Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! रेहानच्या पहिल्याच गाण्याने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनचा मुलगा रेहान रोशनने अभिनयाऐवजी संगीत क्षेत्रातून स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. त्याचे पहिले स्वतंत्र गाणे ‘दिस हेवनली प्लेस’ २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 29, 2026 | 11:39 AM
Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

 

  • रेहान रोशनचे पहिले स्वतंत्र गाणे प्रदर्शित
  • गायनासोबत गीतलेखन आणि गिटारवादनाचीही जबाबदारी
  • ‘दिस हेवनली प्लेस’मधून संगीत क्षेत्रात नवी सुरुवात
 

Hrithik Roshan Son Hrehaan Entry In Music World: ह्रतितक रोशन नेहमीच कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत राहतो. देखणा, तसेच त्याने त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे. अनेक वर्षांपासून त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. मात्र आता हृतिकपेक्षा त्याचा मुलगा रेहान रोशन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. रेहानने मनोरंजन क्षेत्रात नव्हे, तर थेट संगीत क्षेत्रात आपली स्वत:ची ओळख बनवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे.

पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

रेहान रोशनने नुकतंच आपलं पहिलं स्वतंत्र गाणं प्रेक्षकांसमोर आणलं आहे. ‘दिस हेवनली प्लेस’ असं या गाण्याचं नाव असून २८ ऑगस्ट रोजी ते प्रदर्शित झालं. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे रेहानने केवळ आवाज दिलेला नाही, तर गाण्याचे बोल लिहिण्यापासून ते गिटार वाजवण्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या स्वतः सांभाळल्या आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट नक्कीच खास म्हणावा लागेल. Hrithik Roshan Son News:

गाण्यामध्ये रेहानचा साधा अंदाज

या गाण्याच्या व्हिडीओमध्ये रेहान अगदी साध्या अंदाजात दिसतो. काळ्या-पांढऱ्या रंगात तयार केलेल्या या व्हिडीओमध्ये तो गिटार हातात घेऊन गाणं सादरताना पाहायला मिळतो. त्याच्या सादरीकरणातून संगीताविषयीची आवड आणि मेहनत स्पष्टपणे जाणवते. विशेष म्हणजे, प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असूनही रेहानने स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रातून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

लेकाचे कौतुक

मुलाच्या या नव्या प्रयत्नामुळे हृतिक रोशनही खूप आनंदी आहे. त्याने सोशल मीडियावर रेहानचा व्हिडीओ शेअर करून त्याचं कौतुक केलं. संगीताची चांगली समज आणि त्याच्यात असलेली नैसर्गिक कला यावर हृतिकने विश्वास व्यक्त केला. वडिलांकडून मिळालेलं हे प्रोत्साहन रेहानसाठी नक्कीच महत्त्वाचं आहे. रेहानची आई सुझान खान हिनेही मुलाच्या या नव्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. मुलाने स्वतःच्या मेहनतीने एक वेगळी वाट निवडल्याचा तिच्या प्रतिक्रियेतून आनंद दिसून आला. याशिवाय अभिनेत्री सबा आझाद आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनीही रेहानला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘फुलों का तारों का’ रक्षाबंधनासाठी लिहिलंच नव्हतं; ५५ वर्षांपूर्वी लता मंगेशकरांनी जे केलं, ते पाहून पंचम दाही झाले होते थक्क

रोशन कुटुंबाबद्दल सांगायचे झाले तर,

रोशन कुटुंबाचा चित्रपट आणि संगीत क्षेत्राशी असलेला संबंध अनेक वर्षांचा आहे. या कुटुंबातील मागील पिढ्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचं योगदान दिलं आहे. राकेश रोशन यांनी दिग्दर्शन क्षेत्रात नाव कमावलं, तर राजेश रोशन हे प्रसिद्ध संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे रेहानसाठी संगीत हा पूर्णपणे अनोळखी विषय नाही.

The Paradise: नानीच्या ‘द पैराडाइज’च्या दुसऱ्या सिंगलचा डॅलसमध्ये ग्रँड लॉन्च; अनिरुद्धच्या कॉन्सर्टमध्ये होणार धमाका!

मात्र या कुटुंबाची परंपरा पुढे नेताना रेहानने स्वतःची शैली तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने निवडलेला स्वतंत्र संगीताचा मार्ग याचं उदाहरण आहे. त्यामुळे त्याच्या पहिल्या गाण्याकडे केवळ स्टारकिड म्हणून न पाहता, एका नव्या कलाकाराची सुरुवात म्हणून पाहिलं जात आहे.

Web Title: Hrithiks son rehaan makes music debut first song grabs attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainement News
  • hritik roshan
  • Marathi News

संबंधित बातम्या

School Diwali Vacation: २ नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी; प्राथमिक, माध्यमिकच्या तारखा जाहीर
1

School Diwali Vacation: २ नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी; प्राथमिक, माध्यमिकच्या तारखा जाहीर

Pune Water Crisis: जलसंपदा विभाग म्हणतो, ४० टक्के कपात करा; पुण्यात ४० टक्के पाणीकपातीवरून राजकारण तापणार
2

Pune Water Crisis: जलसंपदा विभाग म्हणतो, ४० टक्के कपात करा; पुण्यात ४० टक्के पाणीकपातीवरून राजकारण तापणार

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार
3

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर
4

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.