Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
Stock Market Today: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर झाल्यानंतर शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरील ‘सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स’मध्ये (STT) झालेल्या वाढीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर झाला असून, गेल्या ७ वर्षांतील ही अर्थसंकल्पाच्या दिवसाची सर्वात मोठी घसरण ठरली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांपर्यंतची मोठी घसरण झाली.SBI, BEL आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स ६ टक्क्यांपर्यंत आपटले. धातू, FMCG, फार्मा, आणि रिअल्टी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर्स लाल चिन्हात बंद झाले.
अर्थसंकल्पात फ्युचर्सवरील STT ०.०२% वरून ०.०५% करण्यात आला आहे. तसेच ऑप्शन्स प्रीमियमवरील करही ०.१५% पर्यंत वाढवण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वी २०२० मध्ये अशा प्रकारची मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
बाजारातील मुख्य आकडेवारी:
02 Feb 2026 06:56 PM (IST)
Mohsin Naqvi ignored the ICC’s warning : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना होणार नसल्याची शक्यता बळावली आहे. पाकिस्तान सरकारकडून १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारताविरुद्धच्या गट अ सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी, १ फेब्रुवारी रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स द्वारे या निर्णयाची अधिकृत घोषणा केली होती.
02 Feb 2026 06:46 PM (IST)
सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन १६ नगरसेवकांची नोंदणी सोमवारी पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. तर पक्षाच्या गटनेतेपदी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे. त्यांची नोंदणी देखील पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली.
02 Feb 2026 06:29 PM (IST)
सासवड: पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे महार वतनाच्या जमिनीतून काही गुंतवणूकदारांनी प्रशासनाकडे रस्ता करावी अशी मागणी केली होती. यामध्ये प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेवून आणि स्थळ पाहणी करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र अर्थपूर्ण तडजोडीतून ठराविक शेतकऱ्यांच्या जमिनीतून थेट रस्ता तयार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला केला आहे. दरम्यान प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात संबंधित पुरंदरमधील शेतकऱ्यांनी १९ जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. विशेष म्हणजे आंदोलन सुरु करून १५ दिवसांचा कालावधी होवूनही प्रशासनाकडे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
02 Feb 2026 06:09 PM (IST)
जि. प्र. नऊ वर्ष सातत्याने कायदेशीर लढा दिल्यानंतर ठाण्यातील मोक्याचा भूखंड ट्रस्टने खाजगी विकासकाकडून पुन्हा स्वतःच्या ताब्यात मिळवला आहे. ठाणे सिटीजन फोरम या ठाण्यातील स्वयंसेवी संस्थेने ठाण्यातील विद्यार्थ्यांचे सार्वजनिक हित लक्षात घेऊन ही कायदेशीर लढाई लढली आणि अखेरीस ट्रस्टला वर्तक नगर येथील मोक्याची ११६ कोटी बाजारी मूल्य असलेली जमीन पुन्हा परत मिळवून दिली आहे.ठाण्यातील वर्तक नगर येथील सदर जागा ही मूळतः सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च या ट्रस्टच्या मालकीची आहे. ट्रस्टने एका खाजगी एजंटला या जागेबाबतचे अधिकार दिले होते. तथापि या एजंट ने ट्रस्टची फसवणूक करत एका खाजगी बिल्डरला ही जागा दिशाभूल करत विकसित करण्याकरिता दिली.
02 Feb 2026 05:49 PM (IST)
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर चिपळूणमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर प्रचार सभा रॅली होत नसल्या तरी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर भर दिला आहे. पेढे, खेर्डी जिल्हा परिषद गटासह पेढे, दळवटणे, खेर्डी कापसाळ गणात देखील तिरंगी लढती होत आहेत.
02 Feb 2026 05:41 PM (IST)
कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार दूध संघ’ असे नाव देण्याचा निर्णय. हा निर्णय कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे.
02 Feb 2026 05:19 PM (IST)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या महापौर पदासाठी आज झालेल्या विशेष सभेत रवी लांडगे यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपने आपले पहिले खाते उघडले असून प्रभाग क्रमांक ६ ‘ब’ मधून रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौर पदी भाजपचे विजय शिंदे यांची निवड झाली आहे. महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. अन्य उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने रवी लांडगे यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
02 Feb 2026 04:50 PM (IST)
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे लोकसभेमध्ये बोलणार होते. मात्र त्यापूर्वीच संसदेमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी संसदेमध्ये एका न प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा उल्लेख केल्यामुळे सत्ताधारी नेते आक्रमक झाले आहेत. पूर्व सेनाप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचे आत्मकथन लिहिले आहे. मात्र हे पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नाही. याचा उल्लेख राहुल गांधींनी करताच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आक्रमक भूमिका घेतली.मनोज मुकुंद नरवणे हे माजी सेनाप्रमुख असून त्यांच्या आत्मकथनामध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. नरवणे यांच्या पुस्तकामध्ये देशाच्या संवेदनशील सैन्य कारवाई आणि त्यामागील राजकीय हालचाली याबाबत उल्लेख करण्यात आल्याची शक्यता आहे. अद्याप हे पुस्तक प्रकाशनाच्या कचाट्यामध्ये अडकले आहे. काही महिन्यांपूर्वी या पुस्तकातील काही भाग व्हायरल झाला होता. त्याचबरोबर अग्नीवीर योजनेबाबत देखील अनेक दावे करण्यात आले होते.
02 Feb 2026 04:40 PM (IST)
कर्जत तालुक्यातील नेरळ जिल्हा परिषद गटाच्या कर्जत परिवर्तन आघाडीच्या उमेदवृ सुनीता मोरे आणि नेरळ पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांच्या प्रचाराच्या फेरीला स्थानिक जनतेने मोठा प्रतिसाद दिसून आला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनांनंतर थांबलेला प्रचार पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार पूर्ण झाल्यानंतर सुरु करण्यात आला.नेरळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुनीता मोरे आणि नेरळ पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीत प्रचाराची फेरी काढली.
02 Feb 2026 04:35 PM (IST)
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण यांच्या तर्फे चिपळूण येथे ग्रामीण,कृषी व सहकार मराठी साहित्य रंमेलन २०२६ चे आयोजन करण्यात आले असून दि.१३, १४ व १५ फेब्रुवारी या कालावधीत कोकणातील एक रम्य नैसर्गिक अशा याच संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर संपन्न होत आहे. या संमेलनास ग्रामीण, कृषी व सहकार साहित्याच्या विविध विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या संमेलनाची सुरवात शुक्रवार, दि.१३फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मा. प्रकाश देशपांडे (अध्यक्ष, साहित्य संमेलन संयोजन समिती) यांच्या हस्ते ध्वजारोहण करून होणार आहे.
02 Feb 2026 04:30 PM (IST)
भ्रष्टाचारमुक्त जिल्हापरिषद करायची असेल तर आम्हाला साथ द्या असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील राजकारणावर भाष्य केले आहे.
02 Feb 2026 04:25 PM (IST)
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आतापासूनच आपली कंबर कसली असून अहिल्यानगरमध्ये पक्षाची महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा किंवा भाजप सोडून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पक्षाला नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता वंचित बहुजन आघाडीने आपला मोर्चा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे वळवला असून त्या दृष्टीने निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यावेळी बैठकीस राज्य महासचिव किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते प्रा. अरुण जाधव, उत्कर्ष रूपवते, राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे आणि उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांच्यासह जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा महासचिव उत्तर मधुकर साळवे, योगेश क्षीरसागर, अजित कुऱ्हाडे, सोमनाथ भैलुमे, फैरोज पठाण आदींसह सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी मंदाताई अडागळे, आस्मा शेख यांनी पक्षाच्या विचारधारा स्वीकारत वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला.
02 Feb 2026 04:20 PM (IST)
भाईंदर पोलिसांच्या वतीने रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. भाईंदर पूर्व येथील मॅक्सस मॉल परिसरात वाहतूक पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
02 Feb 2026 04:15 PM (IST)
चिपळूण नगरपरिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या नारायण तलाव या सार्वजनिक ठिकाणी ३० जानेवारी रोजी काही लोकांनी नमाज पठण केले. याविरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांना निवेदन देत याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
02 Feb 2026 04:10 PM (IST)
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका अप्रकाशित पुस्तकाचा उल्लेख केल्याने मोठा गोंधळ उडाला. २ फेब्रुवारी २०२६ रोजी, राहुल गांधी सभागृहात देशाचे माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील विधान वाचत असताना, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू त्यांना अडवण्यासाठी उभे राहिले.राहुल गांधी म्हणाले की, ‘तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेस पक्षावर आरोप केले आणि आमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर राहुल गांधींनी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ देण्यास सुरुवात केली. चिनी टँक कैलास पर्वतरांगांपासून काहीशे मीटर अंतरावर भारतीय जागांवर होते, असे सांगत राहुल गांधींनी सुरूवात करताच, एकामागून एक तीन वरिष्ठ मंत्री उभे राहिले आणि त्यांनी राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न केला…
02 Feb 2026 04:05 PM (IST)
मुंबईतील मुलं बेपत्ता प्रकरणावरुन संजय राऊत यांनी सरकारला निशाण्यावर घेतलं आहे. रोहित शेट्टीच्या घरावरील हल्ला करणाऱ्यांना 24 तासांत पकडलं जात असेल तर सामान्यांच्या घरातील मुली बेपत्ता होत असतील तर ही जबाबदारी कुणाची? असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला आहे.
02 Feb 2026 04:00 PM (IST)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर गंभीर शंका उपस्थित केली आहे. हवामान चांगले असतानाही विमान कसे कलंडले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अपघाताच्या चौकशीतून सत्य समोर येईल असे सांगत, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत दहा दिवसांनी मोठे खुलासे करणार असल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.
02 Feb 2026 03:57 PM (IST)
Parbhani ZP News : परभणी महापालिकेतील गटनेते पदावरून भाजपमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस सुरूच असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झरी येथील आपल्या प्रचारसभेतून पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना चांगलाच दम भरला आहे. निवडणुकीत पक्षात राहूनच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
02 Feb 2026 02:55 PM (IST)
यावेळी २०२६ चा टी२० विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे होणार आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी यजमान श्रीलंकेची अवस्था वाईट आहे. संघाने इंग्लंडविरुद्ध टी२० मालिका गमावली. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर इंग्लंडने टी२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले. पावसामुळे व्यत्यय आलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंड संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. यासह, इंग्लंडने मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.
02 Feb 2026 02:51 PM (IST)
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आज 4 था दिवस आहे. दरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून आले. दरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान संसदेत चीनचा आणि डोकलामचा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे संसदेत गदारोळ उडाला. याबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
02 Feb 2026 02:25 PM (IST)
सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अत्यंत मजेशीर असतात, तर काही संतापजनक अशी दृश्ये पाहायला मिळतात.काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन पर्यटकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ऑस्ट्रेलियन पर्यटकांनी असे काही कृत्य केले आहे की भारतीयांच्या मनाला हा व्हिडिओ थेट भिडला आहे. तसेच या पर्यटकाने आधार कार्डचीही मागणी केली आहे.
02 Feb 2026 02:20 PM (IST)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने ४-१ अशी बाजी मारली. या मालिकेने ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या रण मैदानात आत्मविश्वासाने उतरणार आहे. टी-२० मालिकेतील न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माने वेगवान गोलंदाज जेकब डफीला षटकार मारला, ज्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवने डगआउटमधून कौतुकास्पद मान हलवली. भारतीय कर्णधार नॉन-स्ट्रायकर एंडवर असताना इशान किशनने काइल जेमीसनच्या एका उंच चेंडूवर स्क्वेअर लेगवर सहा धावा काढल्या. सूर्यकुमारने पुन्हा एकदा कौतुकास्पद मान हलवली.
02 Feb 2026 02:15 PM (IST)
दिवंगत नेते अजित पवार यांचे बारामतीमध्ये (Ajit Pawar Plane Crash) अपघाती निधन झाले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ असून राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामती अपघातामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांच्या परिवाराची भेट घेतली आहे.
02 Feb 2026 02:08 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवायला मिळणार आहे. आता या शीर्षकगीतातून त्यांच्या नात्यातील नवा टप्पा उघडणार आहे, प्रेमात आलेले अंतर, बदललेली परिस्थिती आणि तरीही न डगमगणारी भावना या गाण्यात पाहायला मिळणार आहे.
02 Feb 2026 01:55 PM (IST)
महापौर पदी कोणाची वर्णी लागणार हे मंगळवारी (ता. १०) ठरणार आहे. या करता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, पालिकेचे नगरसचिव नानासाहेब कामठे यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ या विशेष सभेचे पिठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठणाऱ्या भाजप महायुतीने नुकतीच गट नोंदणी केली. गटनेतेपदी नितिन पाटील यांची निवड भाजपकडून करण्यात आली.
02 Feb 2026 01:50 PM (IST)
२०२६ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला ‘वध २’ आता लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. या चित्रपटात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा हे अनुभवी आणि लोकप्रिय कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. कलाकारांच्या दमदार अभिनयावर आधारित ही फ्रँचायझी असल्याने सुरुवातीपासूनच चित्रपटाची चर्चा सुरू आहे.
02 Feb 2026 01:45 PM (IST)
पाकिस्तानमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बलुचिस्तानमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. बलुचिस्तानमधील बलूच लिबरेशन आर्मीन (BLA)ने पाकिस्तानी सैन्याविरोधात बंड पुकारला आहे.बलुचिस्तानमध्ये BLAच्या आर्मी आणि सुरक्षा दलांच्या संघर्षाच 100 हून अधिक हल्लेखोर ठार झाले असून 200 सुरक्षा रक्षकही ठार झाले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने ऑपरेशन हारोफ फेज 2 सुरु केले आहे. दावा केला जात आहे की, यामध्ये महिला हल्लेखोरांचा सहभागही आहे. सध्या सोशल मीडियावर यातील दोन महिलांचा हातात बंदूक घेऊन हल्ला करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
02 Feb 2026 01:35 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा वार्षिक अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (दि. १) संसदेत सादर केला. देशात सध्या वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भावाची प्रतीक्षा, अशा अनेक समस्या तीव्र होत असताना या अर्थसंकल्पाकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष लागलेले होते. अशा परिस्थितीत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाने देशातील कोणत्या क्षेत्रांसाठी काय दिले गेले, यावर जिल्ह्यातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यात सत्ताधाऱ्यांकडून कौतुकाची थाप, तर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पावर अनेकांनी टीका केली आहे.
02 Feb 2026 01:25 PM (IST)
कोकणातील शिमगा उत्सवात साकारल्या जाणाऱ्या पारंपारिक आणि पौराणिक लोकनृत्य पात्र संकासूर याचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप झी ५ या मराठी ओटीटीवरील ‘देवखेळ’ या वेबसिरिजवर करण्यात आला आहे. या मालिकेत संकासूरला कूर आणि अंधश्रद्धा पसरवणारा म्हणून दाखवण्यात आल्याने कोकणातील लोकांच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
02 Feb 2026 01:15 PM (IST)
पुणे जिल्ह्यात (Pune News) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. मावळमध्ये निवडणूक विभागाने मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक करताना एका व्यक्तीस पकडण्यात आले आहे. निवडणूक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. २९ जानेवारी) मावळ तालुक्यातील (Maval Crime News) नवलाख उंब्रे येथे ही कारवाई केली. या प्रकरणी अंतु रामदास शेटे (वय ४०, रा. नवलाख उंब्रे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या निवडणूक कर्तव्यावर असलेले अजिंक्य सुनील म्हेत्रे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी शुक्रवारी (दि. ३०) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
02 Feb 2026 01:09 PM (IST)
पाकिस्तान सरकारने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात खेळण्यासाठी त्यांचा संघ श्रीलंकेचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. तथापि, त्यांनी त्यांच्या संघाला भारताविरुद्धच्या आगामी सामन्यावर बहिष्कार टाकण्यास सांगितले आहे. यामुळे जगभरात पाकिस्तानची बदनामी झाली आहे. माजी क्रिकेटपटूही पाकिस्तानवर टीका करत आहेत आणि त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काहींचे म्हणणे आहे की पीसीबीने भारताविरुद्ध पराभवाच्या भीतीने हा निर्णय घेतला.
02 Feb 2026 01:00 PM (IST)
बिहारच्या कैमुरमध्ये प्रियकराच्या हत्येचा कट रचण्यात आला. मात्र थंडीमुळे मफलर बांधलेल्या निष्पाप तरुणाला प्रियकर समजून गोळीबार झाला आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तरुणीसह चार आरोपींना अटक केली.
02 Feb 2026 12:50 PM (IST)
राणी मुखर्जीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दमदार ओपनिंगमुळे चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. तिसऱ्या दिवशीही थिएटरमध्ये 'मर्दानी ३' सुस्साट सुरु आहे.
02 Feb 2026 12:40 PM (IST)
पोर्टलँडमधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. फिटनेस वर्ल्डमध्ये लोक सापांसोबत, विशेषतः अजगरांसोबत, योगाभ्यास करत आहेत. ही बातमी व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
02 Feb 2026 12:30 PM (IST)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा हा साताऱ्याला असणार आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या आज कराड आणि फलटणच्या दाैऱ्यावर आहेत.
02 Feb 2026 12:20 PM (IST)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी जाणवू लागले आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील.
02 Feb 2026 12:15 PM (IST)
सोने आणि चांदीच्या किमती अलिकडेच लक्षणीय वाढल्या आहेत, त्यामुळे सर्वांचे लक्ष आजच्या अर्थसंकल्पावर होते. तथापि, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नियमांमध्ये कोणताही बदल केला नाही. दरम्यान, सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय घट झाली. एमसीएक्सवर व्यवहारादरम्यान, सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १३,००० रुपये आणि चांदी २६,००० रुपये इतकी घसरली.
02 Feb 2026 12:10 PM (IST)
सध्या एका अनोख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. या प्लॅटफॉर्मचं नाव Moltbook असं आहे. हे प्लॅटफॉर्म माणसांसाठी नाही तर AI एजेंट्ससाठी तयार करण्यात आले आहे. प्लॅटफॉर्मवर AI एजेंट्स पोस्ट करू शकतात.
02 Feb 2026 12:00 PM (IST)
महिला प्रीमियर लीग 2026 च्या 20 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने UP वॉरियर्सचा 5 विकेट्सने पराभव केला आणि एलिमिनेटरमध्ये स्थान निश्चित केले. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, UP वॉरियर्सने 8 विकेट्स गमावत 122 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीने 18.4 षटकात 126 धावा करत सामना जिंकला. या विजयासह दिल्लीने एलिमिनेटरमध्ये आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात, दिल्लीची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद 34 धावांची शानदार खेळी केली, तर गोलंदाजीत, मॅरिझानेन कॅपने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
02 Feb 2026 11:50 AM (IST)
दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ भूमी दिन साजरा केला जातो. 1971 मध्ये इराणच्या रामसर शहरात पाणथळ भूमींच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय करार झाला, म्हणूनच हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. तलाव, नद्या, खाड्या, दलदली, मॅन्ग्रोव्ह जंगलं आणि गोड्या तसेच खाऱ्या पाण्याचे स्रोत म्हणजेच पाणथळ भूभाग. हे निसर्गासाठी तसेच मानवजातीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. पाणथळ भूमीमुळे हवामान बदल नियंत्रित करण्यास मदत, जैवविविधतेचे संरक्षण, पाण्याचा साठा आणि स्वच्छता नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करणे ही महत्त्वाची कामे होतात. वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि जंगलतोड यामुळे पाणथळ भूभाग नष्ट होत आहेत. त्यामुळे संवर्धन आणि पुनरुज्जीवन गरजेचे आहे.
02 Feb 2026 11:40 AM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारण एका नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अवघ्या चार दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, या सगळ्या गदारोळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरण्यासाठी अजित पवार सकारात्मक होते, असा दावा करण्यात आला अजित पवार आणि आपल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विलीनीकरणासाठी चर्चा सुरू होत्या.
02 Feb 2026 11:30 AM (IST)
बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित चिमुकली ही केवळ ९ वर्षांची होती. तर आरोपीचे नाव बाबुराव केरबा निरडे (वय 70) असे आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील दिंद्रुड परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. तिच्या सोबत नेमकं काय घडलं जाणून घ्या.
02 Feb 2026 11:20 AM (IST)
Bangladesh News in Marathi : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या अवामी लीग पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला आहे. या वरिष्ठ नेत्यांचा दोन वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला असून अवामी लीग पक्षाने हत्येचा संशय व्यक्त केला आहे.यामुळे निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा बांगलादेशात अस्थिरता निर्माण झाली आहे.
02 Feb 2026 11:10 AM (IST)
योगगुरू आणि पतंजली समूहाचे संस्थापक बाबा रामदेव हे दीर्घकाळापासून राष्ट्र, संस्कृती आणि आत्मनिर्भर भारत या विचारांचे ठाम प्रवक्ते आहेत. त्यांनी वारंवार उच्चारलेली ओळ “आम्ही मिटलो तरी चालेल, आम्ही राहिलो नाही तरी चालेल; पण हे मातृभूमी, तुझे वैभव अमर राहो” आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त तयार झालेल्या ‘शतक : संघाची १०० वर्षे’ या चित्रपटाच्या भावनेशी अतिशय सुसंगत ठरते.
02 Feb 2026 10:59 AM (IST)
आयसीसीने भारताविरुद्धच्या विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा पाकिस्तानचा निर्णय जागतिक स्पर्धा आयोजित करण्याच्या मूलभूत भावनेच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे. आयसीसीने म्हटले आहे की कोणत्याही जागतिक स्पर्धेत, सर्व पात्र संघांनी नियोजित वेळापत्रकानुसार समान अटींवर खेळणे अपेक्षित आहे.
02 Feb 2026 10:54 AM (IST)
२०२६ चा ग्रॅमी पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होत आहे. आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा विजय सर्वांसाठी खूप खास आहे. चला जाणून घेऊया कोणत्या श्रेणीत त्यांनी जगातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांना मागे टाकले आहे. तसेच के-पॉप जोडी डेमन हंटर्सच्या गोल्डन सॉन्गने त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. अनेक भारतीय कलाकारांना विविध श्रेणींमध्ये नामांकने मिळाली आहेत.
02 Feb 2026 10:47 AM (IST)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प 2026 सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी नवीन योजना देखील सुरू करण्यात आल्या. अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सरकारच्या धोरणांमुळे 7 टक्के आर्थिक विकासदराला मजबूत पाया मिळाला आहे. तसेच या धोरणांनी गरिबी दूर करण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, भारताला आता जागतिक बाजारपेठेशी अधिक एकात्मिक होण्याची आवश्यकता आहे, म्हणूनच उत्पादन क्षेत्रात मोठे बदल केले जात आहेत.
02 Feb 2026 10:38 AM (IST)
पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला असला तरी, टीम इंडियाला त्या दिवशी कोलंबोला जावे लागेल. जरी पाकिस्तानचा हा निर्णय अंतिम असला तरी की ते २०२६ च्या टी-२० विश्वचषकात खेळतील पण भारताशी सामना करणार नाहीत, तरीही भारतीय संघ सामन्यापूर्वी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये उपस्थित राहील. यामागील कारण असे आहे की जरी एका संघाने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असला तरी, जर दुसऱ्या संघाला दोन गुण हवे असतील तर त्यांना टॉसच्या वेळी मैदानात उतरावे लागेल.
02 Feb 2026 10:30 AM (IST)
२०२६ च्या अर्थसंकल्पात सरकारने विक्रमी १७.२ लाख कोटी म्हणजेच १७.२ ट्रिलियन रुपये कर्ज घेण्याची घोषणा केल्याने बँकिंग क्षेत्र गोंधळात पडले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे कर्ज घेण्याचे लक्ष्य, बाजाराच्या अपेक्षांपेक्षा खूपच जास्त, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी (PUS बँका) एक मोठे आव्हान आहे. जेव्हा सरकार बाजारातून इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढून घेते तेव्हा त्याचा थेट परिणाम बाँड बाजारावर आणि बँकांच्या ट्रेझरी व्यवस्थापनावर होतो, ज्यामुळे त्यांच्या नफ्यात लक्षणीय घट होते.
02 Feb 2026 10:21 AM (IST)
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प २०२६ मध्ये पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून, ‘पुणे ग्रोथ हब’साठी पुढील पाच वर्षांत ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या या अर्थसंकल्पातून पुण्याला देशातील प्रमुख आर्थिक वाढीच्या केंद्रांपैकी एक म्हणून विकसित केले जात आहे.






