Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

YRF Rah Records: यशराज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची दमदार सुरुवात; अमनचं ‘जादूगरी’ पहिलंच गाणं प्रदर्शित

YRF Rah Records: यशराज फिल्म्सच्या 'राह रेकॉर्ड्स'ची दमदार सुरुवात झाली आहे. गायक-गीतकार अमनचं 'जादूगरी' हे पहिलं ओरिजिनल गाणं प्रदर्शित झालं असून, संगीतप्रेमींमध्ये त्याची चर्चा रंगली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 05, 2026 | 04:50 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

YRF Rah Records: यशराज फिल्म्सने नुकत्याच सुरू केलेल्या ‘राह रेकॉर्ड्स’ या नव्या संगीत लेबलने अवघ्या एका दिवसात आपलं पहिलं ओरिजिनल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. गायक-गीतकार अमन याचं ‘जादूगरी’ हे भावस्पर्शी गाणं सर्व प्रमुख ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलं असून, याच गाण्याद्वारे ‘राह रेकॉर्ड्स’च्या संगीतप्रवासालाही सुरुवात झाली आहे.

‘जादूगरी’मधून प्रेम आणि विरहाची भावनिक कहाणी

‘जादूगरी’ हे प्रेम, विरह आणि नातं हातातून निसटल्यानंतर होणाऱ्या पश्चात्तापावर आधारित भावनिक गीत आहे. हे गाणं अमनने स्वतः लिहिलं असून त्यानेच ते सादर केलं आहे. नात्यातील न बोललेले संवाद, व्यक्त न झालेल्या भावना आणि गृहीत धरलेल्या प्रेमाची जाणीव या गाण्यात प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

‘राह रेकॉर्ड्स’सोबत अमनच्या नव्या प्रवासाची सुरुवात

या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये अमनसोबत अभिनेत्री शिवांगी नेगी झळकली आहे. दोघांमधील सुंदर नात्याच्या आठवणी आणि त्यानंतर वाढत जाणारं भावनिक अंतर याचं प्रभावी चित्रण या व्हिडिओमध्ये करण्यात आलं आहे. ‘जादूगरी’ हे शीर्षक प्रेमाच्या त्या जादूचं प्रतीक आहे, ज्याची खरी किंमत ते हरवल्यानंतरच कळते.

‘राह रेकॉर्ड्स’च्या टॅलेंट डेव्हलपमेंट उपक्रमांतर्गत गेल्या वर्षभरापासून अमनसोबत सातत्याने काम करण्यात आलं. या काळात त्याने आपल्या गीतलेखनाची शैली अधिक समृद्ध केली आणि स्वतःची स्वतंत्र संगीत ओळख निर्माण केली. अमनच्या माध्यमातून कलाकारांना दीर्घकालीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या ‘राह रेकॉर्ड्स’च्या ध्येयाची सुरुवात झाली आहे.

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार

‘जादूगरी’बद्दल बोलताना अमन म्हणाला, “हे गाणं अतिशय वैयक्तिक भावनेतून जन्माला आलं आहे. अनेकदा एखादं नातं संपल्यानंतरच त्याची खरी किंमत कळते. प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीही गृहीत धरू नये, हीच भावना या गाण्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.”

‘रोया था’नंतर अमनची आणखी एक मोठी झेप

यापूर्वी अमनचं ‘रोया था’ हे गाणं स्पॉटिफायवर जवळपास ५० लाख वेळा ऐकलं गेलं असून, त्याने भारतातील उदयोन्मुख गायक-गीतकारांमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता ‘जादूगरी’च्या माध्यमातून तो ‘राह रेकॉर्ड्स’चा पहिला अधिकृत कलाकार ठरला असून, त्याच्या संगीत कारकिर्दीतील नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

Kajol Birthday Special: ‘DDLJ’ ते ‘कुछ कुछ होता है’; ९० च्या दशकात गाजलेले काजोलचे ५ आयकॉनिक चित्रपट

Web Title: Yrf rah records aman jadugari first song release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत
1

Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत

The Fix Trailer: ‘द फिक्स’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित! लिअम नीसन, झॅकरी लेव्हीसोबत एलनाझ नोरोझीची दमदार एंट्री
2

The Fix Trailer: ‘द फिक्स’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित! लिअम नीसन, झॅकरी लेव्हीसोबत एलनाझ नोरोझीची दमदार एंट्री

Zee Marathi: ‘दीपज्योती’ आणि ‘सनई चौघडे’मध्ये भावनिक ट्विस्ट; दीप-ज्योती, जय-शरूच्या नात्यांना मिळणार नवं वळण
3

Zee Marathi: ‘दीपज्योती’ आणि ‘सनई चौघडे’मध्ये भावनिक ट्विस्ट; दीप-ज्योती, जय-शरूच्या नात्यांना मिळणार नवं वळण

Colors Marathi Mega Drama: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये छवी-अनिकेत होणार बेघर? ‘मोहिनी’च्या आयुष्यातही येणार मोठं वादळ
4

Colors Marathi Mega Drama: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये छवी-अनिकेत होणार बेघर? ‘मोहिनी’च्या आयुष्यातही येणार मोठं वादळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.