Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुटलेल्या नात्यांना जोडेल का प्रेमाची ताकद? ‘दीपज्योती’ लवकरच झी मराठीवर!

झी मराठीवर येत्या एप्रिल महिन्यापासून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे 'दीपज्योती'. ही गोष्ट आहे प्रेमाने आपलूलकीने बांधलेल्या बहीण भावांच्या नात्याची ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भावाची.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 27, 2026 | 12:42 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

झी मराठी नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. झी मराठीवर येत्या एप्रिल महिन्यापासून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘दीपज्योती’. ही गोष्ट आहे प्रेमाने आपलूलकीने बांधलेल्या बहीण भावांच्या नात्याची ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भावाची. ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी कि ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयष्याचं मातरें करून घेतलं आणि संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजे अभिजीत वर येऊन पडली. लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. या घरामध्ये पैसे हातात खेळत नसला तरी सद्धा आनंदाचं वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे.

एका बाजूला आहे ज्योतीचं कुटुंब—प्रेम, आपुलकी आणि संघर्षाने बांधलेलं. तर दुसरीकडे आहे एक घरंदाज आणि श्रीमंत कुटुंब, ज्याचे प्रमुख आहेत पुरुषोत्तम. त्यांच्या कुटुंबात तीन मुलं—स्वराज, दीप आणि विराज—आणि त्यांच्यासोबत आत्या आहे.

स्वराज हा पुरुषोत्तम यांची कार्बन कॉपी मानला जातो. वडिलांनी शून्यातून उभा केलेला व्यवसाय पुढे नेण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. विराज स्वतःच्या नोकरीत समाधानी आहे. मात्र, दीपचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या वळणावर आहे.

Ek Din मधील ‘ख्वाब देखूं’ गाणं रिलीज; जुनैद खान आणि साई पल्लवीच्या गोड जोडीने पाडली भुरळ

लहानपणी आईच्या मृत्यूनंतर पुरुषोत्तम यांना वाटतं की दीपच त्यासाठी जबाबदार आहे. त्यामुळे ते त्याचा तिरस्कार करतात. आईच्या जाण्याने तुटलेला दीपही हळूहळू दारूच्या आहारी जातो आणि वडील-मुलाच्या नात्यात दरी वाढत जाते.मालिकेची गोष्ट एका धक्कादायक घटनेपासून सुरू होते, जिथे एका क्षणात आनंदावर दुःखाचं सावट येतं.यानंतर दीप आणि ज्योती यांची भेट कशी होते, त्यांच्या नात्याचा प्रवास कसा सुरू होतो आणि प्रेमाच्या ज्योतीने तुटलेली मनं पुन्हा जुळतील का—हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक ठरणार आहे.

Ajay Devgn ला मोठा झटका; ३ वर्षांपूर्वीच्या चित्रपटावरून वाद, साऊथ निर्मात्याने उच्च न्यायालयात घेतली धाव

मालिकेत दीप आणि ज्योतीच्या प्रमुख भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या जोडीची केमिस्ट्री या मालिकेचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे.तसंच, ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका या मालिकेत पाहायला मिळणार आहेत, ज्यामुळे कथेला अधिक वजन मिळणार आहे.‘दीपज्योती’ मालिकेचं लेखन अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी यांनी केलं असून, संवाद लेखन इरफान मुजावर यांचं आहे. मालिकेचं दिग्दर्शन अमित सावर्डेकर यांनी केलं आहे.‘दीपज्योती’ ही मालिका सूड आणि प्रेम यांच्या संघर्षातून नात्यांची खरी किंमत दाखवणारी ठरणार आहे.

Web Title: Deepjyoti is set to premiere on zee marathi from the upcoming month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण
1

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता
2

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी
3

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
4

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.