Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अनुदानाचा हफ्ता अद्याप मिळालेला नाही. अशा काही महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण, लाडकी बहीण योजनेच्या तीन महिन्यांचा 4500 रुपयांचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातून देण्यात आली.
04 Feb 2026 07:03 PM (IST)
तासगाव: तासगाव तालुक्यातील सावळज जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून, वायफळे, वडगाव, सावळज, जरंडी, डोंगरसोनी, सिद्धेवाडी, दहिवडी, अंजनी, नागेवाडी, यमगरवाडी आणि लोकरेवाडी या सर्व गावांत पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना मोठा व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे संपूर्ण गटातील वातावरण राष्ट्रवादी (श. प.)च्या बाजूने झुकताना दिसत आहे.
04 Feb 2026 06:42 PM (IST)
भारतातील शेती क्षेत्रातील नवकल्पना आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी TAFE (Tractors and Farm Equipment Limited) ने ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा २०२६ – #SabseBadeAllrounder Ki Talaash’ च्या सीझन ३ ची अधिकृत घोषणा केली आहे. दोन यशस्वी पर्वांनंतर सुरू होणारा हा सीझन आतापर्यंतचा सर्वात मोठा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
04 Feb 2026 06:36 PM (IST)
पुणे: गेल्या 22 तासांपेक्षा जास्त कालावधीपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आडोशी बोगद्यावाजवळ टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यातच आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. द्रुतगती मार्गावर 22 तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे.
04 Feb 2026 06:30 PM (IST)
T20 World Cup Prize Money: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. ७ फेब्रुवारी २०२६ पासून क्रिकेटमधील सर्वात मोठा महासंग्राम म्हणजेच टी-२० विश्वचषक २०२६ ला सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत २० संघ मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत विजेत्या संघावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडणार असून, उपविजेत्या संघाचीही चांदी होणार आहे.
04 Feb 2026 06:24 PM (IST)
Kolkata Airport Emergency Landing News: पश्चिम बंगालमधील कोलकाता विमानतळावर तुर्की एअरलाइन्सच्या एका विमानाचे पूर्ण आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हे विमान काठमांडूहून इस्तंबूलला जात होते. तुर्की एअरलाइन्सच्या फ्लाइट ७२७ चे कोलकाता विमानतळावर पूर्ण आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या कॅप्टनने कोलकाता विमानतळावर उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याची शक्यता नोंदवली होती. हे विमान दुपारी २:४९ वाजता कोलकाता एनएससीबीआय विमानतळावर पोहोचले. विमान २३६ प्रवाशांसह विमानात होते.
04 Feb 2026 06:18 PM (IST)
Shaktipeeth Express News: “शक्तीपीठ महामार्ग हा विकासाच्या नावाखाली शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेला उद्ध्वस्त करण्याचा सुनियोजित कट आहे. सिंचनाखालील असणारी सुपीक शेती, गावे आणि जीवन उद्ध्वस्त करणारा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. न मागता महामार्ग का देता ? त्यासाठी सिंचनासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली एक इंच जमीनही देणार नाही,” असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ नेते डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
04 Feb 2026 06:12 PM (IST)
गेले अनेक महीने इस्त्रायल आणि गाझा पट्टीत संघर्ष सुरू आहे. तसेच इस्त्रायल आणि हमासमध्ये सीजफायर झाले आहे. तरी देखील इस्त्रायलने हमासवर भीषण हल्ला केला आहे. युद्धविराम झाला असला तरी देखील हा संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. इस्त्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीत भीषण बॉम्ब वर्षाव केला आहे. त्यामध्ये तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
04 Feb 2026 05:56 PM (IST)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचला असून, घरातील प्रत्येक टास्क चुरशीचा ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका टास्कमध्ये टोपल्यांच्या संख्येवरून झालेल्या वादामुळे घरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. या टास्कदरम्यान करण आणि रुचिता यांच्यातील वाद इतका वाढला की, संपूर्ण घराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.
04 Feb 2026 05:44 PM (IST)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असून, रिपोर्टनुसार मागील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये देशभरात एकूण 18042 इलेक्ट्रिक वाहने विक्री झाली आहे. जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 11909 युनिट्स इतकी होती. आकडेवारीनुसार Year-on-Year आधारावर विक्रीत तब्बल 51 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
04 Feb 2026 05:23 PM (IST)
क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. ७ फेब्रुवारी २०२६ पासून क्रिकेटमधील सर्वात मोठा महासंग्राम म्हणजेच टी-२० विश्वचषक २०२६ ला सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत २० संघ मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत विजेत्या संघावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडणार असून, उपविजेत्या संघाचीही चांदी होणार आहे.
04 Feb 2026 04:50 PM (IST)
अनुराग सिंग दिग्दर्शित “बॉर्डर २” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन १२ दिवस झाले आहेत आणि तो ३०० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांत चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय घट झाली असली तरी, आठवड्याच्या शेवटी अजूनही वाढ होण्याची आशा आहे. १२ व्या दिवसापर्यंत, बॉर्डर २ ची देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरील कमाई २८६ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. चित्रपटाचे थिएटरमध्ये वर्चस्व असताना, त्याच्या ओटीटी रिलीजबद्दलची चर्चा देखील तीव्र झाली आहे. तर, हा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे ते जाणून घेऊया.
04 Feb 2026 04:40 PM (IST)
आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात धडक मारली. ३ फेब्रुवारी रोजी क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकात 7 गडी गमवून 277 धावा उभ्या केल्या. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 47.3 षटकात 250 धावाच करू शकला. परिणामी इंग्लंड संघाने अंतिम सामन्यात एंट्री केली. आता अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध आज खेळवण्यात येत असलेल्या हरारे येथील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजयी संघ खेळणार. दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने आहेत.
04 Feb 2026 04:35 PM (IST)
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान 7 फेब्रुवारीला होणार आहे तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी असणार आहे. याचदरम्यान आता कर्जतमधून भाजप उमेदवार राधिका ठाकरे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. चिंचवली येथील कॉर्नर सभेत भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळाल्यास करोडोंची विकास कामे करण्याचा निर्धार भाजप कडून मतदारांना आश्वासन देताना व्यक्त होत आहे.
04 Feb 2026 04:25 PM (IST)
जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, बिघडलेले मानसिक आरोग्य, पोषक घटकांची कमतरता आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. एकजागेवर बसून तासनतास काम करत राहिल्यामुळे केवळ शारीरिक आरोग्याचं नाहीतर मानसिक आरोग्य सुद्धा बिघडते. त्यामुळे शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. आठवड्याभराच्या धावपळीनंतर थकवा आणि मानसिक ताण जाणवतो. यामुळे शरीराला आणि मनाला विश्रांतीची आवश्यकता असते.
04 Feb 2026 04:20 PM (IST)
नेत्यांना दिले जाणारे हेलिकॉप्टर्सची अवस्था अत्यंत वाईट आहे. सध्या निवडणुकीसाठी या हेलिकॉप्टरचा वापर रिक्षासारखा होतो आहे. एक ट्रिप मारली कि लगेच दुसरी ट्रिप, लगेच तिसरी ट्रिप. त्यांचे मेंटेनन्सही कागदोपत्री होते की काय, असा आरोप राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. सोमवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने भविष्यातील दुर्घटना टळली. याविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री शिरसाट यांनी हे आरोप केले. दरम्यान, या आरोपामुळे आता नव्या चर्चेला उधाण आले आहे.
04 Feb 2026 04:15 PM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असून, १० फेब्रुवारीपासून बारावीच्या तर २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर विशेष दक्षता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
04 Feb 2026 04:10 PM (IST)
ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने घेतले जाते. कारण ही वास्तू केवळ दगड–मातीची रचना नसून, ती आहे एका क्रांतीची साक्ष आहे. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी येथेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यामुळे ‘भिडेवाडा’ ही केवळ वास्तू न राहता, स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक संघर्षाची आणि परिवर्तनाची साक्षीदार ठरली आहे. हाच ऐतिहासिक ‘भिडेवाडा’ आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या वास्तूच्या प्रेरणादायी वारशातून जन्मलेली एका तरुणीच्या जिद्दीचा, स्वप्नांचा आणि संघर्षाचा प्रवास ‘भिडेवाडा’ या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. भूतकाळाच्या प्रेरणेतून वर्तमानाशी नाळ जोडणारी ही कथा समाजमनाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.
04 Feb 2026 04:05 PM (IST)
‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची अधिकृत प्रचाराची सांगता आज गुरुवारी रात्री दहा वाजता होणार आहे. जिल्ह्यात तब्बल पावणेनऊ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांनी राजकीय वातावरण तापले असून या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. रात्रीपासून छुप्या पद्धतीने प्रचार केला जाणार आहे. अनेक मतदार संघात ‘काँटे की टक्कर’ लढत असल्याने ‘लक्ष्मी दर्शन’ ची शक्यता नाकारता येत नाही.
04 Feb 2026 03:55 PM (IST)
नेत्यांना दिले जाणारे हेलिकॉप्टर्सची अवस्था अत्यंत वाईट आहे. सध्या निवडणुकीसाठी या हेलिकॉप्टरचा वापर रिक्षासारखा होतो आहे. एक ट्रिप मारली कि लगेच दुसरी ट्रिप, लगेच तिसरी ट्रिप. त्यांचे मेंटेनन्सही कागदोपत्री होते की काय, असा आरोप राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. सोमवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने भविष्यातील दुर्घटना टळली. याविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री शिरसाट यांनी हे आरोप केले. दरम्यान, या आरोपामुळे आता नव्या चर्चेला उधाण आले आहे.
04 Feb 2026 03:40 PM (IST)
ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने घेतले जाते. कारण ही वास्तू केवळ दगड–मातीची रचना नसून, ती आहे एका क्रांतीची साक्ष आहे. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी येथेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यामुळे ‘भिडेवाडा’ ही केवळ वास्तू न राहता, स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक संघर्षाची आणि परिवर्तनाची साक्षीदार ठरली आहे. हाच ऐतिहासिक ‘भिडेवाडा’ आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या वास्तूच्या प्रेरणादायी वारशातून जन्मलेली एका तरुणीच्या जिद्दीचा, स्वप्नांचा आणि संघर्षाचा प्रवास ‘भिडेवाडा’ या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. भूतकाळाच्या प्रेरणेतून वर्तमानाशी नाळ जोडणारी ही कथा समाजमनाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.
04 Feb 2026 03:30 PM (IST)
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका महापौरपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित झाले आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार उपमहापौर पद राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मिळणार आहे. या पदासाठी शहर जिल्हाध्यक्षांकडून गजानन मगदूम यांचा अर्ज भरला जाणार असल्याचे सांगितले. सांगली येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची संयुक्त बैठक आज पार पडली. या बैठकीत भाजपकडून धीरज सूर्यवंशी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गजानन मगदूम यांची उपमहापौर पदासाठी सर्वानुमते उमेदवारी निश्चित करण्यात आली.
04 Feb 2026 03:20 PM (IST)
MS Dhoni’s comments on the T20 World Cup 2026 : पुरुष टी-२० विश्वचषकाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवार होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन संयुक्तपणे भारत आणि श्रीलंका हे देश करणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच देश कामाला लागले आहेत. अशातच, भारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २०२६ च्या पुरुष टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या संधीवर भाष्य केले आहे. त्याच्यामते दाबाव असणाऱ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी संघाकडे अनुभव, कौशल्य आणि संतुलन यांचे योग्य संयोजन असल्याचे म्हटले आहे.
04 Feb 2026 03:10 PM (IST)
Zilla Parishad Fund 2026 News Marathi: महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाच्या दृष्टीने १६व्या वित्त आयोगाने दिलेली शिफारस अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींसाठी तब्बल २६, २५४ कोटी रुपयांचा निधी पुढील पाच वर्षात उपलब्ध होणार आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या या निधीमुळे ग्रामीण पायाभूत सुविधा, मूलभूत सेवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक क्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
04 Feb 2026 03:02 PM (IST)
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात, घरातील प्रत्येक वस्तूचे एक विशिष्ट महत्त्व आहे. या वस्तू योग्य दिशेने आणि योग्य उद्देशाने ठेवल्या जातात. बऱ्याच जणांना घरामध्ये मासे ठेवायला आवडतात. घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी घरामध्ये काहीजण चांदीचे मासे ठेवतात. आजकाल चांदीच्या वाढत्या दरामुळे प्रत्येकजण ते खरेदी करू शकत नाही. अशा वेळी तुम्ही पितळेचे मासे खरेदी करू शकता आणि ते तुमच्या घरात ठेवू शकता. हे देखील शुभ मानले जातात. पितळाचा मासा घरात ठेवणे शुभ असते का जाणून घ्या.
04 Feb 2026 02:55 PM (IST)
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका महापौरपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित झाले आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार उपमहापौर पद राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मिळणार आहे. या पदासाठी शहर जिल्हाध्यक्षांकडून गजानन मगदूम यांचा अर्ज भरला जाणार असल्याचे सांगितले.
04 Feb 2026 02:50 PM (IST)
बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी "अस्सी" चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलिकडेच, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, तापसीने देशात लैंगिक अत्याचारच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. तिने सांगितले की अशा प्रकरणांमध्ये १० वर्षांचा मुलगा देखील गुन्हेगार ठरतो आहे आणि जर मुलांना दिशाभूल केली गेली तर आपण काहीतरी चुकीचे करत आहोत. या विषयावर चिंता व्यक्त करताना, तापसीने ते बदलण्याची गरज असल्याचे व्यक्त केले आहे.
04 Feb 2026 02:40 PM (IST)
कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीची भररस्त्यात अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृत व्यक्तीच्या छातीवर पाय ठेवून पोलिसांची वाट पहिली. मृतव्यक्तीचे नाव बसप्पा होसमानी (वय 51, बसडोणी गावाचा रहिवासी) असे आहे. ही घटना हुलिकट्टी गावाजवळील रस्त्यावर सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गाव हादरून गेले आहे.
04 Feb 2026 02:25 PM (IST)
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असताना, आज अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पात त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. काल अकोल्यात आणलेला अस्थी कलश आज सकाळी जलाशयावर नेण्यात आला. यावेळी आमदार अमोल मिटकरी यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देताना आमदार मिटकरी अत्यंत भावुक झाले होते. लाडक्या दादांच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी यावेळी जड अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली वाहिली.
04 Feb 2026 02:20 PM (IST)
१ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखा हाय अलर्टवर आहेत. बिश्नोई टोळीने केलेल्या हल्ल्यानंतर, दिग्दर्शकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पूर्वी त्यांच्या घरी फक्त दोन पोलिस तैनात होते, परंतु आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्याने असेही सांगितले की मुख्य गोळीबार करणाऱ्याची ओळख पटली आहे आणि त्याला अटक करण्यासाठी पथके काम करत आहेत. शिवाय, या प्रकरणात आतापर्यंत अधिक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
04 Feb 2026 02:10 PM (IST)
मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी मुंबईतील एका विध्यार्थायचा मृतदेह आढळून आला आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. नमन अग्रवाल (२१ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मूळचा राजस्थान येथील रहिवासी आहे. तो शिक्षणाकरिता मुंबईत आला होता.
04 Feb 2026 02:05 PM (IST)
“किस देश में है मेरा दिल” आणि “कहानी घर घर की” या गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता दीपक काजरीवाल सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये “द कपिल शर्मा शो” फेम अभिनेत्री उपासना सिंग दिसत आहे. ती CINTAA ची सरचिटणीस देखील आहे. २६ जानेवारी रोजी दोघांमध्ये वाद झाला. अभिनेत्रीचा दावा आहे की अभिनेत्याने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला मारहाणही केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि आता १० दिवसांनी ती शेअर केली जात आहे.
04 Feb 2026 02:00 PM (IST)
चंद्रपूर: ‘हर घर जल’ असा नारा देऊन जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनला निधीची चणचण भासू लागली आहे. योजना गेल्या काही महिन्यांपासून राज्य आणि केंद्र सरकार पाहिजे तितका निधी देत नसल्याने कंत्राटदारांची कोट्यवधींचे देयक थकीत आहे. काही दिवसांपूर्वीच कंत्राटदारांच्या देयकापोटी पाच कोटींचा निधी जिल्ह्याच्या वाट्याला आला. कंत्राटदारांना ६० कोटी देणे असताना पाच कोटी आले. देयकाच्या तुलनेत ही रक्कम केवळ ८ टक्के एवढी असल्याने कोणाचा हिशेब करावा असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पडला आहे.
04 Feb 2026 02:00 PM (IST)
इराण (Iran) आणि अमेरिकेतील (America) तणाव अजूनही निव्वळलेला नाही. दोन्ही देशांमध्ये सध्या अणु करारवार चर्चा सुरु होणार आहे. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये पार पडणार आहे. परंतु याच वेळी तुर्कीने अमेरिका-इराण तणावात उडी घेतली असून मध्यस्थीची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु यावर इराणने नकार दिला असून अमेरिकेकडे मोठी मागणी केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ली अली खामेनेई यांनी अमेरिकेशी संवादात तुर्कीच्या मध्यस्थीला नकराल दिला आहे.
04 Feb 2026 01:55 PM (IST)
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी मुंबईतील एका विध्यार्थायचा मृतदेह आढळून आला आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. नमन अग्रवाल (२१ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मूळचा राजस्थान येथील रहिवासी आहे. तो शिक्षणाकरिता मुंबईत आला होता.
04 Feb 2026 01:50 PM (IST)
“किस देश में है मेरा दिल” आणि “कहानी घर घर की” या गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता दीपक काजरीवाल सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये “द कपिल शर्मा शो” फेम अभिनेत्री उपासना सिंग दिसत आहे. ती CINTAA ची सरचिटणीस देखील आहे. २६ जानेवारी रोजी दोघांमध्ये वाद झाला. अभिनेत्रीचा दावा आहे की अभिनेत्याने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला मारहाणही केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि आता १० दिवसांनी ती शेअर केली जात आहे.
04 Feb 2026 01:47 PM (IST)
सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ पंचायत समितीच्या १३० गणांसाठी शनिवारी (दि.७) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्ह्यात ११ हजार ८२२ मतदान यंत्र तैनात करण्यात आले आहेत. सातारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २१ लाख ९४ हजार ११० मतदार मतदान करणार आहेत. यासाठी 20 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
04 Feb 2026 01:30 PM (IST)
लातूर जिल्ह्यातील खोपेगाव शिवारात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या मुलानेच आपल्या आयकर अधिकारी वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.वडील आणि मुलामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर गंभीर भांडणात झाले. संतापाच्या भरात मुलाने चाकूने वडिलांवर वार केला. या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला आहे. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
04 Feb 2026 01:25 PM (IST)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ 6 आता खऱ्या अर्थाने रंगात आला आहे. घरात सुरुवातीला दिसणारी सलोखा आणि संयमाची पातळी आता हळूहळू संपुष्टात येत असून, सदस्यांमधील दडलेले मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. छोट्या-छोट्या कारणांवरून सुरू होणारे वाद आता थेट संघर्षात बदलताना दिसत आहेत. काही दिवसांपासून घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, सदस्यांमधील वादाचे गोळे एकामागोमाग एक फुटू लागले आहेत. यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढली असून, पुढील एपिसोड्समध्ये आणखी काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात प्रचंड मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
04 Feb 2026 01:18 PM (IST)
पांढऱ्या कोटांतले डॉक्टर, हातात फाईल्सऐवजी पटकथा, वॉर्ड, ओपीडी आणि कॉरिडॉरमध्ये रुग्णांची गर्दी जशीच्या तशी, पण त्याच जागी थोड्याच वेळात कॅमेऱ्याचा फ्रेम, लाईट्स आणि “ऍक्शन”चा आवाज घुमतोय. हे एखाद्या चित्रपटाचं सेटअप वाटेल, पण हे दृश्य आहे केईएम रुग्णालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाचं. जिथे उपचारांबरोबरच जनजागृतीचीही तितकीच गंभीर तयारी सुरू आहे. आजारावर उपचार होण्याआधी आजार समजणं गरजेचं असतं. हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवत मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाने शताब्दी वर्षानिमित्त एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे. विविध सामान्य आजारांवर आधारित ६७ रुग्णशिक्षण लघुपटांची निर्मिती करून केईएमने आरोग्य जनजागृतीच्या क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केला आहे.
04 Feb 2026 01:15 PM (IST)
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज भारत १९ वर्षांखालील संघ विरुद्ध अफगाणिस्तान १९ वर्षांखालील संघ यांच्यात दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सुरू आहे. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारतीय १९ वर्षांखालील संघाचा स्फोटक खेळाडू वैभव सूर्यवंशीला या सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. या स्पर्धेत आतापर्यंत वैभव सूर्यवंशीने ३९ पेक्षा जास्त सरासरीने १९६ धावा फटकावल्या आहेत. त्याला बाबर आझमचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
04 Feb 2026 01:10 PM (IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोण असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच पार्थ पवार की जय पवार याची चर्चा सुरु आहे.
04 Feb 2026 01:00 PM (IST)
"मर्दानी ३" ने सुरुवातीच्या काळात बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती, परंतु चौथ्या दिवसापासून हा चित्रपट डगमगताना दिसत आहे. पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी केली नाही आहे.
04 Feb 2026 12:50 PM (IST)
बीडमध्ये पैशांच्या वादातून एका तरुणाने आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. बीड LCBने अवघ्या 24 तासांत आरोपी अतिक तांबोळी याला अटक करत खुनाचा छडा लावला आहे.
04 Feb 2026 12:45 PM (IST)
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ एक गॅस टँकर उलटल्याने १२ तासांनंतरही वाहतूक कोंडी झाली. हजारो वाहने अजूनही अडकून आहेत. अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग आणि रेल्वे प्रवासाचा सल्ला दिला आहे.
04 Feb 2026 12:40 PM (IST)
राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईचा अपघात घडवून आणण्यात आला आहे. पुनावाला यांच्या गाडीला कारने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सीएनजी पंपावर हा प्रकार घडला आहे. पंपावर मुद्दामून कार चालकाने शहजाद पुनावाला यांच्या आईला उडवले, याचा घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून कार चालकाने अपघात घडवून पळ काढला.
04 Feb 2026 12:30 PM (IST)
एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथून महात्मा गांधीचा पुतळा चोरी करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून भारताने याचा तीव्र निषेध केला आहे.
04 Feb 2026 12:20 PM (IST)
स्थानिक मच्छीमार प्रल्हाद लोखंडे हे नेहमीप्रमाणे मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात हा मोठा मासा अडकला. मासा नदीत सापडल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी प्रल्हाद लोखंडे यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.
04 Feb 2026 12:13 PM (IST)
रणवीर सिंगच्या "धुरंधर" चित्रपटाने त्याच्या इतिहासातील १५ चित्रपटांचा टप्पा ओलांडत आणखी मोठा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाच्या प्रेक्षकांची संख्या ४ कोटींवर पोहोचली आहे, जी भारतीय आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
04 Feb 2026 12:00 PM (IST)
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक सुरू आहे. गेल्या ८-१० दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यावरून राजकारणही चांगलंच रंगलं होतं. पण आज पार्थ पवार आणि जय पवारांसोबत आज काय खलबतं सुरू आहेत. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
04 Feb 2026 11:50 AM (IST)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या अग्निकुंडात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यापैकी एक म्हणून सुभेदार तानाजी मालुसरे. स्वतःच्या घरचे लग्नकार्य बाजूला सारुन स्वराज्याच्या रक्षणासाठी तानाजी मालुसरे कोंढाणा किल्लाच्या मोहिमेवर गेले. आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे असे विडा उचलून तानाजी मालुसरे यांनी विजयाचा पण केला. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला आणि जीवाची बाजी लावून लढत दिली. तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना वीरगती आली. आजच्या दिवशी सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. त्यांच्या जाण्याने स्वराज्याचे मोठे नुकसान झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) म्हणाले की, गड आला पण सिंह गेला…!






