Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Gurav Divorce: ८ वर्षांचं नातं संपलं! ‘आई कुठे काय करते’ फेम अक्षया गुरवचा घटस्फोट; घटस्फोटावर पहिल्यांदाच केलं भाष्य

Akshaya Gurav Divorce: ‘आई कुठे काय करते’ फेम अक्षया गुरवने दिग्दर्शक भूषण वाणीसोबतच्या घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला. म्हणाली, “तुम्ही कोणालाही थांबवू शकत नाही.”

  • By अमृता यादव
Updated On: Aug 30, 2026 | 10:41 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • घटस्फोटावर अक्षया गुरवचं पहिल्यांदाच भाष्य
  • विभक्त झाल्यानंतरही मैत्री कायम
  • ८ वर्षांच्या संसारानंतर भूषण वाणीसोबत घेतला वेगळं होण्याचा निर्णय
Akshaya Gurav Divorce: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया गुरव गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्षया गुरवने दिग्दर्शक भूषण वाणीसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अक्षयाने घटस्फोटाच्या वृत्तावर मौन सोडलं असून, दोघे विभक्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अक्षया आणि भूषण वाणी यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. सुरुवातीला या सगळ्या चर्चांमुळे अक्षयाला हे स्वीकारणं कठीण गेलं. मात्र, कालांतराने या विषयावर आपल्याला बोलावंच लागेल, असं तिला वाटलं.

याबाबत बोलताना अक्षया म्हणाली, “जेव्हा माझ्या घटस्फोटाची बातमी समोर आली, तेव्हा अनेकांनी ही बातमी प्रसारित केली होती. या सगळ्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जोरदार चर्चा झाली. सुरुवातीला मला हे सगळं पटलं नाही. पण नंतर कुठेतरी वाटलं की, मला या गोष्टीवर कधीतरी बोलावंच लागेल. जे काही लोकांनी वाटलं आहे, पाहिलंय.. तर हो! ही गोष्ट खरी आहे.”

Samay Raina: समय रैना पुन्हा अडचणीत! ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील बिहारी-कश्मीरी कमेंटवरून सोशल मीडियावर संताप

विभक्त झाल्यानंतरही मैत्री कायम

अक्षयाने घटस्फोटाबाबत स्पष्टपणे सांगतानाच भूषण वाणीसोबतचं नातं आता कोणत्या स्वरूपाचं आहे, हेही सांगितलं. दोघेही आजही चांगले मित्र असल्याचं तिने म्हटलं. तसंच दोघेही एकाच क्षेत्रात काम करत असल्याने भविष्यात एकत्र काम करण्याची संधी मिळाली, तर त्यांना नक्कीच आवडेल, असंही अक्षयाने सांगितलं.

“आम्ही दोघे आजही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही दोघंही एकाच क्षेत्रातले आहोत. त्यामुळे पुढे जर अशी वेळ आली, तर आम्हाला एकत्र काम करायला आवडेल. आपण आयुष्यात गोष्टी ‘लेट गो’ करायला शिकलं पाहिजे,” असं अक्षया म्हणाली.

‘Toxic’ Box Office Collections Day 4: नकारात्मक प्रतिक्रियांनंतरही ‘टॉक्सिक’ची घोडदौड; चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम

“तुम्ही कोणालाही थांबवू शकत नाही”

नात्यांमध्ये एखाद्या व्यक्तीला पुढे जायचं असेल, तर तिला थांबवण्यात अर्थ नसतो, असा महत्त्वाचा संदेशही अक्षयाने दिला. आपल्या जवळच्या व्यक्तीने दिलेला सल्ला तिने यावेळी सांगितला.

“माझ्या जवळच्या व्यक्तीने मला सांगितलं होतं की, प्रेमात माणसाने नेहमी नि:स्वार्थी असलं पाहिजे, स्वार्थी नाही. त्यामुळे एखाद्याला आपल्या आयुष्यातून कायमच निघून जायचं असेल, तर आपण त्याला जाऊ द्यायचं. त्याला थांबवण्यात काहीही अर्थ नाहीये,” असं अक्षया म्हणाली.

पुढे ती म्हणाली, “मग ती मैत्री असो, कुटुंब असो किंवा नवरा-बायकोचं नातं असो… तुम्ही कोणालाही थांबवू शकत नाही. यादरम्यान खूप त्रास होतो. मी रडलेय… पण आपलं आयुष्य इथेच थांबत नाही.”

“दु:ख चेहऱ्यावर दिसतं, कलाकार असल्याने लक्ष ठेवावं लागतं”

वैयक्तिक आयुष्यातील भावनिक चढ-उतारांचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो, असंही अक्षयाने सांगितलं. मात्र, कलाकार असल्याने कामाच्या ठिकाणी स्वतःला सावरावं लागतं. त्यामुळेच ती आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करते.

“बरं, दु:ख चेहऱ्यावर दिसतं. कलाकार असल्याने त्याकडे लक्ष ठेवावं लागतं. म्हणूनच मी माझं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवते. आता पुढे बघुयात, आयुष्य कुठे घेऊन जातंय,” असं म्हणत अक्षयाने आपल्या आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा निर्धार व्यक्त केला.

अक्षयाच्या या स्पष्ट वक्तव्यानंतर तिच्या आणि भूषण वाणी यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विभक्त झाल्यानंतरही दोघांनी मैत्री कायम ठेवली असून, भविष्यात कामाच्या निमित्ताने एकत्र येण्याची शक्यता असल्याचं अक्षयाने स्पष्ट केलं आहे.

Web Title: Akshaya gurav divorce bhushan vani first reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Divorce
  • Entertainemnt News
  • marathi actress

संबंधित बातम्या

Salman Khan: ‘सलमानने मला शिवी दिली अन्…’,दिग्दर्शकाने सांगितला पार्टीतील धक्कादायक किस्सा, सलीम खान यांनी असा सोडवला वाद
1

Salman Khan: ‘सलमानने मला शिवी दिली अन्…’,दिग्दर्शकाने सांगितला पार्टीतील धक्कादायक किस्सा, सलीम खान यांनी असा सोडवला वाद

Samay Raina: समय रैना पुन्हा अडचणीत! ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील बिहारी-कश्मीरी कमेंटवरून सोशल मीडियावर संताप
2

Samay Raina: समय रैना पुन्हा अडचणीत! ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील बिहारी-कश्मीरी कमेंटवरून सोशल मीडियावर संताप

‘Toxic’ Box Office Collections Day 4: नकारात्मक प्रतिक्रियांनंतरही ‘टॉक्सिक’ची घोडदौड; चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम
3

‘Toxic’ Box Office Collections Day 4: नकारात्मक प्रतिक्रियांनंतरही ‘टॉक्सिक’ची घोडदौड; चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode
4

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.