(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘रॉकेट बॉयज’ या समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या मालिकेमुळे चर्चेत आलेले अभय पन्नू या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याबरोबरच पटकथाही लिहित आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण यावर्षाअखेरीस सुरू होणार असून, २०२७ मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
उद्योगातील सूत्रांच्या माहितीनुसार, YRF च्या पहिल्या हॉरर चित्रपटासाठी वरुण धवनची मुख्य अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. YRF ने आतापर्यंत अॅक्शन, रोमँटिक, थ्रिलर, ड्रामा अशा विविध शैलींतील चित्रपटांची निर्मिती केली असली, तरी हॉरर हा प्रकार अद्याप बाकी होता. आता अभय पन्नू यांच्या दिग्दर्शनातून हा नवा प्रवास सुरू होत आहे.
‘सैयारा’च्या यशानंतर निर्माता आदित्य चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली YRF नव्या पिढीतील दिग्दर्शकांना संधी देण्याच्या धोरणावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. मोहित सूरी आणि समीर सक्सेना यांच्यानंतर आता अभय पन्नू यांच्यावरही YRF ने विश्वास दाखवला आहे.
दरम्यान, ‘सुई धागा’नंतर वरुण धवनचा YRF सोबतचा हा दुसरा चित्रपट असणार असून, YRF च्या पहिल्या थिएटरिकल हॉरर चित्रपटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. २०२७ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
The Paradise Teaser: 20 कोटी व्ह्यूजनंतर ‘द पॅराडाइज’चा टीझर रिलीज; नानीचा दमदार अंदाज पुन्हा चर्चेत






