Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दीपची ‘सुलू आत्या’, फसवणूक सहन न करणारी स्वाभिमानी सुलोचना; सुहास परांजपे यांनी उलगडले भूमिकेचे पैलू

नुकतीच झी मराठीवर सुरू झालेली मालिका दीपज्योती हळूहळू प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत आहे आणि त्यातील सुलू आत्या अर्थात अभिनेत्री सुहास परांजपेची भूमिकाही प्रेक्षकांना भावते आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 28, 2026 | 11:27 AM
अभिनेत्री सुहास परांजपे यांनी उलडगले भूमिकेचे कंगोरे

अभिनेत्री सुहास परांजपे यांनी उलडगले भूमिकेचे कंगोरे

Follow Us
Follow Us:
  • दीपज्योतीमध्ये सुलू आत्याची भूमिका साकारतेय सुहास परांजपे
  • दीपची आत्या म्हणून कशी आहे सुहास 
  • भूमिकेचे काय आहे अनेक पैलू 
मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वातील एक अत्यंत अनुभवी आणि अष्टपैलू नाव म्हणजे अभिनेत्री सुहास परांजपे . आजवर त्यांनी आपल्या अभिनयाने विविध भूमिका अजरामर केल्या आहेत. सध्या त्या ‘झी मराठी’वरील ‘दीपज्योती’ या नवीन मालिकेत ‘सुलोचना’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. एका कडक खलनायिकेच्या भूमिकेनंतर, आता एका प्रेमळ आत्याच्या आणि घराची जबाबदारी पेलणाऱ्या गृहिणीच्या रूपात त्या प्रेक्षकांसमोर येत आहेत. या मालिकेतील त्यांचा अनुभव आणि भूमिकेच्या विविध छटांविषयी त्यांनी साधलेला हा खास संवाद. 

ही व्यक्तिरेखा नक्की कशी आहे असा प्रश्न आल्यानंतर सुहास यांनी सांगितले की, “दीपज्योतीमधील माझ्या व्यक्तिरेखेचे नाव ‘सुलोचना’ आहे. सुलोचना ही पुरुषोत्तम गायकवाड यांची धाकटी बहीण असून त्यांच्या तीन मुलांची आत्या आहे. ती अतिशय प्रेमळ आहे. तिचे आपल्या तिन्ही भाच्यांवर खूप प्रेम आहे, पण तिचा जास्त जीव ‘दीप’वर आहे. या मालिकेत असं दिसेल की सुलोचनाचा नवरा आणि पुरुषोत्तम बिझनेस पार्टनर असतात, पण तिचा नवरा व्यवसायात पुरुषोत्तमची फसवणूक करतो. हा खोटेपणा तिला सहन होत नाही, म्हणून ती स्वतःचे घर सोडून भावाकडे राहायला येते. वहिनीच्या पश्चात ती आपल्या भावाच्या मुलांचा सांभाळ करते आणि त्यांचे घरही सावरते.”

Exclusive: ‘टिपिकल मुलगी साकारणं जास्त आव्हानात्मक’ अभिनेत्री पूर्वा कौशिकच्या ‘दीपज्योती’ मधील वेगळ्या प्रवासाला सुरूवात

ही भूमिका का स्वीकारावीशी वाटली? “या भूमिकेसाठी मला ‘फ्रेम्स प्रॉडक्शन’मधून फोन आला होता. याआधी त्यांच्यासोबत काम केलं असल्याने संपूर्ण युनिट आणि प्रॉडक्शन हाऊस माझ्या परिचयाच होत. त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येईल असं मला वाटलं आणि सध्या शूटिंग करताना ती मजा येतेय. सेटवरची सर्व मंडळी खूप छान आहेत. त्यांनी मला पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली, याचा मला खूप आनंद झाला.माझी ही भूमिका आधीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे, कारण याआधी मी एका मालिकेत पूर्णपणे खलनायिका साकारली होती.  मात्र, ‘दीपज्योती’ मालिकेत मी खलनायिका नसून सर्वांना सांभाळून घेणारी, प्रेम करणारी एक साधी गृहिणी आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्या आधीच्या कामापेक्षा पूर्णपणे वेगळी आणि सकारात्मक आहे.”

कलाकारांशी आधीपासूनच ओळख होती का? “माझे सहकलाकार जवळजवळ सगळेच नवीन आहेत; फक्त शलाकासोबत मी याआधी काम केलं आहे. सध्या मी ज्यांच्यासोबत काम करत आहे, ते सर्वच कलाकार मनापासून आणि खूप छान काम करत आहेत. सेटवरची टीम आधीच ओळखीची असल्यामुळे वातावरण खूप आनंदी असतं.”

‘मला भीती होती…’ दीपज्योती मध्ये पूर्वा कौशिक चा नवा अवतार, मालिकेतील भूमिकेबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा

अभिनय क्षेत्रात कशी आलीस? या प्रश्नावर सुहासने सांगितले की, “अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय असा  घेतला कि, पूर्वी मी नोकरी करत होते . त्यानंतर चंद्रशेखर गोखले यांचं ‘अनोळखी ओळख’ नावाचं व्यावसायिक नाटक माझ्याकडे आलं. ते माझं अभिनय क्षेत्रातील पहिलंच नाटक होतं. त्यानंतर ‘रानभूल’, ‘ऑल द बेस्ट’ अशा नाटक आणि मालिकांचा प्रवास सुरू झाला आणि मग मी अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. मला वाचनाची खूप आवड आहे. तसेच मला नवनवीन ठिकाणी फिरायला प्रचंड आवडतं. पूर्ण जग फिरण्याचं माझं स्वप्न आहे.”

Web Title: Actress suhas paranjpe spoken about her role in deepjyoti marathi serial on zee marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • marathi serial update
  • New Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका
1

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
2

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार
3

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर
4

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.