Gondhal Movie on Oscar: ‘ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Gondhal Movie on Oscar: ‘ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ऑस्करला जाण्याआधी मेकर्सनी एक खास प्लॅन केला आहे. जगभरात चित्रपट रिलीज करण्याआधी भारतातल्या 6 मोठ्या शहरांमध्ये त्याचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले जाणार आहे.यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. 9 ऑक्टोबरपासून मुंबई आणि पुण्यातल्या प्रत्येकी 4 थिएटर्समध्ये हे स्पेशल स्क्रीनिंग सुरु होईल. त्यानंतर बाकीच्या शहरांमध्ये पण स्क्रीनिंग केले जाईल.
या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषेत दाखवला जाणार आहे. निर्मात्यांनी सांगितलं की स्क्रीनिंग झाल्यावर हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या सहा भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होईल. पण थिएटरमध्ये तो कधी येणार याची अद्याप माहिती समोर आली नाही.
‘गोंधळ’ हे नाव ऐकलं की आपल्याला आपल्या गावाकडचा तो पारंपरिक विधी आठवतो. जिथे संगीत असतं, नाच असतो आणि देवीच्या गोष्टी सांगितल्या जातात. याच गोंधळ या परंपरेच्या भोवती या चित्रपटाची कथा फिरते. ही गोष्ट आहे एका नवविवाहित जोडप्याची. सुमन नावाची एक बाई आहे, जी तिच्या लग्नात खुश नाही. तिचा प्रियकर आहे सर्जेराव, ज्याला गोंधळ या विधीचं खूप वेड आहे.
मग सुमन त्याच्या याच वेडेपणाचा फायदा घेते आणि एका पवित्र परंपरेला एका धोकादायक खेळात बदलते. पुढे काय होतं, यातून काय गोंधळ उडतो, हाच या चित्रपटाचा थरार आहे. या चित्रपटात इशिता देशमुख, किशोर कदम आणि योगेश सोहनी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन दोन्ही संतोष डावखर यांनीच केलं आहे.
या निवडीवर दिग्दर्शक संतोष डावखर खूप खुश आहे. तो म्हणाला, “हे स्पेशल स्क्रीनिंग म्हणजे फक्त चित्रपट लवकर दाखवणं नाहीये. तर ज्या लोकांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायला आवडतं, त्यांच्यासाठी हा एक खास अनुभव आहे.”तो पुढे म्हणाला, “गोंधळ ही कथा महाराष्ट्राच्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे. त्यातलं वातावरण, त्यातले आवाज हे मोठ्या पडद्यावरच अनुभवायला हवेत.
ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाल्यावर हा चित्रपट लोकांसमोर आणणं हे माझ्यासाठी खूप खास आहे. लोकांनी कोणताही अंदाज न बांधता थिएटरमध्ये यावं आणि या सायकोलॉजिकल प्रवासाचा अनुभव घ्यावा.”खरंच, एका मराठी चित्रपटाने थेट ऑस्करपर्यंत धडक मारली आहे, ही काही छोटी गोष्ट नाही. आता सगळ्यांच्या नजरा या चित्रपटाकडे लागल्या आहेत.






