(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Excel Music Launch: रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने आपल्या नव्या म्युझिक लेबल ‘एक्सेल म्युझिक’ची अधिकृत घोषणा केली आहे.(Excel Music Launch) प्रॉडक्शन हाऊसच्या सर्जनशील प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप या लेबलचा स्ट्रॅटेजिक, मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्युशन पार्टनर असणार आहे.
‘एक्सेल म्युझिक’ची पहिली प्रस्तुती ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा साउंडट्रॅक अल्बम असेल. हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अल्बममधील पहिले गाणे हरियाणवी गायक धांडा यांच्या आवाजात असणार असून, याच गाण्याद्वारे ते बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. हे गाणे याच आठवड्यात रिलीज होणार आहे.
गेल्या दोन दशकांत एक्सेल एंटरटेनमेंटने ‘दिल चाहता है’, ‘लक्ष्य’, ‘रॉक ऑन!!’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दिल धडकने दो’, ‘बार बार देखो’, ‘रईस’ आणि ‘गली बॉय’ यांसारख्या चित्रपटांद्वारे अविस्मरणीय संगीत प्रेक्षकांना दिले आहे.
View this post on Instagram
आता ‘एक्सेल म्युझिक’च्या माध्यमातून केवळ एक्सेल एंटरटेनमेंटच्या चित्रपटांचे ओरिजिनल साउंडट्रॅक आणि बॅकग्राऊंड स्कोअरच नव्हे, तर इतर आघाडीच्या चित्रपट निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेसच्या चित्रपटांचे संगीतही प्रदर्शित केले जाणार आहे.
‘संगीत हा आमच्या सर्जनशील प्रवासाचा अविभाज्य भाग’
या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर म्हणाले, “संगीत हा नेहमीच आमच्या सर्जनशील प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला आहे. एक्सेल म्युझिकची सुरुवात ही त्या उत्कटतेचाच नैसर्गिक विस्तार आहे. उत्कृष्ट कलाकारांसोबत काम करून प्रत्येक पिढीतील प्रेक्षकांच्या मनाला भिडेल असे संगीत निर्माण करण्याची आमची इच्छा आहे.”
युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपही उत्सुक
युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे भारत आणि दक्षिण आशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर सानुजीत भुजाबल म्हणाले, “एक्सेल एंटरटेनमेंटने गेल्या दोन दशकांत प्रत्येक पिढीशी नाते जोडणाऱ्या कथा दिल्या आहेत. एक्सेल म्युझिकच्या या नव्या प्रवासात भागीदार होताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या जागतिक नेटवर्कच्या माध्यमातून हे संगीत भारतासह जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
या नव्या म्युझिक लेबलच्या माध्यमातून एक्सेल एंटरटेनमेंट आता केवळ चित्रपटनिर्मितीपुरते मर्यादित न राहता, संगीतविश्वातही आपला ठसा उमटवण्याच्या तयारीत आहे.






