Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच; चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज

Pach Futacha Bachchan Movie : एका तडफदार कीर्तनकार तरुणीच्या आयुष्यावर आधारित ‘पाच फुटाचा बच्चन’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 02, 2026 | 05:19 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कीर्तनकार तरुणीची अनोखी गोष्ट!
  • ‘पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
  • ‘या’ दिवशी होणार रिलीज
Pach Futacha Bachchan Movie : आपल्या अनोख्या नावाने चर्चेत असलेल्या, एका कीर्तनकार तरुणीची गोष्ट सांगणाऱ्या ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. उत्तम कलाकारांचा समावेश असलेला हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ( Pach Futacha Bachchan Movie ) 

Toxic Worldwide Collection: सातव्या दिवशी ‘टॉक्सिक’च्या कमाईत मोठी वाढ; वर्ल्डवाइड कलेक्शन पोहोचलं इतक्या कोटींवर

कोणत्या कथेवर आधारीत?

‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटात तरूण कीर्तनकार मुलीची गोष्ट आहे. तिच्या कीर्तनात कोल्हापुरी भाषा आहे. संतांचे अभंग तिला मुखोद्गत आहेत. जनमानसात तिचं प्रचंड नाव आहे. उंचीने पाच फूट असलेल्या या तडफदार मुलीला ‘पाच फुटाचा बच्चन’ म्हणून ओळखलं जातं. या प्रमुख भूमिकेतून श्रुती मधुदीप ही अभिनेत्री पदार्पण करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टिजरने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. यात तगड्या कलाकारांची फौज आहे.

कीर्तन विषयाला सिनेमाची साद

त्यांचे नवे लुक बघून, पात्रांची झलक बघून उत्सुकता तयार होते आहे. मराठी मनाला भावणाऱ्या कीर्तन या विषयाला हा सिनेमा साद घालतो आहे, असं दिसतं आहे. अवघ्या दीड मिनिटाचा हा टीजर अत्यंत नाट्यमय असून त्यातील दृश्यांनी प्रेक्षकांची मने खिळवून ठेवली आहेत. या चित्रपटात नेमकं काय घडणार आहे, याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.

नाटकाला तूफान प्रतिसाद

मूळ प्रायोगिक एकपात्री नाटकातून मांडण्यात आलेल्या या गोष्टीला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. मराठी मनाची नस पकडेल अशा या नाटकाचे चित्रपटात रूपांतर झाले आहे. नाटकातून चित्रपटात रूपांतर होण्याच्या या दैदीप्यमान यादीत या चित्रपटाचे नाव जोडले गेल्याने या चित्रपटाविषयीचं कुतूहल वाढलं आहे. या नाट्यमय कलाकृतीत नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज

कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात श्रुती मधुदीप, गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमीत, क्षितीश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे, विनोद वणवे यांच्या भूमिका आहेत. अभिषेक शेटे यांनी छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, तर प्रदीप आवटे यांनी गीतलेखन केले आहे.

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट

Web Title: Pach futacha bachchan teaser launched star cast and details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Music Launch :’दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगली मैफल! अशोक सराफ यांची तबल्यावर साथ, राहुल देशपांडे यांचे सुरेल सादरीकरण
1

Music Launch :’दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगली मैफल! अशोक सराफ यांची तबल्यावर साथ, राहुल देशपांडे यांचे सुरेल सादरीकरण

Prahaar Movie Review: न्यायालयात डावपेच, आयुष्यात संघर्ष; राजकुमार रावसमोर मराठमोळ्या ललित प्रभाकरची ताकदीने भूमिका
2

Prahaar Movie Review: न्यायालयात डावपेच, आयुष्यात संघर्ष; राजकुमार रावसमोर मराठमोळ्या ललित प्रभाकरची ताकदीने भूमिका

MTDC Guhagar Film City : कोकणात तयार होणार नवी ‘फिल्म सिटी’! गुहागरच्या पालशेतमध्ये प्रकल्प उभारणार; आशिष शेलार यांचे निर्देश
3

MTDC Guhagar Film City : कोकणात तयार होणार नवी ‘फिल्म सिटी’! गुहागरच्या पालशेतमध्ये प्रकल्प उभारणार; आशिष शेलार यांचे निर्देश

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड
4

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.