Praful Patel Meets Sharad Pawar: १० तारखेनंतर बसून चर्चा करू...; शरद पवार प्रफुल्ल पटेलांना असं का म्हणाले?
या व्हिडीओत शरद पवार यांनी १० तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू, असं प्रफुल्ल पटेलांना सांगितल आहे. त्यामुळे आता १० तारखेनंतर नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीबाबत प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता, ते म्हणाले की, राजकारणात काय चाललंय असं ते विचारत होते. आमची राजकीय भूमिका दुरावली असली तरी आमचे मन कधीही दुरावले नाही. त्यामुळे मी पवार साहेबांना नेहमीच भेटत असतो. आमचे पारिवारीक संबंध आहेत ते राहणारच.
शरद पवारांशी झालेल्या भेटीबाबत, एका प्रश्नावर बोलताना पटेल म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये बाकीच्या चर्चा करणे योग्य नसल्याने आम्ही जनरल चर्चा केली. फक्त राजकारणात काय सुरू आहे, असं त्यांनी विचारलं. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काय चाललयं, अमेरिकेच्या राजकारणात काय चालंलयं याबाबत शरद पवार यांनी आपल्याला विचारल्याचे पटेल यांनी सांगितलं.
दरम्यान, शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कॉल केला होता. देश सांभाळण्यासाठी सुप्रिया सुळे आणि आम्ही आहोत, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. त्यावर तुम्ही सर्वजण असल्यावर मला देशाची चिंता नाही, असं उत्तर देत शरद पवारांनी मोदींचे आभार मानले. अशी माहिती शरद पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी दिली.
खोकला आणि छातीत कफ साचल्याच्या तक्रारींमुळे शरद पवार यांना २ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून कोणतीही गंभीर समस्या नाही. बुधवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पुन्हा सहभागी होण्यापूर्वी शरद पवार यांनी किमान दोन ते चार दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
शरद पवार, त्यांची मुलगी आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत थेट दक्षिण मुंबईतील त्यांच्या घरी गेले. विश्रांतीच्या काळात ते त्यांच्या वैयक्तिक वैद्यकीय पथकाच्या देखरेखेखाली राहतील. यापूर्वी, सुप्रिया सुळे यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते, “बाबांची प्रकृती आता खूप सुधारली आहे आणि आम्ही मुंबईला जात आहोत. त्यांची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल रुबी हॉलमधील संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. तुमच्या सर्वांच्या सदिच्छांबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
Ans: शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील संवादाच्या व्हिडिओंनुसार, शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना "१० तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू" असे सांगितले आहे.
Ans: पंतप्रधान मोदी यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी करत "तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, देश सांभाळण्यासाठी सुप्रिया सुळे आणि आम्ही आहोत," असा निरोप दिला. पवारांनीही त्यांचे आभार मानले.
Ans: राजकीय मार्ग दुरावले असले तरी आमचे कौटुंबिक संबंध कायम आहेत. रुग्णालयात राजकीय चर्चा करणे योग्य नसल्याने केवळ देश, राज्य आणि जागतिक राजकारणावर सामान्य गप्पा झाल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.






