फोटो सौजन्य - Social Media
Ladki Bahin Movie Trailer Launched!
‘Ladki Bahin’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये बहीण-भावाची कथा दाखवण्यात आली आहे. गरीब बहिणीला श्रीमंत भावाच्या घरी मिळणारी तुच्छ वागणूक आणि गरिबीतून सावरण्यासाठी परिस्थितीशी दिलेली लढत या सिनेमात दाखवण्यात आली आहे. परिस्थीतीशी लढताना शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना आणि त्यातून महिलांना मिळणार लाभ, यावर संपूर्ण कथा बेस आहेत. पुढे, त्यापासून महिलांनी सुरु केलेला उद्योग, त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यातून मिळालेला तोडगा त्यामुळे हा चित्रपट पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सिनेमात दिग्गज अभिनेत्रींनीं केलेय अभिनय!
‘लाडकी बहीण’ सिनेमात उषा नाडकर्णी, सुरेखा कुडची, उषा नाईक, स्मिता तांबे, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, दर्शना जोकरे तसेच मेघा शिंदे अशा अनेक अभिनेत्रींनीं अभिनय केला आहे. तर सिनेमात माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विश्वकर्मा तसेच सिद्धेश्वर झाडबुके झळकणार आहेत. शीतल शिंदे या सिनेमाची निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा पोस्टर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते लाँच करण्यात आला होता.
सिनेमा 15 मेपासून संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे.






