Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jui Gadkari post: ‘आमची म्हातारी आज ७०ची झाली असती…’ सायलीची पूर्णा आजीच्या आठवणीत भावूक पोस्ट

Jui Gadkari post: मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त चाहते आणि कलाकार त्यांना आठवत आहेत. ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 31, 2026 | 04:44 PM
Jui Gadkari post: ‘आमची म्हातारी आज ७०ची झाली असती…’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jui Gadkari post: ‘आमची म्हातारी आज ७०ची झाली असती…’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ज्योती चांदेकर यांच्या जन्मदिवशी आठवणींना उजाळा
  • ‘पूर्णा आजी’च्या भूमिकेने जिंकली होती प्रेक्षकांची मनं
  • जुई गडकरीने शेअर केली भावुक पोस्ट
Jyoti Chandekar Birth Anniversary:  मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या कामाने वेगळी ओळख बनवणाऱ्या ज्योती चांदेकर आज आपल्यात नाहीत. पण आज त्यांचा जन्मदिवस. आजच्या दिवशी त्यांचे चाहते, त्यांच्यासोबत काम केलेले कलाकार सगळे त्यांना आठवत आहेत. ५० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी अभिनय केला. त्यांचं ते हसणं, त्यांचा तो करारी आवाज लोक कधीच विसरू शकत नाहीत.

सायली त्यांना अगदी आईसारखं मानायची

गेल्या वर्षी त्यांचं अचानक जाणं ही सगळ्यांसाठी खूप मोठी धक्कादायक बातमी होती.शेवटच्या दिवसांमध्ये त्या स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत दिसत होत्या. त्यात त्यांनी पूर्णा आजी पात्र केले होते. ती भूमिका लोकांना खूप आवडली होती. करारी पण आतून खूप मायाळू असं ते पात्र होतं. सगळं छान चालू होतं आणि अचानक त्यांच्या जाण्याची बातमी आली. तेव्हा सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं होतं.या मालिकेत सायलीचं काम करणारी अभिनेत्री जुई गडकरी आणि ज्योती ताईंचं एक वेगळंच नातं तयार झालं होतं. सायली त्यांना अगदी आईसारखं मानायची. त्यांची खूप काळजी घ्यायची. जुईने बऱ्याच वेळा याबद्दल पोस्ट पण टाकल्या होत्या. आज त्यांच्या वाढदिवशी सुद्धा जुईने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलंय की पूर्णा आजीची खूप आठवण येते. Jui Gadkari post:

जुई पोस्टमध्ये लिहिते की,

आज आमची म्हातारी ७०रीची झाली असती… सॅारी, म्हातारी म्हणतेय तुला!! तु नेहेमी स्वतःला “मी अशी मुलगीए” असं म्हणायचीस ना! 😅
पण खरच एनर्जीच्या बाबतीत मुलींनाही लाजवशील अशीच होतीस!!
तु खऱ्याअर्थाने “झिंदादिल” होतीस!!
Happy birthday Ajji!!! आज खा तुला हवं तितकं गोड! मी नाही ओरडणार!

ज्योती चांदेकर यांचा जन्म ३१ ऑगस्ट रोजी झाला होता. त्यांनी सुरुवात रंगभूमीपासून केली होती. नाटकातून हळूहळू त्या सिनेमात आणि नंतर टीव्हीवर आल्या. त्यांचा प्रवास खूप मोठा होता. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या गाजलेल्या सिनेमात त्यांनी केलेलं काम लोक आजही विसरले नाहीत. त्याचबरोबर ‘तिचा उंबरठा’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘सांजपर्व’, ‘पाऊलवाट’ सारख्या अनेक चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रत्येक भूमिका त्या जिवंत करायच्या.आणि आता त्यांची मुलगी तेजस्विनी पंडित हिने पण एक पोस्ट टाकली आहे. तेजस्विनी स्वतः एक मोठी अभिनेत्री आहे.

Jayanti 2 Movie: कॉलेजमधील रॅगिंग, जातीभेद अन् संघर्षाची कहाणी; ‘जयंती २’चा दमदार ट्रेलर लाँच, ‘या’ दिवशी होणार रिलीज

मुलगी तेजस्विनी पंडित पोस्टमध्ये काय लिहिलं?

तिने लिहिलंय, “आज आईचा ७० वा वाढदिवस असता. आम्ही तो खूप मोठ्या उत्साहात साजरा करणार होतो. पण ती आज नाहीये.” तिच्या या शब्दांमधून तिचं दुःख स्पष्ट दिसतंय.ज्योती ताई फक्त एक चांगल्या अभिनेत्री नव्हत्या, तर त्या खूप चांगल्या माणूस होत्या. सेटवर सगळ्यांशी आपुलकीने वागायच्या. नवीन कलाकारांना समजून घ्यायच्या. म्हणूनच आज त्या नसल्या तरी त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यांनी केलेल्या भूमिका आणि त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्यासोबत राहतील.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज

Web Title: Our old lady would have turned 70 today sayalis emotional post remembering purna aaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Entertainement News
  • jyoti chandekar
  • Marathi News

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये सुरू झाले पहिले ‘धान्य एटीएम’! अंगठा लावताच ३५ सेकंदांत मिळणार २५ किलो धान्य
1

नाशिकमध्ये सुरू झाले पहिले ‘धान्य एटीएम’! अंगठा लावताच ३५ सेकंदांत मिळणार २५ किलो धान्य

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले
2

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध
3

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ
4

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.