हरियाणामध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील स्मशानभूमीत भिंत कोसळून (Cremation Ground Gurugram) चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुरुग्राम पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
[read_also content=”डोळ्यासमोर पोटच्या मुलीची हत्या! आईने आरोपीचा जीव जाईपर्यंत दगडाने ठेचून घेतला बदला https://www.navarashtra.com/crime/bengaluru-double-murder-man-stabs-woman-to-death-victims-mother-kills-accused-nrps-525813.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील गुरुग्राममधील सायबर सिटीतील मदनपुरी रोड येथील रामबाग परिसरात ही घटना घडली. येथे स्मशानभूमीची भिंत कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेदरम्यान घडली.
शनिवारी संध्याकाळच्या सुमारास स्मशानभूमीलगतच्या गावातील काही लोक भिंतीजवळ बसले होतेयावेळी काही लहानं मुलं खेळत होती. दरम्यान, अचानक भिंत अचानक कोसळल्याने काही लोक व लहान मुले त्याखाली दबली. स्थानिक लोकांनी तात्काळ ढिगारा उचलण्यास सुरुवात केली आणि दबलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात नेले. डाक्टॅरांनी चार जणांना तपासून मृत घोषित केलं.