Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर जाणार राखी सावंत; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत केली मोठी घोषणा, ”दिल्लीत येऊन मीच”

NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना राखी सावंतचा पाठिंबा. “मी स्वतः दिल्लीला येऊन उपोषण सोडवेन,” असं म्हणत अभिनेत्रीने केली भावनिक विनंती.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 15, 2026 | 03:10 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जंतर-मंतरवर जाणार राखी सावंत?
  • राखीने सोनम वांगचुक यांनी केली विनंती
  • राखी स्वत: दिल्लीला जाऊन उपोषण सोडणार का?
Rakhi Sawant On Sonam Wangchuk:  NEET पेपर लीक प्रकरणानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना अनेक सामाजिक आणि राजकीय स्तरांवर या मुद्द्यावर आवाज उठवला जात आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर उपोषण सुरू केले आहे. सलग अनेक दिवस उपोषण सुरू असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या समर्थनार्थ सामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील सेलिब्रिटीही पुढे येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत हिनेही सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवत भावनिक आवाहन केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिने वांगचुक यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि उपोषण थांबवावं, अशी विनंती केली आहे.

राखी सावंत म्हणाली, “सोनमजी, कृपया माझी विनंती ऐका. मला दिल्लीतील जंतर-मंतरवर यायचं आहे. कृपया अशा लोकांसाठी तुमच्या जीवाची बाजी लावू नका. तुम्ही देशासाठी खूप मौल्यवान आहात. गरज पडली तर मी स्वतः दिल्लीला येऊन तुमचं उपोषण सोडवेन.”

Tejashri Pradhan New Car: लक्झरी कारची मालकीण झाली तेजश्री प्रधान; नव्या मर्सिडीजची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर

राखीच्या या वक्तव्यानंतर तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पत्रकारांनी तिला दिल्लीला प्रत्यक्ष जाणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर तिने ठामपणे सांगितले की, ती लवकरच जंतर-मंतरवर जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेणार असून त्यांना उपोषण संपवण्याची विनंती करणार आहे.

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी सेलिब्रिटींमध्ये राखी सावंत एकटी नाही. यापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशाला त्यांच्या नेतृत्वाची गरज असून त्यांनी स्वतःच्या आरोग्यालाही प्राधान्य द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं.


Shahrukh Khan Mannat House: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला कोर्टाकडून मोठा दिलासा; ३०० कोटींच्या बंगल्याबाबत महत्त्वाचा निर्णय

नेमकं आंदोलन कशासाठी?

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाचा मुख्य मुद्दा म्हणजे NEET परीक्षेतील पेपर लीक आणि गैरव्यवहार. आंदोलकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी, जबाबदारांवर कठोर कारवाई, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि परीक्षेशी संबंधित मानसिक तणावामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना न्याय व मदत देण्याची मागणी केली जात आहे. या मागण्यांसाठी आगामी संसदेच्या अधिवेशनादरम्यान मोठा शांततापूर्ण मोर्चाही काढण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

Web Title: Rakhi sawant extends support to sonam wangchuk amid his hunger strike over the neet paper leak protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • delhi
  • Rakhi Sawant
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा
1

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
2

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.