Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”

नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले असून नागरिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड गायक विशाल मिश्राने नेपाळ आणि आसाममध्ये विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 29, 2026 | 06:30 PM
नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • विशाल मिश्रा पूरग्रस्तांसाठी कॉन्सर्ट करणार
  • नेपाळ आणि आसाममध्ये संगीत कार्यक्रमांचे आयोजन
  • कॉन्सर्टमधील रक्कम आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून दिली जाणार
Bollywoood Singer Vishal Mishra Big Decision: नेपाळमध्ये आलेल्या महापुराने अनेक कुटुंबांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांचे घर, संसार आणि रोजगार वाहून गेले. या नैसर्गिक संकटात मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक नागरिकांचा अजूनही शोध सुरू आहे. त्यामुळे नेपाळसमोर सध्या मोठे आव्हान उभे राहिले आहे. पूर ओसरल्यानंतरही तेथील परिस्थिती लगेच पूर्वपदावर येणार नाही. अनेक गावांमध्ये घरांचे आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते, दळणवळण आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ज्यांनी या संकटातून जीव वाचवला, त्यांच्यासमोर आता नव्याने आयुष्य उभे करण्याचा प्रश्न आहे. अशा कठीण परिस्थितीत नेपाळमधील नागरिकांना मदतीची गरज आहे.

ही परिस्थिती पाहून देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. सामान्य नागरिकांपासून ते प्रसिद्ध व्यक्तींपर्यंत अनेकजण आपापल्या परीने पूरग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच आत्ता बॉलिवूडमधील गायक विशाल मिश्राचे सुद्धा नाव जोडले आहे.

विशाल मिश्राचा मदतीसाठी खास उपक्रम

विशाल मिश्राने पूरग्रस्तांसाठी थेट मदतीचा मार्ग निवडला आहे. त्याने नेपाळ आणि आसाममध्ये विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमातून जमा होणारी रक्कम आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती आणि कॉन्सर्टची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसून लवकरचं सोशलमीडियावर जाहीर केली जाईल. त्याच्या या निर्णयाचे सोशलमीडियावर जोरदार कौतुक होत आहे. त्यांच्या या संगीताच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा त्याचा हा प्रयत्न अनेकांना भावला आहे.

विशालने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली भावना व्यक्त

विशालने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली. नेपाळमध्ये घडलेल्या घटनेने आपल्याला खूप दुःख झाले असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे या संकटात काहीतरी करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्याने आपल्या पोस्टमधून नेपाळ आणि आसाममध्ये कॉन्सर्ट करण्याची माहिती दिली. या कार्यक्रमातून मिळणारा पैसा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला जाणार असल्याचे त्याने सांगितले. तसेच या उपक्रमाबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

विशालने आपल्या चाहत्यांना धीर देत, आपल्या परीने शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या छोट्याशा पण महत्त्वाच्या प्रयत्नामुळे संकटाच्या काळात कलाकार समाजासाठी कशा प्रकारे पुढे येऊ शकतात, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं

विशाल मिश्रा त्याच्या गाण्यांसाठी लोकप्रिय

विशाल मिश्रा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. त्याच्या आवाजातील अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘कैसे हुआ’, ‘पहले भी मैं’, ‘आज भी’ आणि ‘जानम’ यांसारख्या गाण्यांनी त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय ‘मांझा’, ‘रमता जोगी’ आणि ‘सौ ग्राम जिंदगी’ या गाण्यांनाही श्रोत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अलीकडे ‘टॉक्सिक’ चित्रपटातील ‘तबाही’ या गाण्यालाही त्याने आपला आवाज दिला आहे.

Emraan Hashmi: ‘आवारापन २’च्या यशाचा आनंद अन् इमरान हाश्मीला धक्का! ‘या’ आजाराचं निदान

गाण्यांच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या विशालने आता त्याच कलेचा उपयोग गरजू लोकांसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळ आणि आसाममधील पूरग्रस्तांसाठी होणाऱ्या या कॉन्सर्टमधून किती मदत जमा होते, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. संकटात सापडलेल्या लोकांसाठी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

Web Title: Vishal mishra to organise benefit concerts for nepal and assam flood victims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Nepal Flood

संबंधित बातम्या

Emraan Hashmi: ‘आवारापन २’च्या यशाचा आनंद अन् इमरान हाश्मीला धक्का! ‘या’ आजाराचं निदान
1

Emraan Hashmi: ‘आवारापन २’च्या यशाचा आनंद अन् इमरान हाश्मीला धक्का! ‘या’ आजाराचं निदान

Infosys Executive Missing : नेपाळमध्ये निसर्गाचा भयंकर कोप! महापुरात इन्फोसिसचे दिग्गज अधिकारी बेपत्ता!
2

Infosys Executive Missing : नेपाळमध्ये निसर्गाचा भयंकर कोप! महापुरात इन्फोसिसचे दिग्गज अधिकारी बेपत्ता!

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!
3

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!

Lonavala Tourism News :  वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे
4

Lonavala Tourism News : वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.