Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पप्पा, पप्पा”च्या हाकांमध्ये रंगले शूटिंग; सुहास शिरसाटचा खास अनुभव, भूमिकेबद्दल मारल्या मनमोकळ्या गप्पा

‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता सुहास शिरसाट एका प्रेमळ बाबाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘सुभाष परब’ असं ह्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल सुहास यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 23, 2026 | 04:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता सुहास शिरसाट एका प्रेमळ बाबाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘सुभाष परब’ असं ह्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल सुहास यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. सनई चौघडे मध्ये माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे सुभाष परब. तो लालबाग-परळच्या चाळीत राहतो. तो एक बेस्ट बस कंडक्टर आहे. बायको आणि चार मुलींसोबत त्याचं खूप चांगलं, मैत्रीचं नातं आहे. कुठल्याही गोष्टीचं तो जास्त टेन्शन घेत नाही. जी परिस्थिती आहे, त्यामध्ये तो खुश आहे, जे होईल ते चांगलंच होईल, स्वामी आहेत असा त्याचा खूप मोठा श्रद्धाभाव आहे. सुभाष परब या व्यक्तिरेखेसाठी आमचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी मला सर्वप्रथम कॉल केला होता. जेव्हा मला कळलं की ते स्वतः पहिल्यांदा निर्माते म्हणून काम करणार आहेत, तर त्या गोष्टीचा मला जास्त आनंद झाला. त्यात त्यांनी या भूमिकेसाठी मला विचारल्यामुळे मला खूपच भारी वाटलं. माझा काय रोल आहे, काय कॅरेक्टर आहे हे मी त्यांना न विचारताच, त्यांच्यावर विश्वास ठेवून मी लगेच माझ्या भूमिकेसाठी होकार दिला. या भूमिकेसाठी तयारी तशी सुरूच आहे, कारण भूमिका कंडक्टरची असल्यामुळे कंडक्टर कसे राहतात, त्यांचे हावभाव आत्मसात करून भूमिका साकारण्यासाठी मी पूर्ण प्रयत्नात आहे. लालबाग-परळ अशा ठिकाणी राहत असल्यामुळे लालबाग-परळच्या भाषेत कसं बोलायचं याची तयारी सुरूच आहे. माझी ही भूमिका नक्कीच खूप वेगळी आहे. या मालिकेत सतत मस्ती-मजाक करणारा, आपल्या बायको-मुलींवर प्रेम करणारा, सगळ्यांशी मिळून-मिसळून राहणारा, पडती बाजू सांभाळून घेणारा असा हा सुभाष आहे. त्यामुळे ही भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. अशा हसतमुख, विविध हावभावी भूमिकेसाठी नक्कीच तयारी करावी लागते, या भूमिकेतून मला माझा मजेशीर स्वभाव प्रेक्षकांना दाखवून द्यायचा आहे, शूटिंग करताना मला खूप मजा येतेय.

‘Drishyam 3’ च्या रिलीज डेटमध्ये बदल? यशच्या ‘टॉक्सिक’नंतर आता मोहनलालच्या चित्रपटांचीही करावी लागणार प्रतीक्षा

सेटवर आमची सगळ्यांची ट्युनिंग खूप चांगली झाली आहे, कारण ज्या माझ्या मुलींच्या भूमिका करतात त्या मुली सेटवर सतत “पप्पा, पप्पा” असं करत असतात, त्यामुळे मला खूप छान वाटतं. मेघनाताई आणि माझ्यातही खूप छान पद्धतीने आता ट्युनिंग झालंय. कारण सुरुवातीचे दहा दिवस जेव्हा शूटसाठी आम्ही सगळे बाहेर होतो, तेव्हा दिवसभर एकत्र , जेवण-खाणं एकत्र करायचो, त्यामुळे चांगलं ट्युनिंग जमलं आणि सगळ्यांचे स्वभाव कळले. मुळातच आम्ही सगळे एकत्रितरीत्या काम करतो.

6 महिन्यांच्या प्रेग्नन्सीनंतर Divyanka Tripathi चे थाटात पार पडले डोहाळेजेवण; मित्र-मैत्रिणींनी दिले खास सरप्राईज

शूटिंगदरम्यान किस्सा सांगायचा झाला तर जेव्हा मला प्रोमो शूटसाठी कॉल टाइम आला, तेव्हा मला सकाळी आठ वाजता शूटसाठी हजर राहायचं असं सांगण्यात आलं होतं. तेव्हा मी राजू सरांना म्हटलं की सकाळी आठचा कॉल टाइम आहे सर. तर सर पटकन म्हणाले हो चार-पाच वाजेपर्यंत फ्री होशील.” तेव्हा मला वाटलं की संध्याकाळी चार-पाच वाजेपर्यंत आम्ही फ्री होऊ. पण त्यानंतर सरांच्या असिस्टंटने सांगितलं की काहीतरी ऐकण्यात गडबड झाली आहे, कारण सर म्हणाले चार-पाच वाजता म्हणजे सकाळचे चार-पाच वाजेपर्यंत, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यानंतर खरंच आमचं पहाटे चार वाजता पॅकअप झालं.

Web Title: Suhas shirsat shares his special experience and opens up about his role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
1

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
2

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
3

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
4

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.