Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Cinema: मराठी सिनेसृष्टीसाठी मोठी बातमी! पॅनोरमा स्टुडिओजच्या साथीने सुजय डहाके आणणार ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’

Marathi Cinema: पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्सची सुजय डहाकेंच्या ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’साठी धोरणात्मक भागीदारी. दोन्ही सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 12, 2026 | 01:20 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Marathi Cinema:मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार आणि वेगळ्या आशयाच्या कथांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने पॅनोरमा स्टुडिओजने मोठं पाऊल उचललं आहे. पॅनोरमा स्टुडिओजने कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्ससोबत धोरणात्मक भागीदारी केली असून, या भागीदारीअंतर्गत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या दोन महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करण्यात येणार आहे. ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’ अशी या दोन चित्रपटांची नावं आहेत.

दोन्ही चित्रपटांचं मुख्य चित्रीकरण पूर्ण झालं असून सध्या ते पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहेत. लवकरच दोन्ही चित्रपटांच्या प्रमोशनला सुरुवात होणार असून, सप्टेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत हे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचं नियोजन आहे.

‘तुझ्या आयला’ २५ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

या भागीदारीतील पहिला चित्रपट म्हणजे ‘तुझ्या आयला’. सुजय डहाके दिग्दर्शित हा भावनिकदृष्ट्या प्रभावी चित्रपट आहे. पॅनोरमा स्टुडिओजचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि मुरलीधर छतवानी, कल्ट डिजिटलचे सुनील जैन, आदित्य जोशी आणि मोहित अरोरा तसेच प्रकाश फिल्म्सचे राजेश सिंह या चित्रपटाचे निर्माते आहेत.

मेघना प्रमाणीकर सहनिर्मित या चित्रपटात राजश्री देशपांडे, संभाजी भगत आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

‘रक्तफळ’मध्ये मॅड फँटसी-कॉमेडी-थ्रिलरचा अनुभव

या भागीदारीतील दुसरा चित्रपट ‘रक्तफळ’ हा समकालीन आणि युवा-केंद्रित मॅड फँटसी-कॉमेडी-थ्रिलर आहे. आधुनिक तरुणाईच्या भावनिक विरोधाभासांचा वेध घेणाऱ्या या चित्रपटात उपेंद्र लिमये, अमृता खानविलकर, गौरी नलावडे, केतकी कुलकर्णी, ‘कोटा फॅक्टरी’ फेम मयूर मोरे आणि इन्फ्लुएन्सर आदित्य ठाकरे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

गोव्यातील वेलनेस टुरिझम, नाइटलाइफ आणि वर्गीय महत्त्वाकांक्षा यांच्या पार्श्वभूमीवर ‘रक्तफळ’ची कथा आकार घेते. या चित्रपटाचं गोव्यातील ४० दिवसांचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. ‘रक्तफळ’ फेब्रुवारी–मार्च २०२७मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Madhuri Dixit : माधुरी झाली ‘कोण होणार करोडपती’ची होस्ट; पोस्टर पाहताच पती श्रीराम नेनेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

कुमार मंगत पाठक म्हणाले…

या भागीदारीबद्दल पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठक यांनी सांगितलं की, मराठी चित्रपटसृष्टी आणि तिच्याकडून सादर होणाऱ्या कथांवर त्यांचा कायम विश्वास राहिला आहे. मराठी संस्कृतीच्या मुळाशी जोडलेल्या, मात्र देशभरातील प्रेक्षकांशी संवाद साधण्याची क्षमता असलेल्या नव्या कथांना पाठबळ देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं.

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी

सुजय डहाके यांनी व्यक्त केला उत्साह

दिग्दर्शक सुजय डहाके यांनीही या भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त केला. सिनेमा हे भावनिकदृष्ट्या प्रामाणिक, सामाजिकदृष्ट्या संबंधित आणि सर्जनशीलदृष्ट्या निर्भीड कथा सांगण्याचं माध्यम असल्याचं त्यांनी म्हटलं. ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’च्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या विश्वांचा शोध घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्या एकत्रित पाठबळातून हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं सुजय डहाके यांनी म्हटलं.

मराठी सिनेमांना मिळणार व्यापक व्यासपीठ

कल्ट डिजिटलचे संस्थापक सुनील जैन आणि आदित्य जोशी तसेच प्रकाश फिल्म्सचे राजेश सिंह यांनीही या भागीदारीला महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. संस्कृतीच्या मुळाशी जोडलेल्या आणि समकालीन प्रेक्षकांशी संवाद साधणाऱ्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचा या सहकार्याचा उद्देश आहे.

दोन्ही चित्रपटांचं निर्मितीचं काम पूर्ण झालं असून, पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्यातील व्यापक धोरणात्मक सहकार्याची ही सुरुवात मानली जात आहे. राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची क्षमता असलेल्या दर्जेदार प्रादेशिक चित्रपटांना मोठं व्यासपीठ देण्यावर या भागीदारीचा भर असेल. दोन्ही चित्रपटांच्या मार्केटिंग प्लॅन आणि प्रदर्शनाच्या रणनीतीबाबत पुढील घोषणा लवकरच करण्यात येणार आहेत.

Web Title: Marathi cinema national award winning director sujay dahake is back major partnership for tuzya ayla and raktaphal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Legacy: KR$NA आणि Raftaarचा रॅप रिअॅलिटी शो आता हिंदी ZEE5 वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार
1

Legacy: KR$NA आणि Raftaarचा रॅप रिअॅलिटी शो आता हिंदी ZEE5 वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा
2

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज
3

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’
4

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.