Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोच्या निर्मितीत आता प्रेक्षकांना थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. लोगो डिझाइन स्पर्धेसाठी १४ ऑगस्ट ही अंतिम मुदत असून, निवड झालेल्या टॉप ३ विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांसोबतच मालिकेतील कलाकारांची भेट घेण्याची संधी मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2026 | 05:06 PM
‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट

‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट

Follow Us
Follow Us:
  • ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोमध्ये प्रेक्षकांचा थेट सहभाग!
  • १४ ऑगस्ट अंतिम मुदत
  • टॉप ३ विजेत्यांना पारितोषिकांसह कलाकारांची भेट
Marathi Warasa: अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी ऐतिहासिक मालिका ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ सध्या ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. मालिकेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रेक्षकांच्या मागणीनुसार आता १७ ऑगस्ट ते २२ ऑगस्टदरम्यान, सोमवार ते शनिवार, मालिकेचे नवे भाग सलग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर ‘मराठी वारसा’ने आपल्या डिजिटल प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा जाहीर केला आहे. वाहिनीची नवी ओळख आणि नवा लोगो साकारताना प्रेक्षकांनाही या प्रक्रियेत थेट सहभागी करून घेण्यात येणार आहे.
‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची संकल्पना प्रेक्षकांनी आपल्या कल्पकतेतून आणि सर्जनशीलतेतून साकारावी, यासाठी विशेष लोगो डिझाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मराठी वारसा’च्या विचारधारेचे, मराठी संस्कृतीचे आणि या वाहिनीशी जोडलेल्या भावनेचे प्रतिनिधित्व करणारा नावीन्यपूर्ण लोगो तयार करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार आहे.

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्रणाम’ संगीतोत्सव; जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल-तौफिक कुरेशींसह दिग्गजांची मांदियाळी

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या कल्पनेतून तयार केलेली लोगोची प्रवेशिका १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाठवता येणार आहे. प्राप्त प्रवेशिकांमधून उत्कृष्ट आणि सर्जनशील लोगोची निवड केली जाणार असून, पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. AI-निर्मित लोगो स्वीकारला जाणार नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली लोगो प्रवेशिका ऑनलाइन पद्धतीने सादर करावी. प्रवेशिका सादर करण्यासाठी या https://marathiwarasa.com/logo-competition/ संकेतस्थळाला भेट द्यावी स्पर्धेचे नियम, अटी, प्रवेशिका सादर करण्याची प्रक्रिया तसेच इतर आवश्यक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या स्पर्धेचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे विजेत्यांना ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटवर भेट देऊन मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची विशेष संधी मिळणार आहे. त्यामुळे केवळ लोगो डिझाइन करण्याचीच नव्हे, तर आपल्या आवडत्या मालिकेच्या निर्मिती प्रक्रियेचा जवळून अनुभव घेण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे. या अनोख्या उपक्रमाची माहिती देणारा विशेष व्हिडिओ अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर केला आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हा उपक्रम शक्य झाल्याचे सांगत त्यांनी या अभिनव संकल्पनेबद्दल आनंद व्यक्त केला.

याविषयी अमोल कोल्हे म्हणाले, “एखादी मालिका यशस्वी ठरते ती केवळ कलाकार किंवा तंत्रज्ञांमुळे नाही, तर प्रेक्षकांच्या विश्वासामुळे. ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ला मिळालेलं प्रेम हे आमच्यासाठी मोठं बळ आहे. म्हणूनच या प्रवासात प्रेक्षकांनाही सहभागी करून घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना आणि त्यांचा आवाजच ‘मराठी वारसा’च्या नव्या ओळखीचा भाग होणार आहे. हा फक्त लोगो बदल नाही, तर प्रेक्षकांशी असलेलं नातं अधिक दृढ करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.”

डिजिटल माध्यमांमध्ये प्रेक्षकांना केवळ आशयाचे ग्राहक न मानता, ब्रँडच्या ओळखीच्या निर्मितीत त्यांचा थेट सहभाग करून घेण्याचा हा प्रयोग निश्चितच वेगळा आणि अभिनव ठरणार आहे. ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या कल्पना आणि वाहिनीची नवी ओळख यांचा सुंदर संगम घडणार आहे.

Bharat Bhhagya Viddhaata : ‘ही कथा सांगायलाच हवी’! दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी सांगितला चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास

Web Title: Marathi warasa new logo contest public participation august 14

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • entertainment
  • maharashtra

संबंधित बातम्या

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ
1

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

टीबीमुक्त भारतासाठी ‘रील’चा फंडा; परिचारिका आणि विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी
2

टीबीमुक्त भारतासाठी ‘रील’चा फंडा; परिचारिका आणि विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी
3

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित
4

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.