Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Riteish Deshmukh: रितेश देशमुखने शेअर केला ‘तो’ खास फोटो! पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक खास जुना फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. या छायाचित्रात रितेशचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 17, 2026 | 11:47 AM
Riteish Deshmukh: रितेश देशमुखने शेअर केला ‘तो’ खास फोटो! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Riteish Deshmukh: रितेश देशमुखने शेअर केला ‘तो’ खास फोटो! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रितेश देशमुखने शेअर केला अटलजींचा खास जुना फोटो
  • फोटोत विलासराव देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयी एकत्र
  • अटलजींच्या पुण्यतिथीनिमित्त रितेशने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
 

Entertainment News: अभिनेता रितेश देशमुख सोशलमीडियावर अनेकदा आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसतो. यावेळी त्याने एका अशा व्यक्तीमत्त्वाची आठवण काढली, ज्यांच्याबद्दल राजकीय मतभेद बाजूला ठेवनूही देशभरात आदर व्यक्त केला जातो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेशने एक्सवर एक खास फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

रितेशने शेअर केलेल्या छायाचित्रात त्याचे वडील माननीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत अटल बिहारी वाजपेयी दिसत आहेत. दोन्ही नेते एकामेकांशी हस्तांदोलन करताना दिसतात. या एका फोटोमुळे जुन्या राजकीय आठवणींनाही जणू उजाळा मिळाला आहे.

पोस्टमध्ये रितेशने काय लिहिले?

या पोस्टसोबत रितेशने अटलजींबद्दल आपल्या भावना मांडल्या. भारताच्या राजकीय इतिहासात त्यांचे स्थान खूप मोठे असल्याचे त्याने सांगितले. उत्तम राजकीय जाण असलेला नेता, संवेदनशील कवी आणि पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन सर्वांचा सन्मान मिळवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्याने वाजपेयींची आठवण केली. त्यांच्या स्मृतींना मनापासून अभिवादन करत असल्याचेही रितेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या कामाबद्दल सांगायंचे झाले तर…

अटल बिहारी वाजपेयी यांचे राजकीय आयुष्य अनेक दशकांचे होते. त्यांनी तीन वेळा देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली. भारतीय जनता पक्षाला देशाच्या राजकारणात मजबूत स्थान मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. मात्र अटलजींची ओळख केवळ एका पक्षाच्या नेत्यापुरती मर्यादित राहिली नाही. त्यांच्या बोलण्यातील सहजपणा, सभागृहातील भाषणाची शैली आणि विरोधकांचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

Shri Atal ji was one of the finest leaders India has produced. A statesman, a poet, and a mass leader who was loved and respected across party lines — I pay my humble tribute to him on his death anniversary today. pic.twitter.com/D6zEqFnQ2O — Riteish Deshmukh (@Riteishd) August 16, 2026

राजकारणात मतभेद असणे साहजिक आहे. मात्र मतभेद म्हणजे वैर नसते, हे अटलजींच्या राजकीय प्रवासातून अनेकदा दिसून आले. विरोधी विचारांच्या नेत्यांशी संवाद ठेवण्याची त्यांची पद्धत अनेकांना भावायची. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांकडूनही त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जात असे.

Govinda Controversy: गोविंदाच्या समर्थनार्थ सोमी अली मैदानात; कमी वयाच्या अभिनेत्रीला हिरोईन करण्यावर म्हणाली…

राजकारणात अटल वाजपेयी कसे होते?

त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कवी हा पैलूही तितकाच लोकप्रिय होता. राजकारणाच्या धावपळीतही शब्दांशी असलेले त्यांचे नाते कायम राहिले. त्यांच्या कविता आणि भाषणांमधून संवेदनशील विचार दिसून येत. त्यामुळे राजकीय क्षेत्राबाहेरील लोकांनाही अटलजींबद्दल आपलेपणा वाटत असे.

Jasmin Bhasin: ‘खतरों के खिलाड़ी 15’मध्ये धक्कादायक प्रकार! स्टंटनंतर जस्मिन भसीनला काहीच आठवेना; रोहित शेट्टी चिंतेत

रितेश देशमुखसाठी ही आठवण आणखी खास आहे. कारण त्याचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव होते. विलासराव देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा एकत्रित फोटो शेअर करून रितेशने केवळ एका माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली नाही, तर राजकारणातील एका जुन्या काळाची आठवणही जागी केली आहे. आजच्या वेगवान सोशल मीडिया जगात एखादा फोटो काही क्षणांत हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. रितेशची ही पोस्टही त्याला अपवाद ठरली नाही. अटलजींच्या कार्याची आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारी ही पोस्ट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: Riteish deshmukh post on x vilasrao deshmukh and atal bihari vajpayee photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.