Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khagras Marathi Movie: नावातच गूढ, पोस्टरमध्ये रहस्य! ‘खग्रास’ चित्रपटाची पहिली झलक समोर

Khagras Marathi Movie: आगामी मराठी चित्रपट ‘खग्रास’चे गूढ वातावरण निर्माण करणारे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. “जेव्हा चंद्र सूर्याला झाकतो, तेव्हा सावली रक्ताने भरते” या रहस्यमय ओळींमुळे चित्रपटाच्या कथेबद्दल उत्सुकता वाढली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 23, 2026 | 03:31 PM
Khagras Marathi Movie:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Khagras Marathi Movie:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘खग्रास’चे गूढ मोशन पोस्टर प्रदर्शित
  • सिद्धार्थ मेनन, सुबोध भावेसह दमदार कलाकारांची फौज
  • ‘खग्रास’ ५ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार रिलीज

गूढ वातावरण, आकाशात सूर्याला झाकोळणारा चंद्र आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता… ‘जेव्हा चंद्र सूर्याला झाकतो, तेव्हा सावली रक्ताने भरते’ या गूढ करणाऱ्या ओळींसह आगामी मराठी चित्रपट ‘खग्रास’चे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. नावापासूनच उत्सुकता वाढवणाऱ्या या चित्रपटात मराठी मनोरंजनविश्वातील एकापेक्षा एक उत्तम कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रहस्य आणि उत्कंठेने भरलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच चित्रपटाची कथा काय असेल? या कथेत कोणते रहस्य दडले आहे, कोणत्या घटनांची उकल होणार आणि या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध असेल, याची ही उत्सुकता आता वाढली आहे. Khagras Marathi Movie:

प्रत्येक कलाकाराची वेगळी ओळख

सिद्धार्थ मेनन, संस्कृती बालगुडे, क्षितीश दाते, स्वानंदी टिकेकर, राहुल पेठे, सायली पाठक, अनन्या जावळे, सुबोध भावे अशी दमदार कलाकारांची मांदियाळी ‘खग्रास’च्या निमित्ताने एकत्र आली आहे. प्रत्येक कलाकाराची वेगळी ओळख आणि अभिनयाची स्वतंत्र शैली यामुळे या चित्रपटातील व्यक्तिरेखा कशा असतील, त्यांचे एकमेकांशी काय नाते असेल याची उत्सुकता वाढली आहे.

शोटॅड मोशन पिक्चर्स सहनिर्माते

आकाश पेंढारकर आणि पराग मेहता प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन देवेश व्ही. कामत यांनी केले आहे. राकेश जावळे, किरण जावळे, कीर्ती जावळे आणि आशुतोष शर्मा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. स्वप्नेश सावंत, फ्लाइंग बुलेट पिक्चर्स आणि शोटॅड मोशन पिक्चर्स सहनिर्माते आहेत.

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!

दिग्दर्शक देवेश व्ही. कामत म्हणतात, “रहस्यपटाची खरी ताकद ही प्रेक्षकांना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला लावण्यात असते. ‘खग्रास’मध्ये कथा, व्यक्तिरेखा आणि त्यांच्याभोवती निर्माण होणारे गूढ यांचा असा मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे की, प्रेक्षकांना प्रत्येक क्षणी पुढे काय घडणार, याची उत्सुकता वाटत राहील. या कथेसाठी इतके उत्तम कलाकार एकत्र येणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. पोस्टरमधून निर्माण झालेली उत्सुकता चित्रपट पाहताना नक्कीच अधिक वाढेल, अशी आशा आहे.”

‘खग्रास’च्या कथेत नेमके काय दडले

निर्माते राकेश जावळे म्हणतात, “‘खग्रास’सारखी गूढ आणि वेगळ्या धाटणीची कथा प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या चित्रपटासाठी एकत्र आलेली कलाकारांची फळी ही त्याची मोठी ताकद आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेतून कथेला वेगळे परिमाण दिले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.”

Prabhas Fauzi: प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट! ‘फौजी’चं नवं पोस्टर रिलीज; पाहा हटके लूक

रहस्याची चाहूल देणाऱ्या या टायटल पोस्टरनंतर आता ‘खग्रास’च्या कथेत नेमके काय दडले आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट ५ फेब्रुवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘खग्रास’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?

    Ans: ‘खग्रास’ ५ फेब्रुवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

  • Que: ‘खग्रास’ चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

    Ans: देवेश व्ही. कामत यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

  • Que: ‘खग्रास’मध्ये कोणते कलाकार आहेत?

    Ans: सिद्धार्थ मेनन, संस्कृती बालगुडे, क्षितीश दाते, स्वानंदी टिकेकर आणि सुबोध भावे यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

Web Title: Khagras marathi movie motion poster release date february 2027 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!
1

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!

Chandrapur News: तळोधीतील नळाच्या पाण्यात जंतूसदृश घटक? ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीला २४ तासांचा अल्टिमेटम
2

Chandrapur News: तळोधीतील नळाच्या पाण्यात जंतूसदृश घटक? ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीला २४ तासांचा अल्टिमेटम

Raigad News: ‘एकही झाड तोडू देणार नाही’, कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला नागरिकांचा विरोध; झाडांना मिठी मारून होणार चिपको आंदोलन!
3

Raigad News: ‘एकही झाड तोडू देणार नाही’, कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला नागरिकांचा विरोध; झाडांना मिठी मारून होणार चिपको आंदोलन!

जळगाव बायपास पूल खचल्याचा फटका; अडीच महिन्यांत १२ जणांचा मृत्यू, राष्ट्रवादी आक्रमक
4

जळगाव बायपास पूल खचल्याचा फटका; अडीच महिन्यांत १२ जणांचा मृत्यू, राष्ट्रवादी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.