Awarapan 2 Collection Day 9: यशच्या ‘Toxic’पूर्वीच (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आवारापन2 हा केवळ रोमँटिक गोष्ट सांगणारा चित्रपट नाही. त्यात अॅक्शन आणि थ्रिलरसाही तडका आहे. त्यामुळे इमरान हाश्मीच्या चाहत्यांसोबतच वेगळ्या प्रकारचे सिनेमे आवडणाऱ्या प्रेक्षकांनाही हा चित्रपट भावतोय, पहिल्या आठड्यातच सिनेमाने चांगली कमाई केल्यानंतर दुसऱ्या वीकेंडकडूनही मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
रिलीज झाल्यानंतर ‘आवारापन 2’ने सुरुवातीपासूनच चांगली पकड घेतली. फक्त पाच दिवसांत चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला होता. आठव्या दिवसापर्यंत भारतातील कमाई जवळपास 119 कोटी रुपयांवर पोहोचली होती. Awarapan 2 Collection Day 9:
शुक्रवारी सिनेमाने सुमारे 5.50 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, शनिवार सुरू होताच प्रेक्षकांची संख्या वाढताना दिसली. वीकेंडचा फायदा चित्रपटाला मिळाला आणि कमाईत पुन्हा चांगली सुधारणा झाली. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा सिनेमा आणखी किती पुढे जातो, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.
या चित्रपटाची कामगिरी फक्त भारतापुरती मर्यादित नाही. परदेशातील प्रेक्षकांकडूनही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आठ दिवसांच्या प्रवासानंतर ‘आवारापन 2’ने जगभरात जवळपास 169.51 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
यातील सुमारे 27.30 कोटी रुपये परदेशातील कमाईतून आले आहेत. इमरान हाश्मीच्या या सिनेमाला मिळालेला हा प्रतिसाद त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. भारताबरोबरच बाहेरच्या देशांमध्येही चित्रपटाची चर्चा सुरू असल्याचं या आकड्यांवरून दिसतं.
थिएटरमध्ये सध्या गर्दी खेचणारा ‘आवारापन 2’ पुढे ओटीटीवरही येणार आहे. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे थिएटरमध्ये सिनेमा पाहता न आलेल्या प्रेक्षकांना घरबसल्या तो पाहण्याची संधी मिळणार आहे.
Kartik Aaryan Surgery: सेटवर दुखापत अन् थेट सर्जरी! कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला नेमकं काय झालं?






