Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोरंजनाची फुल ऑन मेजवानी, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’चा शतकी टप्पा

रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मराठी रंगभूमीवर अनेक लोकप्रिय नाटकांची दमदार वाटचाल सुरू असून, त्यापैकी काहींनी १००-१५० प्रयोगांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 24, 2026 | 05:33 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नाटकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या नाटकानेही कमी वेळात मोठं यश मिळवलं आहे. या नाटकाने आता १०० प्रयोग पूर्ण करून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.चंद्रकांत कुलकर्णी प्रस्तुत आणि ‘जिगीषा’ निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन विनोद रत्ना यांनी केले आहे. प्रेक्षकांना हसवणारे आणि मनोरंजन करणारे हे नाटक खूप लोकप्रिय झाले आहे.या नाटकाचा शतकी (१००वा) प्रयोग अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अशोक सराफ, निवेदिता सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बादेकर यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते आणि त्यांनी नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.एकूणच, प्रेक्षकांच्या प्रेमामुळे या नाटकाची यशस्वी वाटचाल पुढेही अशीच सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग एवढ्या उत्साहात साजरा होताना पाहणे, हा खरोखरच आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी काढले. ‘परफेक्ट अभिनय, दिग्दर्शन आणि कास्टिंग’ या शब्दांत अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी नाटकाचे मनापासून कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मनोरंजन क्षेत्राला सुवर्णकाळ देणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आशीर्वाद लाभणे, ही नाटकातील तरुण कलाकारांसाठी खरोखरच भाग्याची गोष्ट असल्याची भावना अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली.

प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या नाटकाची खासियत म्हणजे त्याची समकालीन आणि तरुण पिढीशी थेट जोडणारी कथा. आजच्या जेन-जी पिढीच्या भावना, विचार आणि वास्तव यांना हलक्याफुलक्या विनोदी शैलीत मांडत हे नाटक रसिकांना आपलेसे वाटते. श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव या नाटकाचे निर्माते आहेत.

श्रेयस जोशी, वैभव रंधवे आणि समृद्धी कुलकर्णी या नवोदित कलाकारांनी या नाटकात प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करताना त्यांच्यासाठी हा अनुभव स्वप्नपूर्तीसारखा ठरत आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक कलाकाराने आपल्या वयाशी आणि पिढीशी सुसंगत अशी भूमिका साकारल्यामुळे नाटक अधिक नैसर्गिक आणि प्रेक्षकांच्या अनुभवाशी जोडणारे ठरते. या नाटकामुळे प्रेक्षकांशी एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. प्रत्येक प्रयोगात मिळणाऱ्या टाळ्या आणि हशा हेच आमचं खरं यश आहे. अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.

लग्नाबाबत अक्षय कुमारचा मोठा खुलासा, ट्विंकल खन्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत; म्हणाला, ”संपूर्ण कुटुंबाची वैद्यकीय …”

उत्कृष्ट लेखन, नेमकं दिग्दर्शन आणि नवोदित कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, येत्या काळातही हे नाटक त्यांचं असंच भरभरून मनोरंजन करत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

PM मोदींच्या विधानाने खळबळ; भारतात येणार का कोरियन स्टार्स? K-Pop आणि K-Drama चाहत्यांसाठी मोठी खुशखबर

नाटकाचे लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना यांनी सांगितलं, “‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नाटक करताना आमचा एकच उद्देश होता—आजच्या तरुण पिढीचं वास्तव हलक्याफुलक्या पद्धतीने मांडणं. प्रेक्षकांनी इतक्या कमी वेळात या नाटकावर जे प्रेम केलं, ते आमच्यासाठी खूप मोठं यश आहे. शंभरावा प्रयोग हा केवळ एक टप्पा नसून, पुढच्या वाटचालीसाठी नवी ऊर्जा देणारी सुरुवात आहे.”

Web Title: Full on entertainment feast chiranjeev perfect bigadalay completes its 100th show milestone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • Marathi Entertainment News

संबंधित बातम्या

दोन तुटलेल्या संसारानंतर आता कृष्णभक्तीत लीन, मराठमोळ्या अभिनेत्रीने धरली अध्यात्माची वाट; वृंदावनात सापडलं नवं आयुष्य
1

दोन तुटलेल्या संसारानंतर आता कृष्णभक्तीत लीन, मराठमोळ्या अभिनेत्रीने धरली अध्यात्माची वाट; वृंदावनात सापडलं नवं आयुष्य

Pach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ कोण? अखेर नाव आलं समोर;अभिनेत्रीची नाटकातून सिनेसृष्टीत दमदार एंट्री
2

Pach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ कोण? अखेर नाव आलं समोर;अभिनेत्रीची नाटकातून सिनेसृष्टीत दमदार एंट्री

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार
3

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार

Rucha Gaikwad Engagement: थाटात पार पडला ऋचा गायकवाड आणि प्रथमेशचा साखरपुडा; अभिनेत्रीचा लूक चर्चेत, फोटो व्हायरल
4

Rucha Gaikwad Engagement: थाटात पार पडला ऋचा गायकवाड आणि प्रथमेशचा साखरपुडा; अभिनेत्रीचा लूक चर्चेत, फोटो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.