(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bigg Boss 20: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरात दररोज नवनवीन वाद आणि घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच कॅप्टन्सी टास्कदरम्यान स्पर्धक यंग डीएसएसोबत झालेला वाद आणि बिग बॉसने दिलेली कठोर शिक्षा यानंतर स्काउट OP ने एक धक्कादायक निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या या कृतीमुळे घरातील वातावरण पुन्हा चर्चेत आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्काउट OP ने राग आणि निराशेच्या भरात स्वतःचं मुंडण केलं आहे. मात्र, त्याने हा निर्णय नेमका कोणत्या कारणामुळे घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे, स्काउटच्या टक्कल केलेल्या लूकचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे त्याच्या या निर्णयामागचं खरं कारण जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
स्काउट OP च्या या निर्णयामागे शोमध्ये घडलेल्या अलीकडच्या घटनांचा संबंध असल्याची चर्चा आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान स्काउटचा त्याचा जवळचा मित्र यंग डीएसएसोबत जोरदार वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की, दोघांमधील शाब्दिक बाचाबाचीने गंभीर स्वरूप धारण केलं आणि प्रकरण शारीरिक हिंसाचारापर्यंत पोहोचलं. या घटनेमुळे दोघांच्या मैत्रीतही तणाव निर्माण झाला.
नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बिग बॉसने स्काउट OP विरोधात कठोर भूमिका घेतली. त्याला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं असून, कॅप्टन्सी आणि इतर विशेष अधिकारही काढून घेण्यात आले आहेत. इतकंच नाही, तर स्काउटला घरातून कधीही बाहेर काढण्याचा अधिकार बिग बॉसने स्वतःकडे राखून ठेवला आहे. त्यामुळे शोमधील त्याचा पुढील प्रवास अधिक कठीण झाला आहे.
एकीकडे जवळच्या मित्रासोबत झालेला वाद, दुसरीकडे संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट होण्याची शिक्षा आणि त्यातच स्वतःचं मुंडण केल्याची समोर आलेली माहिती यामुळे स्काउट OP चा खेळ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने हे पाऊल नेमकं रागाच्या भरात उचललं की यामागे आणखी काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता या बदललेल्या लूकचा त्याच्या खेळावर आणि घरातील इतर सदस्यांसोबतच्या संबंधांवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






