( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. आता मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाल्याने कलाकार आणि तांत्रिक टीमसाठी हा क्षण भावनिक ठरत आहे.मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशीचे काही खास फोटो अभिनेत्री गार्गी फुले यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्यांनी एक भावुक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत सगुणा हे पात्र अभिनेत्री गार्गी फुले या साकारताना दिसल्या आहेत. ही मालिका लवकरच निरोप घेणार असून या. मालिकेच्या शूटिंगचा आज शेवटचा दिवस आहे. अभिनेत्री गार्गी फुले एक पोस्ट शेअर केली आहे
गार्गी फुले यांची पोस्ट
”आज मी सावित्रीबाई जोतीराव फुले या स्टार प्रवाहच्या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. काय बोलावं ते कळत नाहीये…. या सिरीयल मध्ये मी सगुणा आऊ साकारली… Day one पासून अगदी आज पर्यंत सगुणा आऊ नी माझी साथ सोडली नाही… अगदी ज्योती आणि सावित्री ला तीने जशी खंबीर साथ दिली तशी मलाही तीने सोडलं नाही… नात्याने आऊ माझी खापर खापर पणजी….पण ती साकारताना आऊ नेच मार्ग दाखवला…. तीने माझ्याकडून ही भूमिका करवून घेतली…. बाकी काय बोलू..” असं अभिनेत्री गार्गी फुले यांनी म्हटलं आहे.
त्यांनी पुढे लिहिले, माझे सगळेच सहकलाकार ज्यांनी मला उत्तम साथ दिली आणि एका कुटुंबासारखे सगळे राहिलो…. जगदंब ची सगळी टेकनिकल team, अगदी स्पॉट दादा पासून ते आमच्या ep पर्यंत सगळे फार कमाल आणि perfect professional होते…. ज्यांना माहीत होता त्यांचं काय काय काम आहे….ज्योती, सावी आणि आऊ बरंच बोलले आता थांबते…. अलविदा आऊ..”
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेने सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मालिकेच्या शेवटामुळे अनेक प्रेक्षक भावुक झाले असून सोशल मीडियावर कलाकारांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.






