होती.

Marathi Actress: “लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास…’ ; मराठमोळ्या अभिनेत्रीने अखेर व्यक्त केली मनातील खंत

अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या

ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. प्रत्येक पात्रासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या अभिनयातील सहजपणा आणि संवादफेक यामुळे त्या प्रत्येक भूमिकेत उठून दिसतात.

आता पुन्हा नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, आता त्या पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर नव्या भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाहवरील ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या नव्या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत त्यांची भूमिका कशी असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याआधी त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या असल्यामुळे या नव्या मालिकेकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

The Paradise Teaser : नॅचरल स्टार नानीचा मोठा धमाका! ‘द पॅराडाइज’चा बहुप्रतीक्षित टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज

प्रेक्षकांचं प्रेम, टीका आणि प्रतिक्रिया या सगळ्याच गोष्टी कलाकाराच्या प्रवासाचा भाग असतात. ऐश्वर्या नारकर यांनीही हेच अनुभवातून शिकल्याचं सांगितलं. त्यांच्यासाठी पुरस्कारांपेक्षा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजही त्या प्रत्येक भूमिकेत पूर्ण ताकदीने काम करताना दिसतात. त्यांच्या नव्या मालिकेची चाहत्यांना आता उत्सुकता लागली असून, पुन्हा एकदा त्या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Aishwarya narkar shared trolling experience of satvya mulichi satvi mulgi serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • marathi actress
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?
1

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?

Japan News : वयाची शंभरी आता नवी गोष्ट नाही! जपानमध्ये १ लाखांहून अधिक शतकवीर
2

Japan News : वयाची शंभरी आता नवी गोष्ट नाही! जपानमध्ये १ लाखांहून अधिक शतकवीर

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?
3

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर
4

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.