Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC संघर्ष, स्वप्नं आणि निसर्गरक्षणाचा सुंदर संगम; ‘आऊट ऑफ सिलॅबस’ टीझर प्रदर्शित, तरुणाईत वाढली उत्सुकता

पुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन समाजासाठी आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारी कथा या चित्रपटातून उलगडली आहे. टीझरमध्ये दाखवलेला तरुणांचा प्रवास आणि त्यांचे संघर्ष अतिशय वास्तववादी पद्धतीने मांडण्यात आला E

  • By अमृता यादव
Updated On: Jun 08, 2026 | 06:07 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘आऊट ऑफ सिलॅबस’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांच्या जीवनातील संघर्ष, त्यांची स्वप्नं आणि निसर्गरक्षणाची जबाबदारी या तिन्ही घटकांचा प्रभावी संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

पुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन समाजासाठी आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारी कथा या चित्रपटातून उलगडली आहे. टीझरमध्ये दाखवलेला तरुणांचा प्रवास आणि त्यांचे संघर्ष अतिशय वास्तववादी पद्धतीने मांडण्यात आला आहे.टीझरमधील पार्श्वसंगीत (बॅकग्राऊंड म्युझिक) आणि दृश्येही लक्षवेधी असून, प्रत्येक सीनला अधिक प्रभावी बनवत आहेत. त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘पुस्तकांच्या पलीकडे…’ या टॅगलाईनला साजेसा ‘आऊट ऑफ सिलॅबस’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने तरुणाईच्या भावविश्वाला थेट स्पर्श केला आहे. MPSC परीक्षेची स्वप्नं डोळ्यांत साठवून स्पर्धा परीक्षेच्या तयारीत गुंतलेली तरुणाई आणि त्याच वेळी निसर्गसंवर्धनासाठी झटणारे त्यांचे प्रयत्न या टीझरमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आले आहेत.

वैयक्तिक यशाच्या पलीकडे जाऊन समाज आणि पर्यावरणासाठी असलेली जबाबदारी किती महत्त्वाची आहे, हा संदेश टीझरमधून ठळकपणे मांडण्यात आला आहे. भावनिक प्रसंग, प्रेरणादायी संवाद आणि निसर्गाशी जोडलेले दृश्य यामुळे टीझरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

आजच्या तरुण पिढीसमोरील वास्तव, स्पर्धा परीक्षांचा ताण आणि पर्यावरण संवर्धनाची गरज या संवेदनशील विषयांना स्पर्श करणारा हा चित्रपट मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे.

Jahnavi Killekar : “जास्त शहाणपणा करू नकोस, अक्कल नाही का?” छोट्या पुढारीच्या कमेंटवर जान्हवीचा संताप, नेमकं प्रकरण काय?

चित्रपटाच्या तांत्रिक बाजूबद्दल बोलायचे झाल्यास, लेखन अनिकेत कोरडे यांनी केले असून दिग्दर्शनाची जबाबदारी नवीन देशबोनिया यांनी सांभाळली आहे. ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’ बॅनरअंतर्गत डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

तांत्रिक नाविन्य जपत सचिन मनोहराराव ढोकणे यांनी ‘AI क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून काम पाहिले आहे. संगीत दिग्दर्शन मोहित कुलकर्णी यांनी केले असून वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांच्या आवाजाने गाणी सजली आहेत. छायांकनाची जबाबदारी मनीष केदार व्यास आणि सुधीर वड्डेली यांनी सांभाळली असून, संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे.

‘आज शूटिंगचा शेवटचा दिवस…’,’मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री गार्गी फुलेची भावुक पोस्ट

मुख्य भूमिकेत अजिंक्य राऊत, अद्वयी आणि शेषपाल गणवीर झळकणार असून सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांचीही महत्त्वपूर्ण साथ लाभली आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे. एकूणच, ‘आऊट ऑफ सिलॅबस’ हा चित्रपट तरुणांना प्रेरणा देणारा आणि समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारा अनुभव ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Mpsc struggles dreams and nature conservation come together out of syllabus teaser released excitement rises among youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • MPSC Exam

संबंधित बातम्या

Maitreya Marathi Movie: बाप्पाच्या भक्तीत रंगून गेलं ‘मैत्रेया’; ‘तुझे नाव घेता’ गाण्याने वाढवला गणेशोत्सवाचा उत्साह
1

Maitreya Marathi Movie: बाप्पाच्या भक्तीत रंगून गेलं ‘मैत्रेया’; ‘तुझे नाव घेता’ गाण्याने वाढवला गणेशोत्सवाचा उत्साह

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ
2

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!
3

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
4

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.