वारंवार गॅस होऊन पोट फुगल्यासारख्या वाटते? जीवनशैलीत होणाऱ्या 'या' चुकांमुळे वाढतो अपचनाचा त्रास, आहारात करा बदल
अपचन होण्याची कारणे?
पचनक्रिया बिघडल्यानंतर त्यावरील उपाय?
गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक तणाव, आहारात सतत होणारे बदल, झोपेच्या वेळेत बदल, कोणत्याही वेळ जेवणे, जंक फूडच्या अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे पचनक्रिया बिघडून सतत ऍसिडिटी, आंबट ढेकर, उलट्या, मळमळ वाढते आणि अपचनाच्या समस्या उद्भवू लागतात. गॅस होणे, पोट फुगणे, ढेकर येणे किंवा जडपणा जाणवणे इत्यादी लक्षणे चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे उद्भवतात. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास पोटात जडपणा जाणवू लागतो, ज्याच्या परिणामामुळे कामात अजिबात लक्ष लागत नाही. संपूर्ण दिवस खूप जास्त कंटाळवाणा वाटतो.(फोटो सौजन्य – istock)
कामाच्या धावपळीमध्ये घाईघाईत नाश्ता आणि जेवण केले जाते. पण अन्नपदार्थ व्यवस्थित चावून न खाल्ल्यामुळे ते पचन होताना खूप जास्त समस्या उद्भवतात. अन्नपदार्थांचे सेवन करताना पोटात हवा सुद्धा जाते, ज्यामुळे पोटात गॅस होण्याची जास्त शक्यता असते. वारंवार पोटात गॅस किंवा अपचनाच्या समस्या उद्भवत असतील तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया जीवनशैलीतील कोणत्या चुकांमुळे अपचनाचा त्रास वाढतो.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जंक फूड खायला खूप जास्त आवडते. पण नेहमीच जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येण्याची शक्यता असते. सतत तिखट, तेलकट, मसालेदार खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि खाल्लेले अन्नपदार्थ आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते, ज्याच्या परिणामामुळे आंबट ढेकर येणे, अपचन होणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय भरपूर पाणी प्यावे. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर पचनक्रिया बिघडते.
भारतीय स्वयंपाक घरात जिरं, हिंग आणि ओवा इत्यादी पदार्थ कायमच उपलब्ध असतात. हे पदार्थ पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. ओवा खाल्ल्यामुळे पोटात वाढलेला गॅस कमी होण्यास मदत होते. हे पदार्थ पोटात वाढलेला जडपणा कमी होण्यास मदत होते. नियमित चालणे, हलका व्यायाम किंवा योगा केल्यामुळे पोटात वाढलेला गॅस कमी होतो आणि खाल्ल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल.
सतत चिंता, अपुरी झोप आणि मानसिक तणाव वाढल्यानंतर ऍसिडिटी आणि गॅसची समस्या उद्भवते. याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो. त्यामुळे आरोग्यासोबतच मनाची काळजी घेणे सुद्धा फार आवश्यक आहे. वारंवार अपचन होऊन पोटात वेदना किंवा ऍसिडिटी होत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा हृदयावर तणाव येऊ शकतो.
Ans: जंक फूडचे अधिक सेवन, वेळेवर न खाणे, जास्त तळकट पदार्थ, कमी पाणी पिणे, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास वाढू शकतो.
Ans: कोल्ड ड्रिंक्स, जास्त मसालेदार पदार्थ, फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळणे फायदेशीर ठरते.
Ans: दही, ताक, जिरे, आलं, फळे, हिरव्या भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास पचन सुधारण्यास मदत होते.






