Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवरील किचनमध्ये रंगली मजा; कलाकारांनी बनवली गरमागरम कांदाभजी, पाहा Video

‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवर कलाकारांनी एकत्र येत गरमागरम कांदाभजी बनवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पण तेजश्री प्रधान व्हिडिओत नसल्याने तिच्या मजेशीर कमेंटची सोशल मीडियावर चर्चा रंगली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 07, 2026 | 12:11 PM
( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी मालिकांच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांमध्ये पडद्यावर जितकी उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळते, तितकंच सुंदर बॉण्डिंग पडद्यामागेही दिसून येतं. . ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवरही नुकतीच अशीच एक मजेशीर झलक पाहायला मिळाली. शूटिंगमधून वेळ काढत कलाकारांनी सेटवरील किचनमध्ये एकत्र येऊन गरमागरम कांदाभजी बनवण्याचा आनंद लुटला.

खर तर मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांना जोरदार फटका बसताना दिसत आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. पावसामुळे अनेक मालिकेचं शूटिग रद्द करण्यात आले होते. तर काही कलाकार भर पावसात सेटवर पोहोचल्याचे समजत आहे. वीण दोघांतली ही तुटेनाच्या सेटवर देखील सगळे कलाकार उपस्थित होते.यावेळी या सगळ्यांनी एकत्र येत कांदाभजीचा बेत आखला होता.

सेटवरील किचनमध्ये यावेळी एक वेगळीच लगबग पाहायला मिळाली. मालिकेतील आजी, मल्लिका काकू आणि सुश्मिता यांनी एकत्र येत गरमागरम कांदाभजी बनवण्याचा बेत आखला. व्हिडिओमध्ये सुश्मिता कांदे चिरताना, आजी कोथिंबीर निवडताना, तर मल्लिका काकू कांदाभजीचं मिश्रण तयार करताना दिसत आहेत. शूटिंगच्या धावपळीतही कलाकारांनी एकत्र स्वयंपाक करत आनंदाचे क्षण अनुभवले.

यावेळी सेटवर समरची भूमिका साकारणारा सुबोध भावे देखील उपस्थित होता. सर्व कलाकार एकमेकांची मदत करत, गप्पा-गोष्टी करत आणि हसत-खेळत काम करत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. पडद्यावर कुटुंबाची भूमिका साकारणारे हे कलाकार ऑफस्क्रीनही तितक्याच आपुलकीने आणि जिव्हाळ्याने एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.


मात्र, या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांची लाडकी स्वानंदी, म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान, कुठेच दिसली नाही. त्यामुळे चाहत्यांनीही लगेच तिची उणीव जाणवत, “स्वानंदी कुठेय?”, “तेजू ताईला मिस केलं” अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडिओवर दिल्या.

Lock Upp 2: ‘मी प्लेबॉय होतो’; राम कपूरच्या वक्तव्याने खळबळ, एकता कपूरने गौतमीला दिला होता इशारा?

विशेष म्हणजे, काही वेळानंतर स्वतः तेजश्री प्रधाननेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. तिने “हे कधी घडलं?” असा प्रश्न विचारत सोबत दुःखी इमोजी शेअर केला. तिच्या या कमेंटला मालिकेतील मल्लिका काकूंनी “संध्याकाळी…” असं उत्तर दिलं. या संवादावरून सेटवरील ही कांदाभजी पार्टी तेजश्री प्रधान मिस केल्याचं स्पष्ट झालं. अभिनेत्रीची ही मजेशीर प्रतिक्रिया आणि कलाकारांमधील आपुलकी पाहून चाहत्यांनीही या पोस्टवर भरभरून प्रेम व्यक्त केलं.

कलाकारांमधील आपुलकी, सेटवरील आनंदी वातावरण आणि एकमेकांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

‘माझ्या नवऱ्याचे ५० अफेअर्स असले तरी…’; शिल्पा शिंदेवर भडकली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा, ‘लॉकअप २’मध्ये रंगला मोठा वाद

Web Title: Fun unfolds in the kitchen on the set of veen doghantali hi tutena cast members prepare hot onion fritters watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • Mumbai Rain
  • Tejashree Pradhan

संबंधित बातम्या

Marathi Serial: संपूर्ण लूक बदलून ‘ती’ खलनायिका पुन्हा आली; ‘सावळ्याची जणू सावली’च्या सेटवर स्वागताची जोरदार तयारी
1

Marathi Serial: संपूर्ण लूक बदलून ‘ती’ खलनायिका पुन्हा आली; ‘सावळ्याची जणू सावली’च्या सेटवर स्वागताची जोरदार तयारी

मुंबईत पावसाचा हाहाकार! १७ विमाने रद्द तर ३६५ फ्लाईट्स उशिरा; इंडिगो, आकासा एअरकडून प्रवाशांना महत्त्वाचा इशारा!
2

मुंबईत पावसाचा हाहाकार! १७ विमाने रद्द तर ३६५ फ्लाईट्स उशिरा; इंडिगो, आकासा एअरकडून प्रवाशांना महत्त्वाचा इशारा!

Abu Azmi on Mankhurd Incident: मानखुर्द दुर्घटनेतील ६ मृत्यू प्रशासकीय हलगर्जीपणामुळेच; अबू आझमी यांचा खळबळजनक आरोप
3

Abu Azmi on Mankhurd Incident: मानखुर्द दुर्घटनेतील ६ मृत्यू प्रशासकीय हलगर्जीपणामुळेच; अबू आझमी यांचा खळबळजनक आरोप

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा; तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, नाहीतर…
4

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा; तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, नाहीतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.