(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही झी मराठीवरील एक रहस्यमय क्राईम-थ्रिलर मालिका आहे ज्यात ग्रामीण भागातील गुन्हेगारी, सत्तेचे खेळ, फसवणूक आणि रहस्य यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. या मालिकेत गोपाळ स्वत: च्या स्वार्थासाठी अनेकांचे जीव घेत असल्याचे या मालिकेत पाहायला मिळत आहे. तो निष्ठूरपणे लोकांना मारतो आणि त्यांचे मृतदेह सापडू नयेत म्हणून अनेक युक्त्या करताना दिसतो. मात्र लोकांसमोर तो सभ्य व्यक्ती असल्याचे नाटक करतो. लोकांची मदत करतो आणि सर्वांसमोर देवमाणूस होतो. या सगळ्यात त्याची पत्नी लालीदेखील ओढली गेल्याचे पाहायला मिळत आहे. गोपाळ आणि तिचा संसार मोडू नये यासाठी ति कोणत्याही थराला जाऊ शकते असे दिसत आहे. या आधी तिने माधुरीचा आणि तिची जाऊ शामलचा खून केल्याचे पाहायला मिळाले. गोपाळने साकेतचा खून केला. तो शामलने पाहिला. त्यानंतर लालीने तिचा खून केला. अशाप्रकारे देवमाणूस मालिकेतील शामलची भूमिका संपली असल्याचे समजत आहे. अभिनेत्री प्रेरणा बदणेने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या मालिकेत प्रेरणाने शामलची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने मालिकेतून निरोप घेतल्याचे सांगितले आहे.
पोस्ट करत तिने लिहिले, ”मागील काही दिवसात मी मालिकेत दिसत नव्हते म्हणून खूप लोकांना प्रश्न पडली होती की शामल का दिसत नाहीये ? शामल कुठे आहे ? शामलने मालिका सोडली का ?आजूबाजूच्या लोकांनी प्रेक्षकांनी भरपूर कमेंट्स केल्या Instagram, Facebook, Whatsapp सगळीकडे मला विचारलं की तुम्ही का दिसत नाहीयेत ? त्यामागे काही कारण असल्यामुळे मी मालिकेत दिसत नव्हते. पण आज मी माझ्या मायबाप प्रेक्षकांना सांगू इच्छिते की मी आपल्या सगळ्यांची आवडती मालिका देवमाणूस..मधला अध्याय या मालिकेचा आणि प्रेक्षकांचा मी निरोप घेत आहे . शामलचा अध्याय इथेच संपत आहे.”
”निरोप घेताना थोडं वाईट वाटत आहे पण मायबाप प्रेक्षकांनी इतकं मन भरून प्रेम दिलं की, त्या गोष्टीचे दुःख कमी आणि आनंद जास्त होत आहे. शामल वर खूप प्रेम केलं तिचा तो भोळसटपणा तिचं ते वेंधळ वागणं हे सगळं प्रेक्षकांनी हसून स्वीकारल. मी एक कलाकार म्हणून प्रेक्षकांचे खूप आभार मानते व मी कायम तुमची ऋणी राहील. तुमच प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या सोबत असू द्या ” .अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत तर काहींनी वाईट वाटत असल्याचे लिहिले आहे.”






