फोटो सौजन्य - Social Media
नक्की काय आहे Milind Soman ची पोस्ट?
Milind Soman ने त्याच्या @milindrunning या सोशल मीडिया हॅण्डलवरून पोस्ट शेअर केली आहे. पोस्टखाली त्याने कॅप्शन देत बातमी जाहीर केली आहे. तो म्हणतो की, ” 1 मे रोजी, मी युरोप ते आफ्रिका, अगदी समुद्रात पोहून अंतर गाठले आहे, ते ही Strait of Gibraltar मधून! 15 किमीचे हे अंतर आहे. मी माझा हा प्रवास स्पेनच्या Tarifa येथून सुरु केला ते Morocco च्या कोस्टपर्यंत मी पाण्यात पोहत अंतर पार केले आहे.” तसेच काहीच दिवसात तो यासंबंधित आणखीन एक बातमी किंवा पोस्ट जाहीर करणार असल्याचे त्याने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.
पोस्टमध्ये, मिलिंद स्विमिंग अवतारात दिसत आहे. तसेच त्याचबरोबर त्याने त्याच्या पत्नीबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. शेअर केलेल्या एका Video मध्ये, मिलिंद समुद्रात पोहताना दिसत आहे. या पराक्रमाची प्रशंसा करत अनेक मराठी कलाकारांनीही कमेंट्स करत अभिनंदन केले आहे.
गेल्या वर्षी केला होता अनोखा प्रयोग!
आता मिलिंद सोमणचे वय 60 वर्ष आहे. वयाच्या साठाव्या वर्षी त्याने युरोप ते आफ्रिका, असा 15 किमीचा समुद्री प्रवास पोहत पार केला आहे. पण गेल्यावर्षी, त्याने intermittent fasting हा प्रयोग केला होता. या प्रयोगात त्याने 6 किलोग्रॅम वजन कमी केले होते. तो म्हणाला होता की त्याचे मित्र जरूर त्याला Fit आहेस वगैरे म्हणत असतील पण intermittent fasting मध्ये कमी झालेल्या 6 किलो वजनामुळे तो आणखीन समाधानी झाला आहे!






