(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Salman Khan Post: ‘I love you baba!’; संजय दत्तला मिठी मारत सलमान खान झाला भावूक, नेमकं काय घडलं?
द पॅराडाइज हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक बनला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नॅचरल स्टार नानी मुख्य भूमिकेत दिसणार असून, दमदार फर्स्ट लूक पोस्टर्स, प्रभावी प्रमोशनल मटेरियल आणि पॉवरफुल संगीतामुळे हा चित्रपट सतत चर्चेत आहे. दसराच्या ब्लॉकबस्टर यशानंतर नानी आणि दिग्दर्शक श्रीकांत ओडेला ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने द पॅराडाइज 2026 मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
The Paradise Teaser.
August 6th. pic.twitter.com/EzJwA8AdTr — Srikanth Odela (@odela_srikanth) July 31, 2026
चित्रपटातील चार्टबस्टर गाणे ‘आया शेर’ने यूट्यूबवर 20 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवत इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे आणि एक सांस्कृतिक फिनॉमेनन बनला आहे. आता प्रेक्षकांचे लक्ष चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित टीझरकडे लागले असून, तो 6 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा टीझर आतापर्यंतची सर्वात धक्कादायक झलक ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून, चित्रपटाचा बोल्ड आणि रॉ अंदाज आणखी प्रभावीपणे समोर आणेल आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवेल.
दिग्दर्शकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टीझरची दमदार झलक शेअर करत केली आहे. या संबंधित पोस्ट शेअर करताना त्यांनी या चित्रपटाच्या टीझर संबंधित तारीख देखील समोर आणली आहे. “द पॅराडाइजचा टीझर ६ ऑगस्ट” असं लिहीत त्यांनी तारीखबाबत खुलासा केला आहे. निर्मात्यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही दमदार झलक शेअर करत लिहिले. १ मिनिट ३५ सेकंदांचा वेडेपणा तयार आहे. #TheParadise चा टीझर ६ ऑगस्टला प्रदर्शित होणार. जादल ज़माना साठी सज्ज व्हा. असं म्हणत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
या शानदार यशासोबतच या गाण्याला यूट्यूबवर 18 लाख लाइक्स ही मिळाले आहेत, जे प्रेक्षकांमधील त्याच्या अफाट लोकप्रियतेची साक्ष देतात. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपासून सोशल मीडियापर्यंत ‘आया शेर’ची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत असून, या गाण्याने द पॅराडाइज बद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
एसएलव्ही सिनेमाजच्या बॅनरखाली तयार झालेला द पॅराडाइज 21 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, इंग्रजी, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण आठ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. जागतिक प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी निर्मात्यांनी हॉलिवूड स्टार रायन रेनॉल्ड्स यांच्याशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चित्रपट सादर करण्यासाठी संपर्क साधला आहे. दमदार दिग्दर्शक, प्रभावी स्टारकास्ट आणि भव्य दृष्टिकोनामुळे ‘द पॅराडाइज हा केवळ एक चित्रपट नसून, प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.






