Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rinku Rajguru: पहिल्यांदा अल्बम साँग आणि ते सुद्धा विठ्ठलाचं, वारी आणि माझं नात अजून घट्ट झालं – रिंकू राजगुरू!

रिंकू राजगुरूचे सध्या वारीचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि रिंकूचे वारी स्पेशल गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत ती व्यक्त झाली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 11, 2026 | 12:02 PM
रिंकू राजगुरू दिसणार नव्या रुपात, विठ्ठलाचं गाणं प्रदर्शित

रिंकू राजगुरू दिसणार नव्या रुपात, विठ्ठलाचं गाणं प्रदर्शित

Follow Us
Follow Us:
  • आषाढी एकादशी निमित्ताने येणार रिंकू राजगुरूचे नवे गाणे 
  • पंढरपूरच्या वारीचा घेतला अनुभव 
  • सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल 
पाऊस आला की विठ्ठलाच्या पंढरीच्या वारीचे वेध हे सगळ्यांना लागतात आणि अशातच अभिनेत्री रिंकू राजगुरू यंदाची वारी अजून खास करण्यासाठी सज्ज होताना दिसते.काही दिवसांपूर्वी रिंकूचे वारी मधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि ती काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होत आणि आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सारेगम मराठीच्या आगामी वारी स्पेशल गाण्यात रिंकूचा एक नवा अंदाज अनुभवायला मिळणार आहे. सारेगम मराठीने सोशल मीडियावर गाण्याची एक छोटी झलक दाखवली आणि आता सगळेच या गाण्यासाठी उत्सुक आहेत. 

रिंकू राजगुरू… तुला पाहताच हृदयात होतंय काही तरी सुरु! पण याला प्रेम म्हणावे की वेड?

बाप विठुराया गाणं होणार प्रदर्शित 

“बाप विठुराया” अस या गाण्याचं नाव असून अजय गोगावले यांच्या दमदार आवाजात हे गाण बघायला मिळणार आहे. अजय यांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा बाप विठुराया गाण्यातून अनुभवायला मिळणार आहे.

गाण्याबद्दल बोलताना रिंकूने सांगितले की, “मला खूप आनंद होतोय की, माझं पहिलं अल्बम गाणं हे विठ्ठलावर चित्रीत आहे कारण माझं आणि विठ्ठलाच नातं खुप अगोदरपासूनच आहे. माझं विठ्ठलावर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. तो माझ्या प्रत्येक गोष्टीत माझ्या सोबत असतो मी त्याच्या सोबत खूप गप्पा ही मारते विठ्ठल हा माझ्या आयुष्यातल्या एक हळवा भाग आहे. त्यामुळे हे गाणं करताना मला असं वाटलं की त्याच्या मनात असावं म्हणून हे सगळं जुळून आलं कारण आजवर मी कधीच अल्बम song केलं नाही कारण माझी कामाची पद्धत जरा वेगळी आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे हे गाणं अजय गोगावले यांनी गायले आहे आणि फार वर्षांनी पुन्हा त्यांच्यासोबत काम करता आलं.सारेगम सोबत ही काम करता आलं याचाही मला खूप आनंद आहे.माझं पहिलं अल्बम song असल्याने हे माझ्यासाठी खुप खास आणि जवळच आहे. आणि आशा करते की प्रेक्षकांना ही ते तितकंच आवडेल”

”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

रिंकूचा वेगळा लुक 

रिंकूचा कधीही न पाहिलेला वेगळा पण तितकाच लक्षवेधी लुक या गाण्यातून प्रेक्षकांना बघायला तर मिळणार आहे पण पहिल्या वहिल्या अल्बम गाण्यासाठी रिंकू देखील तितकीच उत्सुक असल्याचं कळतंय. ११ जुलैला म्हणजे आज “ बाप विठुराया” हे गाण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अजय आणि अतुल यांची विठ्ठलाच्या भक्तीची गाणी ही नेहमीच प्रेक्षकांना आवडली आहेत आणि त्यामुळे या गाण्याबाबतही कमालीची उत्सुकता आहे आणि त्यातही चारचाँद म्हणजे या गाण्यात रिंकूचा साधेभोळेपणा आणि तिचा कमालीची नैसर्गिक अभिनय हेदेखील प्रेक्षकांना नक्कीच भावणार हे काही वेगळं सांगायला नको! 

Web Title: Rinku rajguru first wari album song expressed her love for vitthal and bhakti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi entertainment
  • New Song

संबंधित बातम्या

Prahaar Movie Song:  सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित
1

Prahaar Movie Song: सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
2

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
3

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल
4

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.