Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!

Deool band 2 OTT: प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद 2’ या मराठी सिनेमाने थिएटरमध्ये मोठा गाजावाजा करत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. 21 मे रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट 50 दिवसांहून अधिक काळ अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल राहिला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 12, 2026 | 12:10 PM
Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Deool Band 2 OTT Release: प्रवीण तरडे म्हटलं की विषयच संपला. त्याच्या ‘देऊळ बंद 2’ ने थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 100 कोटीचा आकडा पार केला आणि आता हा सिनेमा तुमच्या मोबाईलवर येणार आहे .’देऊळ बंद 2′ आता Amazon Prime Video वर आज रात्री 12 नंतर येणार आहे. ज्यांनी थिएटरमध्ये बघितला नसेल त्यांच्यासाठी एकदम पर्वणीच आहे.

थिएटरमध्ये काय झालं होतं?

21 मे ला हा सिनेमा रिलीज झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रातच नाही तर बाहेर पण लोकांनी डोक्यावर घेतला. 50 दिवसापेक्षा जास्त काळ थिएटर हाऊसफुल्ल होते. रात्रीचा शेवटच्या शो पासून ते सकाळच्या पहिल्या शो पर्यंत चित्रपटगृहाच्या पाठीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत होते. असे मराठी सिनेमाबाबत खूप कमीवेळा घडतं. या सिनेमाने 100 कोटीपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचला आहे. Deool band 2 OTT:

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर

प्रवीण तरडे पोस्टमध्ये लिहितात की,

सिनेमा OTT वर येणार असल्याची प्रवीण तरडेंनी स्वतः इंस्टावर पोस्ट टाकली. पोस्टमध्ये लिहितात की, “आपला ‘देऊळ बंद 2’ आता Amazon Prime वर बघता येणार आहे. ज्यांनी अजून बघितला नाही त्यांनी नक्की बघा. आणि ज्यांनी बघितलाय त्यांनी परत बघा, कारण हा सिनेमा कितीही वेळा बघितला तरी मन भरत नाही आणि डोळ्यातलं पाणी थांबत नाही.”त्याच्या या पोस्टवर लगेच हजारो लाईक्स आणि कमेंट आल्या आहेत.

सिनेमाची कथा काय आहे?

हा सिनेमा आहे 2015 च्या ‘देऊळ बंद’ चा दुसरा भाग आहे. या दुसऱ्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांचं दुःख आणि स्वामी समर्थांवर असलेली श्रद्धा हे सगळं दाखवलंय. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली लढाई अगदी बरोबर पद्धतीने मांडली आहे. त्यामुळेच लोकांना हा सिनेमा आपलासा वाटला. सिनेमात स्टारकास्ट पण एकदम तगडी आहे. प्रवीण तरडे स्वतः आहेच, सोबत मोहन जोशी, प्रसाद ओक, महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे, मंगेश देसाई, ओम भुतकर, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर आणि अजून बरेच मोठे कलाकार आहेत. सगळ्यांनीच काम एक नंबर केलं आहे. ज्यांना थिएटरमध्ये गर्दीमुळे बघता आला नाही, किंवा ज्यांना परत एकदा कुटुंबासोबत बघायचाय, त्यांनी आता Prime Video वर नक्की बघा. एकदा बघितल्यावर तुम्ही पण म्हणाल, हा फक्त सिनेमा नाही, आपल्या मातीतली गोष्ट आहे.

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका

 

Web Title: Pravin tardes 100 crore marathi hit to stream on amazon prime video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi movie
  • OTT
  • pravin tarade

संबंधित बातम्या

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका
1

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर
2

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर

Aali Mothi Shahani Movie: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन
3

Aali Mothi Shahani Movie: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन

Adkitta Marathi Movie Review: पालकत्व, विश्वास अन् नात्यांची गुंतागुंत; सई ताम्हणकरचा ‘अडकित्ता’ नेमका कसा आहे?
4

Adkitta Marathi Movie Review: पालकत्व, विश्वास अन् नात्यांची गुंतागुंत; सई ताम्हणकरचा ‘अडकित्ता’ नेमका कसा आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.