Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jethalal Babita Wedding: ‘तारक मेहता’त अखेर जेठालाल-बबिताचं लग्न? सोशलमीडियावर जोरदार चर्चा

Jethalal Babita Wedding: सोशल मीडियावर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’शी संबंधित एक मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेठालाल आणि बबीताजी चक्क लग्नाच्या मंडपात दिसत असून, दोघेही एकमेकांना वरमाला घालताना दिसतात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 15, 2026 | 11:15 AM
Jethalal Babita Wedding: ‘तारक मेहता’त अखेर जेठालाल-बबिताचं लग्न? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jethalal Babita Wedding: ‘तारक मेहता’त अखेर जेठालाल-बबिताचं लग्न? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जेठालाल-बबिताचा लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
  • दोघेही साऊथ इंडियन पद्धतीने वरमाला घालताना दिसले
  • दयाबेनसह गोकुळधाममधील सर्व पात्रांचा लग्नाच्या तयारीत सहभाग
Jethalal-Babita Wedding Video Goes Viral News: सोशल मीडियावर सध्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’शी संबंधित एक मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर फिरत आहे. या क्लिपमध्ये जेठालाल आणि बबीताजी चक्क लग्नाच्या मंडपात दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा विवाह अगदी साऊथ इंडियन पद्धतीने दाखवण्यात आला आहे. दोघेही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालताना दिसतात. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांना काही क्षणांसाठी हे खरं आहे की काय, असा प्रश्न पडला.

गोकुळधाममध्ये लग्नाचा माहोल

या व्हिडीओची खासियत फक्त जेठालाल-बबीताजींच्या लग्नापुरती मर्यादित नाही. संपूर्ण गोकुळधाम सोसायटीला लग्नाच्या तयारीत सहभागी झालेलं दाखवलं आहे. दयाबेन स्वयंपाकघरात जेवण बनवताना दिसते, तर चंपकलाल टोमॅटो चिरण्याच्या कामात व्यस्त आहेत. बापूजी, डॉक्टर हाथी आणि सोढी एकत्र बसून निवांत गप्पा मारताना दिसतात. त्यामुळे नेहमीच्या मालिकेतील पात्रांना एका वेगळ्याच भूमिकेत पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली.लग्नाच्या निमित्ताने गोकुळधाममधील जवळपास सगळेच जण एकाच ठिकाणी दिसतात.

दयाबेननेही सांभाळली बबीताची तयारी

व्हिडीओमधील आणखी एक मजेदार भाग म्हणजे दयाबेन बबीताजींची साडी व्यवस्थित करताना दिसते. लग्नाच्या घरात मोठी बहीण किंवा जवळची मैत्रीण जशी नवरीची तयारी करून देते, तसाच हा प्रसंग तयार करण्यात आला आहे. त्यानंतर सगळे जण एकत्र जेवताना दिसतात. जेठालाल आणि बबीताजीही इतरांसोबत जेवणाचा आनंद घेताना दिसतात. त्यामुळे संपूर्ण क्लिप अगदी मालिकेतील एखाद्या मोठ्या लग्नाच्या भागासारखी वाटते. Jethalal Babita Wedding

चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. काहींनी जेठालालच्या नशिबावर मजेशीर कमेंट्स केल्या, तर काहींनी थेट AIच्या वाढत्या वापरावर भाष्य केलं. एका चाहत्याने जेठालालचं आयुष्य आता सुखी झाल्याचं म्हटलं. तर दुसऱ्या युजरने भारतात AIचा वापर कुठपर्यंत पोहोचला आहे, यावर मिश्कील टिप्पणी केली.या सगळ्या चर्चेत नेहमीप्रमाणे पोपटलालचं लग्न मात्र चाहत्यांच्या निशाण्यावर राहिलं. काहींनी मजेत म्हटलं की AIलाही पोपटलालचं लग्न लावता आलं नाही.

AI will take everyone’s jobs 😭 Meanwhile, AI in India: pic.twitter.com/8ApGolDER8 — Relatable Guru (@Relatable_Guru) August 13, 2026

पण हा व्हिडीओ खरा आहे का?

इथेच या व्हिडीओमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. सोशल मीडियावर फिरणारी ही क्लिप मालिकेतील खऱ्या भागाची नसून AIच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे जेठालाल आणि बबीताजी खरंच विवाहबंधनात अडकले आहेत, असा समज करून घेण्याचं कारण नाही. AIमुळे आता प्रसिद्ध मालिकांमधील पात्रांना घेऊन अगदी विश्वासार्ह दिसणारे प्रसंग तयार केले जात आहेत.

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

मालिकेत सध्या माधवी भिडेंची नवी अडचण

दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या सध्याच्या कथानकात माधवी भिडेंसमोर वेगळीच समस्या उभी राहिली आहे. घरगुती पद्धतीने लोणचं आणि पापड तयार करून विकणाऱ्या माधवी यांच्या उत्पादनांची तपासणी केली जाते. याच तपासणीनंतर त्यांना अधिकाऱ्यांकडून नोटीस मिळते. त्यामुळे भिडे कुटुंबाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

परवाना रद्द होण्याची वेळ

प्रीकॅपमध्ये दोन अधिकारी आत्माराम आणि माधवी भिडे यांच्याशी चर्चा करताना दिसतात. लोणच्यात काचेचा तुकडा सापडल्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आल्याचं त्यांना सांगितलं जातं. या प्रकरणाबाबत काही स्पष्टीकरण द्यायचं असल्यास कार्यालयात येण्यासही सांगितलं जातं. त्यामुळे पुढच्या भागात भिडे कुटुंब या संकटातून कसं बाहेर पडणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Jethalal babita wedding video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Entertainement News
  • Entertainment marathi

संबंधित बातम्या

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण
1

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट
2

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात
3

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
4

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.