Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “लाज कशी वाटत नाही?”, कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर नेटकऱ्यांचा संताप; नेमकं काय घडलं?

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: रक्षाबंधनाच्या ज्वेलरी जाहिरातीमुळे कृती सेनन ट्रोल झाली आहे. श्वानाला राखी बांधणे आणि अभिनेत्रीच्या लूकवरून नेटकऱ्यांनी सवाल उपस्थित केले.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 24, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रक्षाबंधन जाहिरातीवरून वाद
  • कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर नेटकरी भडकले
  • कपडे अन् श्वानाला राखी बांधल्यावरून नेटकरी संतप्त
Kriti Sanon Raksha Bandhan Ad: बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन सध्या रक्षाबंधनानिमित्त केलेल्या एका ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी जाहिरातीतील सादरीकरणावर आक्षेप घेतला आहे. जाहिरातीच्या माध्यमातून हिंदू सणाचा अनादर केला जात असल्याचा आरोपही काही युजर्सनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

रक्षाबंधनानिमित्त कृती सेननचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या जाहिरातीमध्ये अभिनेत्रीचा वेगळा इंडो-वेस्टर्न लूक पाहायला मिळतो. मात्र, तिच्या कपड्यांपासून ते रक्षाबंधन साजरे करण्याच्या पद्धतीपर्यंत अनेक गोष्टींवर नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

जाहिरातीमध्ये कृती पांढऱ्या रंगाचा ब्रालेट-स्टाइल ब्लाऊज, त्यावर केप आणि ड्रेप केलेला स्कर्ट अशा पोशाखात दिसत आहे. रक्षाबंधनासारख्या पारंपरिक सणाच्या पार्श्वभूमीवर तिचा हा लूक काही सोशल मीडिया युजर्सना पसंत पडलेला नाही.

याशिवाय जाहिरातीत पारंपरिक रक्षाबंधनाप्रमाणे आरतीचं ताट किंवा पूजेची तयारी दिसत नसल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे “रक्षाबंधनाचा पारंपरिक सण अशा पद्धतीने का दाखवला?” असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

Drishyam The Conclusion: विजय साळगावकर पुन्हा येतोय! ‘दृश्यम: द कन्क्लूजन’ची रिलीज डेट जाहीर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

भावाआधी श्वानाला बांधली राखी

या जाहिरातीतील आणखी एका दृश्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. जाहिरातीत एका पाळीव श्वानाला कुटुंबातील सदस्य म्हणून दाखवण्यात आलं असून, कृती सेनन त्याला राखी बांधताना दिसते. विशेष म्हणजे, भावाला राखी बांधण्यापूर्वी ती श्वानाला राखी बांधत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

या दृश्यावर काही नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्वान हा कुटुंबाचा भाग असू शकतो, मात्र रक्षाबंधनाच्या जाहिरातीत त्याला राखी बांधण्याची कल्पना योग्य वाटत नसल्याचं काही युजर्सनी म्हटलं आहे.

What nonsense is this Inko Hindu festivals hi milte hain apna WOKE agenda chalane? 🙄🙄 Here, Kriti Sanon is “celebrating” #RakshaBandhan wearing this skimpy outfit (perhaps left over from Cocktail 2) Kriti is not just a brand ambassador, but also a strategic investor so she… https://t.co/uk2zOLEUWp pic.twitter.com/rZrAHUDMBk — PallaviCT (@pallavict) August 23, 2026

“अश्लील कपडे, भारतीय परंपरेचा लवलेशही नाही…”

जाहिरात व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कृती सेनन आणि जाहिरात निर्मात्यांवर टीका केली. एका युजरने जाहिरातीला आक्षेपार्ह म्हणत “अश्लील कपडे, यामध्ये भारतीय परंपरेचा लवलेशही नाही आणि चक्क श्वानाला राखी?” असा सवाल केला. तसेच या जाहिरातीविरोधात तक्रार करण्याचा इशाराही संबंधित युजरने दिला.

दुसऱ्या युजरने “आरतीचं ताट कुठं आहे? हे कसले कपडे घातले आहेत? हा तर सणाचा अनादर केलाय,” अशी प्रतिक्रिया दिली.

तर आणखी एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत “फक्त काही पैशांसाठी आमच्या हिंदू धर्माचा सण खराब करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवाल केला. तसेच जाहिरातीतील कपड्यांवरूनही या युजरने नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, सोशल मीडियावर या जाहिरातीवर टीका होत असली तरी, जाहिरात ही सणाच्या पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक आणि वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न असल्याचंही मानलं जाऊ शकतं. मात्र, सध्या कृती सेननची ही रक्षाबंधन जाहिरात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Mahakali Teaser: ‘महाकाली’चा टीझर रिलीज; अक्षय खन्नाच्या खतरनाक लूकने उडवली चाहत्यांची झोप, रिलीज डेटही जाहीर

Web Title: Kriti sanon raksha bandhan ad trolled dog rakhi outfit controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Kriti Sanon
  • Raksha Bandhan

संबंधित बातम्या

Mirzapur The Movie: पुणेकरांनो, सज्ज व्हा! प्रमोशनसाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम येणार चाहत्यांच्या भेटीला; साधणार खास संवाद
1

Mirzapur The Movie: पुणेकरांनो, सज्ज व्हा! प्रमोशनसाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम येणार चाहत्यांच्या भेटीला; साधणार खास संवाद

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका
2

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका

Mahakali Teaser: ‘महाकाली’चा टीझर रिलीज; अक्षय खन्नाच्या खतरनाक लूकने उडवली चाहत्यांची झोप, रिलीज डेटही जाहीर
3

Mahakali Teaser: ‘महाकाली’चा टीझर रिलीज; अक्षय खन्नाच्या खतरनाक लूकने उडवली चाहत्यांची झोप, रिलीज डेटही जाहीर

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल
4

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.