Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: संपूर्ण लूक बदलून ‘ती’ खलनायिका पुन्हा आली; ‘सावळ्याची जणू सावली’च्या सेटवर स्वागताची जोरदार तयारी

लीपनंतर गायब झालेली भैरवी पुन्हा मालिकेत दाखल झाली आहे. अभिनेत्री मेघा धाडेच्या नव्या ग्लॅमरस लूकची आणि सेटवरील खास स्वागताची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 07, 2026 | 08:49 AM
( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या टीआरपीसाठी चुरशीची स्पर्धा सुरू आहे. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी वाहिन्या सातत्याने नव्या मालिका, वेगळे विषय आणि कथानकातील अनपेक्षित ट्विस्ट प्रेक्षकांसमोर आणत आहेत. याच झी मराठी वाहिनीने मालिकांसाठी दुपारचं विशेष सत्र सुरू केलं आहे. या सत्रात ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन लोकप्रिय मालिका प्रसारित केल्या जात असून, दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. इतकंच नव्हे, तर या दोन्ही मालिका आपल्या वेळेत सातत्याने स्लॉट लीडर ठरत आहेत.

मालिकेत आलेल्या लीपनंतर कथानकाने मोठं वळण घेतलं आहे. सासूने घराबाहेर काढल्यानंतर सावली मेहेंदळे कुटुंबापासून दूर जात स्वतःचं नवं आयुष्य सुरू करते. पुढे तिला जुळी मुलं होतात. यापैकी अबीर सावलीच्या सहवासात वाढतो, तर सारंग ओवीचं संगोपन करताना दिसतो. या नव्या घडामोडींमुळे मालिकेच्या कथानकात अनेक भावनिक आणि रंजक वळणं आली आहेत.

दरम्यान, लीपनंतर मालिकेतील एक महत्त्वाचं पात्र काही काळासाठी दिसेनासं झालं होतं. त्यामुळे चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा आपल्या दमदार आणि डॅशिंग अंदाजात भैरवीच्या भूमिकेत पुनरागमन करत आहे.

आगामी भागांमध्ये सावलीच्या आयुष्यात पुन्हा एकदा भैरवी वझेची दमदार एंट्री होणार आहे. सावलीलाच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी शत्रू मानणारी भैरवी यावेळी नव्या डावपेचांसह परतत आहे. तिच्या पुनरागमनामुळे मालिकेच्या कथानकात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

 

यापूर्वी भैरवी पारंपरिक साडी आणि साध्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र, यावेळी तिचा संपूर्ण अंदाज बदललेला दिसणार आहे. हाय हिल्स, फॉर्मल ब्लेझर सूट, स्टायलिश हेअरस्टाईल आणि मॉडर्न व्यक्तिमत्त्व अशा ग्लॅमरस अवतारात ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा हा नवा लूक सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

Lock Upp 2: ‘जो त्रास देईल त्यांचं आयुष्य नरकासारखं कर मामी…’ कश्मिरा शाहने दिला Sunita Ahuja ला भक्कम पाठिंबा

मात्र, भैरवीचा फक्त लूकच बदललेला नाही, तर तिच्या मनातील सूडाची भावना देखील पूर्वीइतकीच तीव्र आहे. सावलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आणि तिचं सुख हिरावून घेणं, हा तिचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे भैरवीच्या पुनरागमनानंतर सावलीसमोर कोणती नवी आव्हानं उभी राहणार आणि या दोघींमधील संघर्ष कोणतं नवं वळण घेणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Anshula Kapoor Wedding: पीच रंगाच्या लेहंग्यात कमालीची सुंदर दिसतेय अर्जुनची बहीण अंशुला, लग्नाचे फोटो Viral
तिच्या एंट्रीमुळे कथानकात पुन्हा एकदा नवा संघर्ष, नवे डावपेच आणि थरार पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title: Bhairavi makes a powerful comeback in savalyachi janu savali megha dhade returns in a stylish new look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • serial update

संबंधित बातम्या

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा
1

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
2

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
3

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.