कडूलिंब त्वचाविकार, पोटाचे विकार, मलेरिया अशा अनेक आजारांवरील उपचारांमध्ये खूप उपयुक्त आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, कोरोना प्रतिबंधावरही कडूलिंब (Bark Of Neem Tree Helpful To Treat And Reduce Coronavirus Spread) परिणामकारक असल्याची माहिती संशोधनातून मिळाली आहे. कोलकाता(kolkata) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन ॲन्ड रिसर्च (आयसर) (Eiser Institute Findings) या संस्थेने या विषयावर संशोधन केले आहे. कडूलिंबावर (Neem) आधारित औषधाची निर्मिती करण्याबाबतही आयसर विचाराधीन आहे.
[read_also content=”सावधान! सकाळच्या न्याहारीबरोबर चहा घेताय, मग हे वाचा, शरिरावर होतील असे गंभीर परिणाम https://www.navarashtra.com/health/health/drinking-tea-with-breakfast-causes-many-problems-read-full-article-nrak-248245.html”]
कडूलिंबाच्या झाडाच्या सालीचा अर्क भारतात अनेक आजारांवर औषध म्हणून वापरात आहे. विषाणू आणि जीवाणू विरोधी गुणधर्मासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणारा घटक म्हणून कडूलिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरोना विषाणू संसर्गाची तीव्रता कमी करण्यात तसेच संसर्गाचा वेग रोखण्यातही कडूलिंब गुणकारी ठरणार असल्याचे आयसर कोलकाताच्या संशोधनातून निष्पन्न झाले आहे.
विषाणूजन्य आजारांवरील संशोधनावर आधारित एका नियताकलिकामध्ये या संशोधनावर आधारित शोधनिबंधाचा समावेश करण्यात आला आहे. आगामी काळात येऊ शकणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रकारांवर कडुलिंबयुक्त औषध उपयोगी ठरणार असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे. या संशोधनासाठी आयसर कोलकाताला कोलोरॅडो विद्यापीठाचे सहकार्य लाभले आहे.
घशाला झालेल्या संसर्गावर ज्या प्रकारे आपण द्रव स्वरुपातील औषधाचा वापर करतो, त्याचप्रमाणे कोरोना संसर्गावर उपचार करण्यासाठी कडुलिंबयुक्त औषध तयार करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही. या औषधामुळे येणाऱ्या प्रत्येक कोरोना विषाणूच्या प्रकारावर नवीन औषध विकसित करण्याची गरज भासू नये असा प्रयत्न असल्याचे कोलोरॅडो विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतात प्राण्यांवर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये कडूनिंबाच्या सालीच्या अर्कातून तयार झालेले औषध कोरोना विषाणूच्या वाढीचा वेग रोखण्यात अत्यंत परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कोलोरॅडो विद्यापीठाने या औषधाच्या चाचण्या मानवामध्ये केल्या असून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन्ही आघाड्यांवर त्या औषधाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या औषधामुळे विषाणूच्या वाढीचा वेग मंदावतो. तसेच विषाणूची तीव्रता कमी करण्यास कडूलिंब उपयुक्त असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. औषध निर्मितीचे उद्दीष्ट ठेवून कडूलिंबाच्या सालीच्या अर्कातील नेमका कोणता घटक विषाणूविरोधी काम करतो याबाबत अभ्यास करण्यात येत असून त्यावर औषधाची मात्रा निश्चित करण्यात येणार असल्याचे या शोधनिबंधात स्पष्ट करण्यात आले आहे.