Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan: ‘सलमानने मला शिवी दिली अन्…’,दिग्दर्शकाने सांगितला पार्टीतील धक्कादायक किस्सा, सलीम खान यांनी असा सोडवला वाद

Salman Khan:सुभाष घई यांनी सलमान खानसोबत झालेल्या भांडणाचा खुलासा केला. पार्टीतील वाद हातापाईपर्यंत पोहोचला होता. सलीम खान यांनी सलमानला घईंची माफी मागायला सांगितली.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 30, 2026 | 10:00 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Salman Khan: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आणि अभिनेता सलमान खान यांनी २००८ मध्ये ‘युवराज’ या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. मात्र, या चित्रपटाच्या आधी दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. एका पार्टीत झालेल्या या वादाचे रूपांतर थेट हातापाईपर्यंत पोहोचले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणात सलमान खान यांचे वडील आणि प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान यांना मध्यस्थी करावी लागली होती.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सुभाष घई यांनी सलमानसोबत ‘युवराज’मध्ये काम करण्यामागची कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की, चित्रपटासाठी सलमान खान यांच्या भावाने त्यांच्याशी संपर्क साधला होता. “तुम्ही सलमानसोबत चित्रपट का बनवत नाही?” असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर घई यांनी सलमान या चित्रपटासाठी तयार आहेत का, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी एक कथा लिहिली आणि सलमानसाठी वेगळी भूमिका तयार करण्याचा प्रयत्न केला.

‘पार्टीत सलमानसोबत माझं भांडण झालं, हातापाईही झाली’

मुलाखतीत सुभाष घई यांनी सलमान खानसोबत झालेल्या जुन्या वादाचा किस्साही सांगितला. “चित्रपटापूर्वी आमचं भांडण झालं होतं. हातापाईही झाली होती. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना फटकारलं,” अशी आठवण त्यांनी सांगितली.

घई यांनी पुढे सांगितलं की, ही घटना एका पार्टीदरम्यान घडली होती. सलमान त्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होता आणि काही चुकीच्या गोष्टी बोलत होता. घई यांनी त्याला तसं बोलू नकोस, असं सांगितलं. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला.

सलमानने घई यांच्यावर काही गोष्टींबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर “डायरेक्टर म्हणून तो माझा निर्णय होता,” असं घई यांनी स्पष्ट केलं. मात्र, वाद वाढत गेला आणि सलमानने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घई यांनी त्याला असं न करण्यास सांगितलं, पण परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दोघांमध्ये हातापाई झाली.

‘Toxic’ Box Office Collections Day 4: नकारात्मक प्रतिक्रियांनंतरही ‘टॉक्सिक’ची घोडदौड; चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम

सलीम खान यांनी सलमानला माफी मागायला पाठवलं

या घटनेनंतर सलीम खान यांनी मुलाला चांगलंच झापलं. दुसऱ्याच दिवशी सलीम खान यांनी सुभाष घई यांना फोन करून सलमानने आईला घडलेला प्रकार सांगितल्याचं म्हटलं. “मी त्याला ओरडलो आहे,” असं सलीम खान यांनी घई यांना सांगितलं.

इतकंच नाही तर त्यांनी सलमानला सुभाष घई यांच्या घरी जाऊन माफी मागण्यास सांगितलं. त्यानंतर सलमान घई यांच्या घरी गेला आणि अत्यंत नम्रपणे त्यांची माफी मागितली.

सलमानने वडिलांचा आदेश मानून माफी मागितल्याने सुभाष घई यांना त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. त्यांनीही तो प्रसंग तिथेच विसरून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही अधूनमधून भेटत राहिले आणि अखेर २००८ मध्ये ‘युवराज’ या चित्रपटासाठी त्यांनी एकत्र काम केलं.

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode

Web Title: Salman khan subhash ghai fight salim khan apology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • bollywood Flim
  • Entertainemnt News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Salman Khan: सलमान खान पुन्हा गाजवणार रुपेरी पडदा, ‘मॉन्स्टर’साठी ५० दिवसांची खास रणनीती
1

Salman Khan: सलमान खान पुन्हा गाजवणार रुपेरी पडदा, ‘मॉन्स्टर’साठी ५० दिवसांची खास रणनीती

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
2

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
3

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
4

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.