Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘डिजीटल’मुळे रंगभूमीला झळ, ओटीटी-सोशल मीडियाचे नवे आव्हान; नाट्यप्रयोगांवर थेट परिणाम

एकेकाळी प्रेक्षकांच्या गर्दीने फुलणारी मराठी रंगभूमी सध्या नव्या डिजिटल स्पर्धेला सामोरी जात आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या सवयी झपाट्याने बदलत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 19, 2026 | 11:51 AM
'डिजीटल'मुळे रंगभूमीला झळ, ओटीटी-सोशल मीडियाचे नवे आव्हान; नाट्यप्रयोगांवर थेट परिणाम

'डिजीटल'मुळे रंगभूमीला झळ, ओटीटी-सोशल मीडियाचे नवे आव्हान; नाट्यप्रयोगांवर थेट परिणाम

Follow Us
Follow Us:

पुणे/गायत्री पवळे : एकेकाळी प्रेक्षकांच्या गर्दीने फुलणारी मराठी रंगभूमी सध्या नव्या डिजिटल स्पर्धेला सामोरी जात आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या सवयी झपाट्याने बदलत असून, त्याचा थेट परिणाम नाट्यप्रयोगांच्या प्रेक्षकसंख्येवर दिसू लागला आहे. गेल्या काही वर्षांत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, डिज्नी+ हॉटस्टार यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी दर्जेदार आणि विविध विषयांवरील कंटेंट प्रेक्षकांच्या घरपोच पोहोचवला. यामुळे ‘कधीही आणि कुठेही’ मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

 

परिणामी, चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची सवय काही प्रमाणात कमी झाली आहे. सोशल मीडियाचाही प्रभाव तितकाच मोठा आहे. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक यांसारख्या माध्यमांवर छोट्या व्हिडिओंमधून झटपट मनोरंजन मिळत असल्याने तरुण पिढीचा कल या दिशेने अधिक वाढला आहे. यामुळे दोन-तीन तासांचा चित्रपट किंवा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी वेळ देणारे प्रेक्षक कमी होत आहेत.

रंगभूमीशी संबंधित जाणकारांच्या मते, ही परिस्थिती केवळ आव्हान नसून बदलाची संधीही आहे. काही निर्माते आता डिजिटल माध्यमांचा वापर करून चित्रपटांचे प्रमोशन करत आहेत. ट्रेलर, बिहाइंड द सीन व्हिडिओ, कलाकारांच्या मुलाखती यामुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे नवीन मार्ग खुलले आहेत. काही चित्रपट ऑनलाइन स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनही दाखवले जात आहेत. दरम्यान मराठी चित्रपट ओटीटी चॅनेलचे कार्यालये ही जास्त महाराष्ट्रामध्येच आहेत, पण तरी ओटीटी चॅनल मराठी चित्रपटांना तेवढे प्राधान्य देताना दिसत नाहीत. पूर्वी सिनेमा चित्रपटगृहात आधी दाखवला जायचा आणि नंतर सॅटेलाइटला दुसरे स्थान दिले जायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. ओटीटीला पहिले आणि चित्रपटगृहांना दुसरे स्थान दिले जात आहे, असे निर्माते चंद्रकांत विस्पुटे यांनी सांगितले. एकंदरीत,ओटीटी आणि सोशल मीडियाचे आव्हान गंभीर असले तरी मराठी रंगभूमीची ताकद तिच्या जिवंत सादरीकरणात आहे. बदलत्या काळानुसार स्वतःला नव्याने सादर केल्यास ही परंपरा पुन्हा नव्या उंचीवर पोहोचू शकते.

महाराष्ट्रामध्ये मराठी रंगभूमीला प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे कुठेतरी ही रंगभूमी मागे पडत आहे. मोठ्या स्टूडियोचे चित्रपट वर्षातून ४ ते ५ निघतात, परंतु लहान निर्मात्यांचे १०० ते १५० चित्रपट एका वर्षात येतात. त्या चित्रपटांना स्थान मिळणे गरजेचे आहे. प्रेक्षकांना घरी बसून चित्रपट पाहण्याची सवय लागलेली आहे असेही म्हणता येईल. ओटीटी चॅनल मराठी सिनेमे लवकर घेत नाहीत. जोवर त्यात कोणी मोठा स्टुडिओ सामील नसतो. त्यासाठी आम्ही सरकारला निवेदन केले आहे की मराठी रंगभूमीसाठी एक वेगळा OTT प्लॅटफॉर्म सुरु करावा त्यावर २ बैठकाही झालेल्या आहेत. निर्णय होणे बाकी आहे. -चंद्रकांत विस्पुटे, निर्माते.

रंगभूमीला प्रोत्साहन देणे आवश्यक

आर्थिक अडचणी ही मोठी समस्या ठरत आहे. नाट्यगृहांचे वाढते भाडे, तांत्रिक खर्च आणि मर्यादित प्रेक्षकसंख्या यामुळे निर्मात्यांवर ताण वाढला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सप्रमाणे मोठा निधी किंवा गुंतवणूक रंगभूमीला मिळत नसल्याने स्पर्धा अधिक कठीण होत आहे. यावर उपाय म्हणून तज्ज्ञांचे मत आहे की, मराठी रंगभूमीने विषयांमध्ये आणि सादरीकरणात अधिक प्रयोगशीलता आणणे गरजेचे आहे. स्थानिक संस्कृती, सामाजिक प्रश्न आणि समकालीन विषय यांचा वेध घेणारी नाटके प्रेक्षकांना आकर्षित करू शकतात. शैक्षणिक संस्था, महोत्सव आणि सरकारी स्तरावरूनही रंगभूमीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे चित्रपट वितरणाचे स्वरूप बदलले असून, थिएटरवरील अवलंबित्व कमी झाले आहे. प्रेक्षक आता घरबसल्या कंटेंट पाहण्याकडे वळले आहेत. त्यामुळे ओटीटी उत्पन्नाचे महत्त्व वाढले आहे. मात्र, मराठी चित्रपटांना अपेक्षित संधी व योग्य आर्थिक मूल्य मिळत नाही. काही प्लॅटफॉर्म प्रयत्न करत असले तरी ‘शेअरिंग बेसिस’मुळे निर्मात्यांना तोटा होतो. यावर उपाय म्हणून ओटीटी कंपन्यांनी मराठी कंटेंटसाठी स्वतंत्र धोरण राबवावे. तसेच, निर्मात्यांनी दर्जेदार कथा व तांत्रिक गुणवत्ता सुधारून स्पर्धात्मक कंटेंट तयार करणे आवश्यक आहे. -बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभाग.

Web Title: Marathi theatre is currently facing new digital competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Marathi Theatre
  • OTT
  • pune news

संबंधित बातम्या

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ जुलैला धावणार!
1

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ जुलैला धावणार!

Shivajinagar ST Stand: ६ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी शिवाजीनगर एसटी प्रशासनाचा नवा प्लॅन; आरे’च्या जागेची मागणी
2

Shivajinagar ST Stand: ६ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी शिवाजीनगर एसटी प्रशासनाचा नवा प्लॅन; आरे’च्या जागेची मागणी

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले
3

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?
4

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.