Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Milind Gawali : ‘जोड्या स्वर्गात बांधल्या जातात…’, 20 वर्षांनंतरही ‘तो’ क्षण विसरू शकले नाहीत मिलिंद गवळी; भावनिक पोस्ट चर्चेत

'सोबती' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाहिलेल्या एका अनोख्या लग्नाची आठवण अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आंधळ्या मुलाचा आणि गतिमंद मुलीचा विवाह पाहिल्यानंतरचे अनुभव त्यांनी भावनिक शब्दांत मांडले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 09, 2026 | 10:55 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमीच विविध अनुभव आणि आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी जवळपास 20 वर्षांपूर्वीची एक हृदयस्पर्शी आठवण सांगितली असून, त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

मिलिंद गवळी यांनी सांगितलं की, ते ‘सोबती’ या मराठी चित्रपटाचं शूटिंग साताऱ्यातील संगम माऊली येथे करत होते. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री या पाच नद्यांच्या संगमाजवळ असलेल्या विश्वेश्वराच्या महादेव मंदिरात चित्रिकरण सुरू असताना अनेक गावकरी त्यांना भेटण्यासाठी आले होते. याचवेळी काही गावकऱ्यांनी त्यांना गावातील एका लग्नाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं.

सुरुवातीला शूटिंगमुळे लग्नाला जाणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, एका माऊलीने त्यांना त्या लग्नामागची हृदयस्पर्शी कहाणी सांगितली. गावातील एक आंधळा मुलगा, ज्याला आई-वडील नव्हते आणि एक गतिमंद मुलगी, जिनेही आई-वडिलांना गमावलं होतं, अशा दोन निराधार जीवांचं लग्न गावकऱ्यांनी मिळून लावून देण्याचा निर्णय घेतला होता.

ही गोष्ट ऐकताच मिलिंद गवळी यांनी लग्नाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे गावकऱ्यांनाही मोठा आनंद झाला. लग्नसोहळा पार पडल्यानंतर ते पुन्हा शूटिंगसाठी रवाना झाले. मात्र, आज इतक्या वर्षांनंतरही त्या लग्नाच्या आठवणी त्यांच्या मनात ताज्या आहेत.


Pravin Tarde on Trollers: त्यांना हा सिनेमा जास्त झोंबला.., ‘देऊळ बंद 2’वर टीका करणाऱ्यांना प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले..

पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘सोबती’ चित्रपटातील अनेक प्रसंग आज आठवत नाहीत, पण त्या दोन जीवांच्या लग्नाचा प्रसंग आजही मनात घर करून आहे. त्या दोघांचा संसार सुखाचा सुरू असेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

गावातील निरागसता, माणुसकी आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची भावना याबद्दल बोलताना त्यांनी शहरांमध्ये हरवलेल्या निष्पापपणाचाही उल्लेख केला. शेवटी, “जोड्या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात, ते काही खोटं नाही,” असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या पोस्टने अनेक नेटकऱ्यांना भावुक केलं असून, माणुसकीचा सुंदर संदेश दिल्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.

Web Title: Milind gawali emotional post about village wedding after 20 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • instagram
  • marathi actor

संबंधित बातम्या

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ
1

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!
2

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
3

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!
4

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.