
Shweta Tiwari Chalenge Abhijit Dipake(फोटो सौजन्य-सौशलमीडिया)
Shweta Tiwari Chalenge Abhijit Dipake: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरात राजकीय आणि सामाजिक चर्चांना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्याच्या आंदोलनाची चर्चा सुरु होती. अखेर या घडामोडीनंतर अनेकांनी हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. सोशल मीडियावरही यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला, असे मत मांडले, तर काहींनी हा निर्णय उशिरा घेतल्याची टीका केली.
या संपूर्ण प्रकरणात अनेक कलाकारांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. काहींनी विद्यार्थ्यांना उघडपणे पाठिंबा दिला, तर काही आंदोलनस्थळी जाऊन त्यांच्यासोबत उभे राहिले. मात्र आता अभिनेत्री श्वेता तिवारीने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके आंदोलनाबाबत बोलताना दिसतात. मात्र व्हिडिओ शेअर करताना श्वेताने थेट काही प्रश्न उपस्थित केले. तिच्या मते, जर एका केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन होऊ शकते, तर इतर राज्यांतील शिक्षण व्यवस्थेवरही तितक्याच ताकदीने प्रश्न विचारले गेले पाहिजेत. (Entrainment News:)
Jana Nayagan : Vijay Thalapathy च्या शेवटच्या सिनेमाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन! सिनेमा करतोय राडा
पोस्टमध्ये तिने पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांचा उल्लेख करत, त्यांच्या कामगिरीबाबतही आंदोलन होणार का, असा सवाल उपस्थित केला. तसेच संबंधित संघटना आता त्या मुद्द्यावरही तितक्याच आक्रमकपणे भूमिका घेणार का, असा प्रश्न विचारत तिने अप्रत्यक्षपणे आव्हान दिले. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, श्वेताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) आंदोलनाच्या यशाबद्दल बोलताना दिसतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, एखादा मंत्री आपल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडत नसेल, तर विद्यार्थी आणि सामान्य नागरिक शांतपणे एकत्र येऊन लोकशाही मार्गाने बदल घडवू शकतात. त्यांनी हा राजीनामा विद्यार्थ्यांच्या संघटित लढ्याचा मोठा परिणाम असल्याचे सांगितले.
नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू झाले. विविध विद्यार्थी संघटना, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. हळूहळू या आंदोलनाला देशातील अनेक भागांतून पाठिंबा मिळू लागला.
याच काळात काही प्रसिद्ध व्यक्तींनीही विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला. शिक्षण क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर सातत्याने भूमिका घेणारे सोनम वांगचुक यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उपोषण सुरू केले. त्यानंतर जंतर-मंतर ते संसद असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने हा विषय राष्ट्रीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
आंदोलन अधिक तीव्र होत असताना सरकारवर दबाव वाढत गेला. विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या निर्णयानंतर काहींनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक केले, तर काहींनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल करण्याची मागणी केली.सध्या मात्र श्वेता तिवारीच्या पोस्टमुळे चर्चेचा विषय आणखी रंगला आहे. तिच्या प्रश्नांमुळे आंदोलन, राजकारण आणि शिक्षण व्यवस्था या तिन्ही मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.