मध्यप्रदेशमधून एक मोठी घटना समोर येत आहे. हरदा येथील फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग (MP Fire News) लागली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारखान्याच्या दोन मालकांसह तिघांना अटक केली आहे. स्फोटानंतर आरोपी दिल्लीला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.






