फोटो सौजन्य: Freepik
हल्ली जेवढे आपले शरीर तंदुरुस्त राहणे गरजेचे तेवढेच आपल्या मेंदूचे आरोग्य चांगले असणे गरजेचे. यामुळेच तर अनके जण आपल्या दैनंदिन आहारात ड्राय फ्रुटस समाविष्ट करत असतात. पण बदलती लाइफस्टाइल आणि चुकीचा आहार घेणे हल्ली सामान्य झाले आहे. यामुळे फक्त तुमच्या शरीरावरच नव्हे तर मेंदूच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो.
मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे हे स्ट्रोकचे लक्षण असू शकते. हा एक धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे ज्यामुळे मेंदूला गंभीर नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. जेव्हा रक्त पेशींना चिकटून राहते आणि मेंदूला योग्यरित्या रक्त पोहोचू शकत नाही तेव्हा मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार व्हायला लागतात.
इस्केमिक सेरेब्रोव्हस्कुलर स्ट्रोक ही हृदयाशी निगडित एक गंभीर स्थिती आहे. या प्रकारच्या स्ट्रोकमध्ये मेंदूतील रक्ताभिसरणात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे मेंदूपर्यंत रक्त योग्य प्रकारे पोहोचत नाही. परिणामी मेंदूमध्ये ऑक्सिजनची कमी तसेच पोषक तत्वांची कमी निर्माण होते व मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात.
आता यावर काही औषध उपलब्ध आहे का? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. मेंदूतील या रक्ताच्या गुठळ्या कमी करण्यासाठी तुम्ही औषधं किंवा शस्त्रक्रिया या दोन पर्यायांचा अवलंब करू शकता. अँटीकोआगुलंट्स हे एक असे औषध आहे जे रक्ताच्या गुठळ्यांची संख्या कमी करते. तर काही केसेसमध्ये मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते.






