Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या मराठी मालिकेच्या वादग्रस्त सीनवर प्रेक्षकांचा संताप; “हा काय प्रकार? बंद करा ही मालिका!” म्हणत केली टीका

काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली सनई चौघडे मालिका आता वादात सापडली आहे, मालिकेच्या नव्या एपिसोडच्या प्रोमोमधील एक सीन पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. नक्की हे प्रकरण काय आहे जाणून घेऊ.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 22, 2026 | 01:29 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • झी मराठीवरील नवी मालिका वादात
  • वादग्रस्त सीनवर प्रेक्षकांचा संताप
  • मालिका बंद करण्याचे दिले आवाहन
 

झी मराठीवरील नव्याने सुरू झालेली ‘सनई चौघडे’ मालिका सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधील एका वादग्रस्त सीनमुळे प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 16 मार्चपासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असले, तरी आता एका सीनमुळे सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली आहे.

23 मार्चला प्रसारित होणाऱ्या भागाचा प्रोमो समोर आला आणि त्यातील एक प्रसंग पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. प्रोमोमध्ये शर्वरी ही व्यक्तिरेखा जयच्या आजीला शोधत घरातील एका अंधाऱ्या खोलीत जाते. त्या खोलीत टेबलावर सोन्याचे दागिने ठेवलेले असतात. अंधारामुळे काहीच स्पष्ट दिसत नसताना शर्वरीचा टेबलला धक्का लागतो आणि एक सोन्याचा हार खाली पडतो. ते काय पडले आहे हे पाहण्यासाठी ती खाली वाकते आणि हार उचलते.

“ज्याने माझी एजन्सी सोडली…” जान्हवी कपूरने करण जोहरची सोडली साथ; अभिनेत्रीने कंपनीमधून घेतली माघार, म्हणाला…

इतक्यात जयची आई तेजस्विनी तिथे येते आणि शर्वरीच्या हातात हार पाहते. परिस्थिती समजून घेण्याऐवजी ती थेट शर्वरीवर चोरीचा आरोप करते. शर्वरी तिचं म्हणणं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना तेजस्विनी तिचं काहीही न ऐकता तिला सगळ्यांसमोर ओढत बाहेर आणते. इतकंच नव्हे, तर सर्वांसमोर तिच्या कानशिलात मारते. हाच तो सीन आहे, ज्यामुळे प्रेक्षक संतप्त झालेले दिसत आहेत.

 

सोशल मीडियावर या सीनविरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक प्रेक्षकांनी मालिकेतील स्त्री पात्रांवर वारंवार होणाऱ्या अशा अत्याचारात्मक प्रसंगांवर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले, “हा काय प्रकार आहे? प्रत्येक मालिकेत नायिकेला कानशिलात मारण्याचे सीन दाखवले जातात. सावली, पारू, कमळी, तारिणी, श्रावणी आणि आता शर्वरी सगळ्यांनाच अशा प्रकारे दाखवले जाते. कृपया असे सीन दाखवणे बंद करा.”

‘बकवास चित्रपट…’ म्हणत पाकिस्तानी कुटुंबाची ‘Dhurandhar 2′ वर टीका; भारतीय चाहत्यांचे सडेतोड प्रत्युत्तर

प्रेक्षकांचे म्हणणे आहे की, मनोरंजनाच्या नावाखाली महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचे असे चित्रण करणे योग्य नाही. यामुळे चुकीचा संदेश समाजात पोहोचू शकतो. मालिकांनी सकारात्मक आणि सशक्त स्त्रीप्रतिमा दाखवावी, अशीही मागणी प्रेक्षकांकडून होत आहे. ‘सनई चौघडे’ मालिकेच्या या सीनमुळे निर्माण झालेल्या वादानंतर आता निर्माते आणि वाहिनी यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रेक्षकांचा वाढता रोष लक्षात घेता, भविष्यात अशा सीनमध्ये बदल केला जाईल का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sanai chaughade scene audiance get angry said stop this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
1

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
2

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार
3

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर
4

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.