Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Avadhoot Gupte: मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते पुन्हा एकदा ‘सारेगमप’च्या मंचावर परीक्षक म्हणून परतले आहेत. नव्या पर्वात नव्या पिढीतील गायकांचे आवाज, त्यांची संगीताकडे पाहण्याची बदललेली दृष्टी आणि सोशल मीडियाचा संगीतविश्वावर झालेला प्रभाव पाहायला मिळणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 22, 2026 | 04:39 PM
Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अवधूत गुप्तेंचं ‘सारेगमप’मध्ये परीक्षक म्हणून पुनरागमन
  • नव्या पिढीतील आवाज आणि संगीतशैलीवर विशेष भर
  • सोशल मीडियामुळे बदललेल्या संगीतविश्वावर अवधूत गुप्तेंची भूमिका
Avadhoot Gupte: मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि परीक्षक अवधूत गुप्ते पुन्हा एकदा ‘सारेगमप’च्या मंचावर परीक्षकाच्या भूमिकेत परतले आहेत. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या ‘सारेगमप’च्या या नव्या पर्वात नव्या पिढीचे नवे आवाज, त्यांची संगीताकडे पाहण्याची बदललेली दृष्टी आणि सोशल मीडियामुळे बदललेलं संगीतविश्व पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने त्यांनी नव्या पिढीचं संगीत, सोशल मीडियाचा प्रभाव, स्पर्धकांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या संगीतप्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

१. ‘सारेगमप’ हा अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचा आवडता संगीत रिअॅलिटी शो आहे. या नव्या पर्वात प्रेक्षकांना काय नवीन आणि खास पाहायला मिळणार आहे?

‘सारेगमप’मध्ये खूप काही नवीन आणि खास पाहायला मिळणार आहे. नवीन टॅलेंट, नवीन चेहरे, नवीन आवाज आणि नावीन्य असलेली नवी पिढीच पाहायला मिळेल, असं म्हणायला हरकत नाही. आताची पिढी खूप स्मार्ट आहे. त्यांचं जीवनमान त्यांच्या पद्धतीने बदललं आहे. ही पिढी खूप फास्ट आहे. नव्या पिढीचं संगीत आत्मसात करण्याचं माध्यम, संगीत उपभोगण्याचं माध्यमही बदललं आहे. आता सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधून नव्या पिढीला गाणी मिळत असतात आणि ती त्यांना आकर्षित करत असतात. अशा पिढीचं गाणं आपण यावेळेस ‘सारेगमप’ मध्ये ऐकणार आहोत. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हेच या सीझनचं सगळ्यात मोठं नावीन्य असेल, असं मला वाटतं.

२. अनेक वर्षांत तुम्ही अनेक नवोदित गायकांचा प्रवास जवळून पाहिला आहे. आजच्या स्पर्धकांमध्ये तुम्हाला कोणता वेगळेपणा जाणवतो?

अनेक वर्षांचा अनुभव असला तरी माझ्यासाठी गाणं म्हणजे संगीताचे जे सात सूर आणि ताल आहेत, जे कधीच बदलत नाहीत. मात्र त्यामागचा भाव बदलत असतो. हा बदलणारा भाव सध्याच्या समाजाचं प्रतिबिंब दाखवत असतो. आजची जी पिढी आहे ती आधीच्या पिढीपेक्षा खूप वेगळी आहे एकदम स्पष्ट मतांची, स्पष्टवक्ती . ज्याला नमस्कार करावासा वाटतो, त्यालाच ही पिढी नमस्कार करते. हल्लीची पिढी खूप विचार करते. समोरच्या माणसाच्या पात्रतेप्रमाणे वागते.

३. आज सोशल मीडियामुळे गायकांना स्वतःची ओळख निर्माण करणं सोपं झालं आहे. अशा काळात ‘सारेगमप’सारख्या व्यासपीठाचं महत्त्व काय आहे, असं तुम्हाला वाटतं?

‘सारेगमप’ची संपूर्ण टीम शिक्षणापेक्षा संस्कार देण्याचा जास्त प्रयत्न करत असते. म्हणायचं झालं तर सगळंच आज इंटरनेटवर अगदी सहज उपलब्ध आहे. गाण्यातील राग म्हणा, यमन म्हणा, त्यासाठी आता ऑनलाइन बरीच माहिती उपलब्ध आहे. फुकट नऊ-दहा लोक तुम्हाला एका युट्युब सर्चच्या माध्यमातून शिकवताना दिसतात. पण परीक्षक म्हणून आमचं काम नुसतं गाण्याचं शिक्षण देणं नाही, तर त्याचे संस्कार स्पर्धकाला देणं हे आहे. मी ठामपणे म्हणेन, नुसतं शिक्षणापेक्षा संस्कार देणं हे कायम ‘सारेगमप’ने केलं आहे. हे संस्कार सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर फार महत्त्वाचे झाले आहे.

कारण आज सोशल मीडियाचा वापर करून एखाद्या चांगल्या गायकाने एखादी चांगली कलाकृती करून सोशल मीडियावर टाकली, तर त्याला किती लाईक्स आले आहेत यावर तो स्वतःची पात्रता ठरवतो, जे अत्यंत चुकीचं मत आहे. कदाचित तो सर्वोत्कृष्ट गायक असेल आणि त्याला प्रोत्साहनाची गरज असेल. पण सोशल मीडियाच्या कमर्शियल गोष्टींमुळे त्याचा टिकाव जरी लागत असेल, तरी त्याला थांबवून सांगणं महत्त्वाचं आहे की सोशल मीडिया हा निकष नाही.

या उलट जो एखादा गायक वेगवेगळे गिमिक्स करून सोशल मीडियावर प्रसिद्ध होतोय, त्याला जास्त लाईक्स मिळत आहेत. पण तो चांगला गायक नसेल, तर अशा गायकाचे मार्क इथे, ‘सारेगमप’च्या मंचावर आरसा दाखवल्यासारखे कमी होणार. त्याच्या गायनात जे सोनं आहे, ते त्याला आपल्या सगळ्यांसमोर चमकवून दाखवावं लागणार. हा मोठा फरक आहे सोशल मीडिया आणि ‘सारेगमप’च्या मंचामध्ये.

४. परीक्षक म्हणून तुम्ही स्पर्धकांना मार्गदर्शन करता. त्यांना गुण देताना आणि सल्ला देताना तुम्ही कोणत्या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देता?

परीक्षक म्हणून माझा निकष कधीच बदलणार नाही. पहिलं म्हणजे सूर आणि ताल, दुसरं म्हणजे काव्याची जाण, शब्दांचा अर्थ समजून घेतला आहे की नाही याची परीक्षा आणि त्यामुळे येणारी भावुकता. या चार गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. गाणं गातानाच गायकाचं प्रेझेंटेशनही खूप महत्त्वाचं असतं. कारण गाणं प्रस्तुत करताना ते समोरच्याला पण समजावून सांगता आलं पाहिजे. त्याचे भाव हे समोरच्यालाही फील झाले पाहिजेत आणि हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे.

५. मराठी संगीत सतत बदलत आणि नव्या रूपात पुढे येत आहे. या नव्या पर्वात त्या बदलाचं प्रतिबिंब कसं दिसेल, असं तुम्हाला वाटतं?

आम्ही परीक्षक म्हणून जुन्या आणि नव्याचा एक मिलाप करण्याचा प्रयत्न करत आहोत. स्पर्धकांचं खरं संगीत, खरं टॅलेंट हे प्रेक्षकांसमोर आणणं, जे खरोखर टॅलेंटेड आहेत त्यांना प्रोत्साहन देणं हे जरी परीक्षकांचं काम असलं, तरी नव्या माध्यमांसमोर जायला आजच्या पिढीला तयार करणं ही देखील एका परीक्षकाची जबाबदारी आहे, अशा मताचा मी आहे. त्यामुळे माझा फोकस या सीझनला या गोष्टीवरसुद्धा असेल की सोशल मीडिया ला किंवा इतर नवीन माध्यमांना स्पर्धकांनी त्यांचं संगीत कशा प्रकारे मांडायला हवं. त्यासाठी काही मार्गदर्शन करण्याचा आम्ही परीक्षक म्हणून जरूर प्रयत्न करू.

६. प्रत्येक स्पर्धकाची स्वतःची एक गोष्ट आणि संघर्ष असतो. गाण्याइतकाच त्यांचा हा प्रवासही महत्त्वाचा असतो का?

प्रत्येक स्पर्धकाचा नक्कीच एक वेगळा संघर्ष असतो आणि गाण्याइतकाच त्याच्या जीवनाचा प्रवासही अतिशय महत्त्वाचा असतो. प्रत्येक गायकाचा, स्पर्धकाचा प्रवास हा प्रेरणादायी असतो. प्रत्येकाची ही जी गोष्ट असते, ती अनेक घरात बसलेल्या गायकांना प्रेरणा देऊन जाते. म्हणून हा प्रवास खूप महत्त्वाचा असतो आणि तो स्पष्ट सांगितला गेला पाहिजे.अर्थात, मधल्या काही काळामध्ये बऱ्याच वाहिन्यांवर अशा प्रसंगांचं इतकं उदात्तीकरण केलं गेलं की ते बऱ्याच घरांमध्ये हास्यास्पद ठरलं. तर अशा गोष्टींचा समतोल सांभाळण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, एक परीक्षक म्हणून.

७. तुमच्या संगीत प्रवासात तुम्ही अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तुमच्या अनुभवातून आजच्या स्पर्धकांना कोणता महत्त्वाचा सल्ला द्याल?

Tejaswini Lonari: चाहत्यांना गोड सरप्राइज! तेजस्विनी लोणारीच्या घरी आला ‘छोटा पाहुणा’, पोस्टने वेधलं लक्ष

मी सगळ्या स्पर्धकांना त्यांच्या पुढील करिअरसाठी शुभेच्छा देईन, भरभरून आशीर्वाद देईन. सगळ्यांनी आपल्या करिअरमध्ये अतिउच्च शिखर सर करावं. पण सल्ला देण्याबद्दल जर सांगायचं झालं तर एवढंच सांगेन… “वक्त से पहले और नसीब से ज्यादा किसी को नहीं मिलता,” ही म्हण कायम लक्षात ठेवावी. मला मोठा गायक व्हायचंय, मला खूप उंची सर करायचीये, मला खूप पैसे कमवायचेत, मला खूप नाव कमवायचं, असं ठरवून कधीच चालू नये. आपण कायम जे आहोत, त्याच्यापेक्षा एक पाऊल दरवेळेस पुढे जातोय की नाही, एवढाच विचार करावा आणि जे काही मिळेल त्याबद्दल देवाचे आभार मानावेत,

८. या पर्वातून प्रेक्षकांनी आणि संगीताची आवड असलेल्या तरुणांनी कोणती प्रेरणा घ्यावी, असं तुम्हाला वाटतं?

संगीताची आवड असलेल्या तरुणांनी प्रेरणा ही घ्यावी की आपण जर रियाज केला, गाणं शिकलो, गाण्यावर काम केलं, तर आपणही या स्पर्धकांसारखे एक दिवस मोठ्या मंचावरती गायक म्हणून जाऊ शकतो आणि आपलंही करिअर घडू शकतं. त्यांच्यासाठी हा एक चांगला राजमार्ग उपलब्ध आहे, याचा त्यांनी जरूर विचार करावा.यासोबतच मराठी भाषा पुढे जातेय, ही प्रेरणा घेऊन सर्वांनीच आपापलं कार्य चालू ठेवावं. आपल्या नव्या पिढीवर चांगले संस्कार देण्याचं काम सकारात्मकरीत्या, विश्वासाने चालू ठेवावं, अशी प्रेरणा प्रेक्षकांनी घ्यावी, असं मला मनापासून वाटतं.

Salman Khan Gym Fire: सलमानच्या जिममध्ये आगीचा थरार! अग्निशमन दल घटनास्थळी, मोठी अपडेट समोर

‘सारेगमप’च्या या नव्या पर्वातून नव्या पिढीचा आवाज, त्यांची विचार करण्याची पद्धत आणि संगीताकडे पाहण्याची बदललेली दृष्टी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अवधूत गुप्ते यांच्या अनुभवाची आणि नव्या पिढीला समजून घेण्याच्या दृष्टिकोनाची या प्रवासाला विशेष साथ मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘सा रे ग म प’ २२ ऑगस्टपासून शनि – रवि रात्री ९.३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

Web Title: Avadhoot gupte returns to sa re ga ma pa as judge focuses on new generation music

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • tv reality show

संबंधित बातम्या

South Africa News : स्थलांतरविरोधी आंदोलनाला हिंसक वळण; २४ गाड्या जाळल्या, परदेशी नागरिकांच्या दुकानांची लूट
1

South Africa News : स्थलांतरविरोधी आंदोलनाला हिंसक वळण; २४ गाड्या जाळल्या, परदेशी नागरिकांच्या दुकानांची लूट

Hungary News : हंगेरीमध्ये १२६ वर्षांतील सर्वाधिक तीव्र दुष्काळ; शेती, पाणीपुरवठा आणि ऊर्जा क्षेत्रावर संकट
2

Hungary News : हंगेरीमध्ये १२६ वर्षांतील सर्वाधिक तीव्र दुष्काळ; शेती, पाणीपुरवठा आणि ऊर्जा क्षेत्रावर संकट

Russia-Ukraine : युक्रेनचा रशियाच्या मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर ड्रोन हल्ला
3

Russia-Ukraine : युक्रेनचा रशियाच्या मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर ड्रोन हल्ला

World News : अमेरिकेच्या आखाती किनारपट्टीवर ‘इसायस’ चक्रीवादळाचे संकट; लाखो नागरिकांना सतर्कतेचा इशारा
4

World News : अमेरिकेच्या आखाती किनारपट्टीवर ‘इसायस’ चक्रीवादळाचे संकट; लाखो नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.