
Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
सरकारला फक्त फिल्म सिटी नाही बनवायची, तर एकदम आधुनिक, हाय-टेक फिल्म सिटी बनवायची आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी चित्रपटांचा दर्जा टिकवून ठेवत, त्यात नवीन तंत्रज्ञान जोडलं जाणार आहे. एखादा सिनेमा बनवायचा असेल तर त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील. शूटिंगसाठी वेगवेगळे सेट, लाईट, कॅमेरा, एडिटिंग, सगळं काही. त्यामुळे दिग्दर्शकाला दुसरीकडे कुठे जायची गरज पडणार नाही. रामटेक, नागपूर आणि नाशिक या तीनही ठिकाणी हा प्लॅन आहे.
मराठी सिनेमांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मराठी सिनेमांना जास्त थिएटर मिळावेत म्हणून सरकार एक विशेष प्लॅन तयार करत आहे. लवकरच त्याची घोषणा होईल.
फक्त थिएटरच नाही तर मराठी सिनेमांसाठी स्वतंत्र हाय-टेक फिल्म सिटी बनवण्याचा पण विचार सुरु आहे. यात सगळ्या लेटेस्ट सुविधा असतील, ज्यामुळे मराठी दिग्दर्शकांना मोठ्या बजेटचे सिनेमे पण इथेच बनवता येतील.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी याबद्दल माहिती दिली. मुंबईत आधीच फिल्म सिटी आहे, कर्जतला एनडी स्टुडिओ आहे, कोल्हापूरला पण सुविधा आहेत. आता सरकार रामटेक आणि नाशिकमध्ये नवीन फिल्म सिटी बनवणार आहे.
यासाठी जमीन पण ठरली आहे. रामटेकमध्ये 100 एकर जागेवर ही फिल्म सिटी उभी राहणार आहे. रामटेकचं लोकेशन खूप सुंदर आणि नैसर्गिक आहे. त्यामुळे नवगाव या ठिकाणी फिल्म सिटी बनवायचा निर्णय झाला आहे. हा निर्णय 2018 मध्येच झाला होता, तेव्हापासून जागा शोधणं सुरु होतं. आता भूसंपादन पूर्ण झालं आहे आणि लवकरच रामटेकमध्ये काम सुरु होईल.
कोल्हापूरमध्ये पण रेल्वे स्टेशनसह दोन-तीन नवीन शूटिंग लोकेशन बनवले जात आहेत.एकंदरीत, महाराष्ट्राने चित्रपटसृष्टीला नेहमीच मोठं योगदान दिलं आहे. आता या नवीन फिल्म सिटीमुळे मराठीसह हिंदी आणि इतर भाषांच्या सिनेमांचं शूटिंग महाराष्ट्रातच जास्त होईल आणि इथल्या तरुणांना पण काम मिळेल.