Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू ही रे माझा मितवा’ मध्ये ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, अर्णवसमोर उभे राहणार मोठे आव्हान; कथानकाला मिळणार वेगळं वळण

‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मंजुषा गोडसे यांच्या एन्ट्रीमुळे अर्णवसमोर नवे आव्हान उभे राहणार असून कथानक अधिक रंजक होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 07, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’ मध्ये लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या कथानकात अचानक होणाऱ्या या बदलामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सतत नवीन ट्विस्ट, धक्कादायक घटना आणि नव्या पात्रांची एन्ट्री होत असते. त्यामुळे कथा अधिक रंजक बनते आणि प्रेक्षकांना पुढे काय होणार याची उत्सुकता कायम राहते. याच परंपरेत आता ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतही एक महत्त्वाचा बदल घडणार आहे.

‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली आहे. मालिकेत नुकताच मोठा खुलासा झाला असून ईश्वरी आणि अर्णव यांनी राजेशचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. स्मृतीभ्रंश झाल्याचा खोटा आव आणत राजेशने राजेशिर्के कुटुंबासह सर्वांच्या भावनांशी खेळ केला होता. मात्र अर्णव आणि ईश्वरी यांच्या हुशारीमुळे त्याचा खोटेपणा उघड झाला आणि अखेर त्याला अटक करण्यात आली.

या संपूर्ण घडामोडीदरम्यान राजेशने सात्विक फॅशन्सचे काही शेअर्स आपल्या नावावर करून ठेवले होते. मात्र, कथानकात आणखी एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. राजेशने कंपनीची ७ टक्के भागीदारी एका अनोळखी व्यक्तीला विकली असून ही व्यक्ती म्हणजे ‘मिसेस देशमुख’ असल्याचे समोर आले आहे.

मालिकेत ‘मिसेस देशमुख’ ही भूमिका अभिनेत्री मंजुषा गोडसे साकारताना दिसणार आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे कथानकात मोठा बदल होणार असून अर्णवसमोर नवे आणि अधिक कठीण आव्हान उभे राहणार आहे. ही एन्ट्री केवळ कथेला नवे वळण देणारी नसून संपूर्ण मालिकेतील शक्ती-समीकरण बदलणारी ठरणार आहे.

26/11 च्या काळरात्रीत 20 गर्भवती महिलांचे प्राण वाचवणाऱ्या अंजली कुलथे कोण? स्वतः सांगितली धाडसाची कहाणी

या नव्या ट्विस्टमुळे अर्णव आणि ईश्वरी यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण होणार असून पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना अधिक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. सध्या या बदलाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मालिकेत येणारा हा नवा अध्याय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार हे निश्चित आहे.

बॉलिवूडला रामराम? ग्लॅमर सोडून आध्यात्माच्या मार्गावर निघाली परिणीती चोप्रा? सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

दरम्यान, मंजुषा गोडसे यांनी आजवर अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेत त्यांनी साकारलेली सरोज चांदेकर ही भूमिका विशेष गाजली होती.या मालिकेत त्यांनी खलनायिकेची भूमिका साकारली असली तरीही त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांनी त्या व्यक्तिरेखेलाही मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती. नकारात्मक भूमिकेत असूनही त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली.आता ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत त्यांची एन्ट्री होत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे मालिकेत आणखी नवे वळण आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

Web Title: In tu hi re maza mitwa the entry of this popular actress will bring a major challenge for arnav the storyline will take a new turn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट
1

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री
2

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
3

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
4

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.